डोंगरगाव सह संपूर्ण शिंदखेडा तालुक्यातील इलेक्ट्रिक जीर्ण तारा व जुने पोल बदला =प्रकाश पाटील *
================================
डोंगरगाव( प्रतिनिधी )आर आर पाटील==
डोंगरगाव सह परिसरात व संपूर्ण शिंदखेडा तालुक्यात शासनाच्या वीजजोडणी दिवसापासून आज पर्यंत बर्याच ठिकाणी गावांमध्ये व शेतांमध्ये त्या जुन्या काळातील तारा व जुने पोल आहेत तारा अतिशय जीर्ण व खराब झालेल्या आहेत जीर्ण झालेल्या तारा जमिनीकडे लोंबकळत असल्यामुळे बऱ्याच वेळा परिसरात व तालुक्यात वित्तहानी व प्राणहानी झालेलीआहे बऱ्याच शेतांमध्ये शॉर्टसर्किटमुळे शेतीमाल पण जळालेला आहे काही गावांमध्ये घरांना व झोपडीला आग लागलेली आहे गुरे मेली आहेत वाकलेले पोल हे केव्हाही धोकेदायक आहेत ऊर्जा मंत्रालय यावर खूप मोठा खर्च करत असून या परिसरात व शिंदखेडा तालुक्यात या गोष्टी जैसे थे आहेत म्हणून शासन स्तरावरून तातडीने या परिसरातील व शिंदखेडा तालुक्यातील संपूर्ण जीर्ण तारा व वाकलेले पोल बदलण्यात यावे अशी मागणी धुळे व नंदुरबार जिल्हा डी डीसी बँकेचे संचालक प्रकाश पाटील यांनी शासनाकडे केलेली आहे







