• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

छत्तीसगड राज्यातही हलाल उत्पादनांवर बंदीची मागणी !छत्तीसगड राज्यातही हलाल उत्पादनांवर बंदीसाठी तत्परतेने प्रयत्न करणार ! – विजय शर्मा, उपमुख्यमंत्री, छत्तीसगड राज्य

माणगंगा by माणगंगा
December 21, 2023
in मुंबई
0
छत्तीसगड राज्यातही हलाल उत्पादनांवर बंदीची मागणी !छत्तीसगड राज्यातही हलाल उत्पादनांवर बंदीसाठी तत्परतेने प्रयत्न करणार ! – विजय शर्मा, उपमुख्यमंत्री, छत्तीसगड राज्य

छत्तीसगड राज्यातही हलाल उत्पादनांवर बंदीची मागणी !

छत्तीसगड राज्यातही हलाल उत्पादनांवर बंदीसाठी तत्परतेने प्रयत्न करणार ! – विजय शर्मा, उपमुख्यमंत्री, छत्तीसगड राज्य

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

*रायपूर* - अन्न पदार्थ आणि उत्पादनांना प्रमाणपत्र देण्याचा अधिकार केवळ सरकारला आहे. खाजगी संस्थांना नाही, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी नुकतेच स्पष्ट केले आहे. असे असतांना काही खाजगी मुसलमान संस्था बेकायदेशीरपणे ‘हलाल प्रमाणपत्र’ देऊन व्यापार्‍यांची मोठ्या प्रमाणावर लुट करत आहेत. या बेकायदेशीर हलाल प्रमाणपत्र आणि हलाल उत्पादन यांवर उत्तर प्रदेश सरकारने बंदी आणली आहे, तशीच बंदी छत्तीसगड राज्यातही घालण्यात यावी, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री श्री. विजय शर्मा आणि मुख्यमंत्री श्री. विष्णुदेव साय यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली. या वेळी उपमुख्यमंत्री श्री. विजय शर्मा म्हणाले, ‘‘हा विषय गंभीर आहे. या प्रकारावर आजच बंदी आणली पाहिजे असे वाटते; मात्र येत्या आठवड्याभरात हलाल उत्पादनांवर बंदी आणण्यासाठी तत्परतेने प्रयत्न करू. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतो. शासन यावर गांभीर्यपूर्वक कारवाई करेल.’’ तसेच मुख्यमंत्री श्री. विष्णुदेव साय यांनी ‘‘चौकशी करून कारवाई केली जाईल’’, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

या शिष्टमंडळामध्ये ‘हिंदु जनजागृती समिती’चे महाराष्ट्र अन् छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट, ‘बजरंग दला’चे श्री. अंकित द्विवेदी, ‘मिशन सनातन’चे श्री. मदनमोहन उपाध्याय, ‘श्री निळकंठ महादेव संस्थान’चे पंडित निळकंठ त्रिपाठी, ‘किन्नर आखाड्या’च्या साध्वी सोम्या, छत्तीसगड येथील ‘हिंदु जनजागृती समितीचे श्री. मंगेश खंगन आणि श्री. हेमंत कानसकर हे सहभागी होते. या वेळी हलाल प्रमाणपत्राच्या बेकायदेशीर प्रकाराविषयीची कागदपत्रे आणि पुरावे सादर करण्यात आले, तसेच उपमुख्यमंत्र्यांना ‘हलाल जिहाद’ विषयीवर एक भीषण वास्तव दाखवणारी चित्रफित दाखवण्यात आली. या वेळी दोघा मंत्र्यांना मागणीचे निवेदन आणि ‘हलाल जिहाद’ पुस्तक भेट देण्यात आले.

दूध, साखर, बेकरी उत्पादने, नमकीन, रेडी-टू-ईट, खाद्यतेल, औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि सौंदर्यप्रसाधनांशी संबंधित सरकारी नियमांमध्ये उत्पादनांच्या वेष्टनावर हलाल सर्टिफाइड चिन्हांकित करण्याची कायदेशीर तरतूद नाही, तसेच औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायदा, 1940 आणि संबंधित नियमांमध्ये हलाल प्रमाणपत्रासाठी कोणतीही तरतूद नाही. अशा परिस्थितीत कोणतीही औषधे, वैद्यकीय उपकरणे किंवा कॉस्मेटिकच्या वेष्टनावर हलाल प्रमाणपत्राशी संबंधित कोणतेही तथ्य प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे नमूद केले असल्यास, तो एक दंडनीय गुन्हा आहे. भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) यांना खाद्यपदार्थांचे मानके ठरवण्याचा आणि प्रमाणपत्र देण्याचा अधिकार देण्यात आला आहे. हलाल प्रमाणन ही खाद्य पदार्थाच्या गुणवत्तेबाबत भ्रम निर्माण करून सरकारी नियमांचे उल्लंघन करते, अशी माहिती श्री. सुनील घनवट यांनी उपमुख्यमंत्री श्री. विजय शर्मा आणि मुख्यमंत्री श्री. विष्णुदेव साय यांना दिली.
Views: 154
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
वातावरण बदलाचा फळबागांना फटाका.. अनेक शेतकरी पंचनामापासून वंचित.,ढगाळ हवामान, पावसाचा धोका., होतं नव्हतं तेवढं वाया गेलं

वातावरण बदलाचा फळबागांना फटाका.. अनेक शेतकरी पंचनामापासून वंचित.,ढगाळ हवामान, पावसाचा धोका., होतं नव्हतं तेवढं वाया गेलं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)