रंगकर्मी आंदोलनाची दखल सांस्कृतीक मंञी देशमुख ह्यांनी घेतली.उद्या मागण्यावर चर्चेसाठी बोलवणे
मुंबई ; क्रांतीदिनाचं औचित्य साधून रंगकर्मींच्या मानसिक आणि आर्थिक वेदनेचा आक्रोश शासनाला कळावा, यासाठी ‘रंगकर्मी आंदोलन महाराष्ट्र’च्या वतीनं महाराष्ट्रभर राज्यव्यापी आंदोलन करण्यात आलं. कोरोनाच्या प्रादुर्भावानं गेले दिड वर्षे मनोरंजन विश्व ठप्प आहे. अभिनेते विजय पाटकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत दादरच्या हिंदमाता येथील दादासाहेब फाळके यांच्या स्मारकाशेजारी रंगकर्मींनी आंदोलन केलं. याची दखल सांस्कृतिक मंत्री देशमुख यांनी घेतली असून आज कलाकार यांच्या मागण्या संदर्भात महत्वाची मीटिंग आज कलाकार यांच्या सोबत होणार आहे यातून मार्ग निघण्याची शक्यता आहे







