• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, April 18, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

शब्दसुमने साहित्यिक मंच आयोजित मराठी वाड्:मय मंडळ, के.एम. महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने द्वितीय राज्यस्तरीय काव्यसंमेलन उत्साहात संपन्न. .!

माणगंगा by माणगंगा
June 20, 2023
in मुंबई
0
शब्दसुमने साहित्यिक मंच आयोजित मराठी वाड्:मय मंडळ, के.एम. महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने द्वितीय राज्यस्तरीय काव्यसंमेलन उत्साहात संपन्न. .!

शब्दसुमने साहित्यिक मंच आयोजित मराठी वाड्:मय मंडळ, के.एम. महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने द्वितीय राज्यस्तरीय काव्यसंमेलन उत्साहात संपन्न. .!


कल्याण (गुरुनाथ तिरपणकर) दिनांक १८जून२०२३ला कल्याणच्या सुप्रसिध्द समाजभूषण आणि साहित्यिक मा.अनिता प्रविण कळसकर यांनी फक्त निमंत्रितासाठी भव्य राज्यस्तरीय काव्यसंमेलन आयोजित केले होते.या कार्यक्रमात महाराष्ट्रातील अनेक भागांतून कवी/ कवयित्री यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली .या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध कवी मा.राजीव जोशी आणि मॅक्स महाराष्ट्र चे वरिष्ठ पत्रकार मा.किरण सोनावणे यांनी स्वीकारले. कार्यक्रमाची सुरूवात वरिष्ठ महिला सहायक पोलीस निरीक्षक मा.संगीता सुरवसे, संमेलनाध्यक्ष मा.दत्तप्रसाद जोग,कवी मा. राजीव जोशी तसेच जनजागृती सेवा समितीचे संस्थापक मा.गुरूनाथ तिरपणकर, के.एम.अग्रवाल महाविद्यालय च्या मराठीच्या विभागाच्या प्रमुख मा.मीनल सोहोनी, तसेच या कार्यक्रमाचे सर्वोसर्वा लेखिका/ कवयित्री/संपादिका मा.अनिता प्रविण कळसकर या सर्वांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली त्यानंतर काॅलेजचे सहसचिव डॉ ओमप्रकाश पांडे सरांच्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि नंतर सर्व मान्यवरांचे आयोजिका मा.अनिता कळसकर यांनी शाल, पुष्पगुच्छ तसेच शब्दसुमने साहित्यिक मंच चे स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले. कार्यक्रमाची सुरुवात कु. देवयानी महाजन हिच्या गोड आवाजातील स्वागत गीताने झाली.

प्रमुख पाहुणे मा.राजीव जोशी यांनी आपल्या चॅटमॅट या सुंदर अशा कवितेने संमेलनास सुरूवात केली.तसेच मॅक्स महाराष्ट्र चे वरिष्ठ पत्रकार मा.किरण सोनावणे यांनी बोकड नावाची वास्तव रचना सादर करून उपस्थितांची मने जिंकली, प्रत्येक कवीने आपल्या खास अशा शैलीत कवितेचे सादरीकरण केले.उपस्थितांमध्ये ज्येष्ठ गझलकार मा अजित मालणकर, कवयित्री निलांबरी बापट ,माधुरी वैद्य, स्वाती नातू , मृणाल जोशी, अश्विनी मुजुमदार, बापूसाहेब सोनावणे, ज्योती गोळे,सागरराजे निंबाळकर, श्रीशैल सुतार,जयराम पाटील,आकाश पवार, हरिश्चंद्र धिवार, प्रमोद सुर्यवंशी,दिपश्री ईसामें, चंद्रपूरचे मोहम्मद अब्दुल रहीम, ललिता गाढवे ,पद्माकर भावे, संगीता राजपूत, इ.अनेक कवींनी या राज्यस्तरीय काव्यसंमेलनाला हजेरी लावली. सर्वांनी नाश्त्यानंतर तर कार्यक्रमात रंगत आणली .

यावेळी संमेलनाध्यक्ष मा.दत्तप्रसाद जोग यांनी कवितेवर थोडेसे सर्वांना बोलते केले.जोग यांनी ज्येष्ठ कवींनी नवोदित कवींवर सतत टिका करणे सोडले पाहिजे असे सांगून गझलेने सर्वांची मने जिंकली .जोग यांनी निखळ कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी गोव्याहून आपल्या कल्याण या ऐतिहासिक नगरीत आपली उपस्थिती दर्शविली,यासाठी शब्दसुमने साहित्यिक मंच घ्या संस्थापिका आणि काव्यसंमेलन च्या आयोजिका मा.अनिता कळसकर यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.उपस्थितांमध्ये ज्येष्ठ कवी मा.शिवाजी गावडे,तसेच मा.कमलाकर राऊत यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली .

अशा या दिमाखदार सोहळ्याचे आयोजन केले म्हणून सर्वांनी लेखिका/कवयित्री/संपादिका -मा.अनिता कळसकर यांचे अभिनंदन केले ,तसेच ज्येष्ठ कवी राजीव जोशी यांनी व्यासपीठावरून बोलताना तर अनिता कळसकर ताईंनी अशी संमेलने नेहमी भरवावीत असे सांगितले.निवेदिका जनशक्ती च्या अॅकर मा.ललिता मोरे यांनी नेहमीसारख्या आनंदी आणि हसतखेळत या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले ,त्यासाठी अनिता कळसकर यांनी निवेदिका ललिता मोरे यांचे शाल, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन गौरविले.असे हे सुंदर काव्यसंमेलन के.एम.अग्रवाल महाविद्यालयाच्या सभागृहात उत्साहात पार पडले ‌.

Views: 210
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
सदिच्छा फौंडेशनची समाजसेवेकडे यशस्वी वाटचालःसंतोष मोरे

सदिच्छा फौंडेशनची समाजसेवेकडे यशस्वी वाटचालःसंतोष मोरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे
  • विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान
  • माझंही मत;उद्धव ठाकरेंनी आता पुन्हा विधान परिषदेत जाण्याचा हट्ट धरू नये..;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)