कोंढावळ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात ‘मातृपितृ ‘पूजन सोहळा उत्सवात साजरा
त-हाडी प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील संत सावता माळी बहूउद्देशिय् विकास मंडळ संचलीत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले कोंढावळ शाळेत गणेश उत्सहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यात विद्यार्थांमध्ये चांगले संस्कार रुजावेत.म्हणून गणेश उत्सवाच्या चौथ्या दिवशी ‘मातृपितृ’पुजन सोहळा आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जी.एस.विद्यामंदिर वडाळी शाळेचे प्राचार्य एस..डी. भोई यांनी स्वीकारले.क्रांतिसुर्य ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक जी.डी.वाल्हे यांनी केले.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून ग्रा.पं. सदस्या अनिताबाई विनोद माळी,ग्रा.पं. सदस्या राधाबाई भिल,अशोक माळी,भटू माळी,राकेश धनगर,विनोद अहिरे(उपाध्यक्ष समता परिषद्) व शाळेचे मुख्यध्यापक जे.पी.माळी.यांनी उपस्थिती लावली.कार्यक्रमाच्या निमित्ताने शिक्षकांना पालकांशी संवाद साधता आला.या कार्यक्रमाला पालकांनीही प्रतिसाद देत मोठ्या संख्येने हजेरी लावली. कार्येक्रमात भोई सरांनी आपल्या व्याख्यानातून विद्यार्थी व पालकांना शिक्षणाचे महत्व आणि संस्कार यांचे मार्गदर्शन केले.तसेच ह्या कार्यक्रमाची संकल्पना मांडणारे के.एस.सैंदाणे सर यांचे कौतुक केले.
स्पर्धेत प्रथम,द्वितीय आलेल्या विद्यार्थांचा योग्य बक्षीस देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.कार्यक्रमात उपस्थित प्रमुख अतिथी व सर्व पालकांचे वाय.एस.शिंपी सरांनी आभार मानले. कार्यक्रम येशस्वी करण्यासाठी शाळेचे उपशिक्षक पी.टी.परदेशीं,डी. एस.जगताप,आर.एच.खैरनार,वाय.एस.शिंपी,के.एस.सैंदाणे,एम.एम.माळी,एस.पी.सोनवणे तसेच शिक्षेकेत्तर कर्मचारी आर.डी. माळी,आर.एम.बागुल,एस.डी. बैसाणे सर्व बंधू भगिनीनी सहकार्य केले.

