• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, April 18, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

केवल विकमनी यांची व्यथा व न्यायासाठी  शासकीय अधिकारी व राज्यकर्त्यांना निराशेने जीवन त्याग/आत्महत्या करण्याचा ईशाराची अखेर दखल न्यायालयाने व पोलीस आयुक्त यांनी घेतली

माणगंगा by माणगंगा
January 15, 2024
in मुंबई
0
केवल विकमनी यांची व्यथा व न्यायासाठी  शासकीय अधिकारी व राज्यकर्त्यांना निराशेने जीवन त्याग/आत्महत्या करण्याचा ईशाराची अखेर दखल न्यायालयाने व पोलीस आयुक्त यांनी घेतली

केवल विकमनी यांची व्यथा व न्यायासाठी  शासकीय अधिकारी व राज्यकर्त्यांना निराशेने जीवन त्याग/आत्महत्या करण्याचा ईशाराची अखेर दखल न्यायालयाने व पोलीस आयुक्त यांनी घेतली

पत्रकार जगदीश काशिकर यांनी मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या प्रकरणात गांभीर्याने बघण्यासाठी निवेदनाला अखेर यश

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मी केवल विकमनी वय २६ वर्ष. मोबाईल नंबर 8879585802.

मी अंबरनाथ जिल्हा ठाणे येथील चिकलोली गावात क्रिकेट फुटबॉल मैदान टर्फ चालवत होतो. ठाणे पोलीस आयुक्तालयातील शिवाजीनगर पोलिस स्टेशन अंबरनाथ येथील पी.एस.आय. सुहास विठठल पाटील यांनी मला टर्फ चालवण्यासाठी वारंवार हफ्ता देण्यास त्रास देत होते व ५०,०००/- इतकी रकम हफ्ता वसूल केला आहे. त्यानंतर मी त्यांना पैसे दिले नाही व मी हफ्ता देण्यास नकार दिला म्हणूनच त्यांनी मला शिवीगाळ, लाथा, काठ्या, बुक्कयांनी मारहाण केली. अश्लील भाषेत शिवीगाळ करून रात्री क्रिकेट खेळण्यास आलेले खेळाडू व मला २००-३०० उठाबशा काढायला लावल्या व सीसीटिव्ही कॅमेरे ही बंद करण्यास सांगितले, परंतु मी चलाखीने ते बंद न करता यांची व  यांच्यासोबत आलेले काही  भागीदार, साथीदार या सर्वांची व्हीडिओ काढून ठेवला. नंतर मी वारंवार तक्रार करूनही यांच्यावर कोणीच काहीच कार्यवाही केली नाही.  गेल्या मे-२०२३ पासून मी वारंवार तक्रारी व अर्ज करूनही कोणीच दादही देत नाही. वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांना वारंवार भेटूनही कार्यवाही करण्यास विनंती केली परंतु आरोपी व तिकडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हे मित्र असल्याने त्यांनी आरोपीला वाचवण्याचे काम केले व माझ्यावर वारंवार अन्याय करून माझं आर्थिक, शारीरिक व मानसिक खच्चीकरण केले आहे.

या सर्वांनी मिळून सरकारी पदाचे दुरुपयोग केले व त्यानंतरही वारंवार मला त्रास देऊन सदरचे व्यवसाय मला बंद करण्यास भाग पाडले असून मी बेरोजगार झालो आहे. व सदरच्या उत्पन्नातून माझा उदरनिर्वाह चालू होता परंतु या अधिकाऱ्यानं मुळे माझे आर्थिक नुकसानही झाले असून मी कर्जबाजारी झालो आहे.

नवतरुण पिढी जे देशाचं येणार भविष्य आहे त्यांनी हफ्ता / लाच दिल्या शिवाय कुठलाही व्यवसाय करू नये व तरुण, नवीन व्यावसायिक आहोत आम्ही काही छोटा अधिकृत व्यवसाय करत असलो तर येऊन मारहाण, शिवीगाळ केली व तरुण पिढी १५-२० मुलांना २००-३०० उठाबशा काढायला लावल्या, परंतु उद्या यांच्यामुळेच माझ्यासारखे दुसऱ्या कोणाचे आयुष्य खराब झाले तर मानसिक त्रासामुळे चरस, गांजा, ड्रॅग्स दारू असे व्यसन करून तरुण पिढी चा भविष्य बरबाद होईल यांच्या अश्या कृत्यामुळे.

पोलिसांनी नागरिकांना मारहाण, शिवीगाळ, उठाबशा काढायला लावणे हे अधिकार त्यांना दिलेत का ??? नागरिकांसोबत अशी वागणूक करण्यासाठी यांना महाराष्ट्राचे गृहमंत्री महोदय / ठाणे पोलीस आयुक्त महोदय यांनी आदेश दिलेत का ???

हफ्तवसुली करण्याचे आदेश यांना कोणी दिले आहेत ???

जर हे लोकांना जागेवरच शिक्षा देत आहेत तर न्यायालय कश्यासाठी आहेत ???

गेल्या काही महिन्यांपासून मी सतत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,  ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री,  ठाणे पोलीस आयुक्त, ठाणे पोलीस उपायुक्त, डिसीपी, एसीपी व शिवाजीनगर पोलिस स्टेशन अंबरनाथ येथे पत्र व्यवहार करून गुन्हा दाखल करून कार्यवाही करण्यासाठी पाठपुरावा करत असून तरीही काहीच कार्यवाही होत नसल्याने आता मी दिनांक १४-१-२०२४ पर्यंत जर शिवाजीनगर चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अशोक भगत, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री तुकाराम पदीर व पी.एस.आय. सुहास विठ्ठल पाटील या आरोपींवर जर गुन्हा दाखल करून कार्यवाही झाली नाही तर मी दिनांक १४-१-२०२४ ला माझे जीव देऊन आत्महत्या करणार याची नोंद घ्यावी.

वरिल घटनेला अनुसरून आज केवल विकमनी यांनी खालील प्रमाणे घटनेचा खुलासा केला आहे याची वाचकांनी नोंद घ्यावी:-

मी केवल विकमाणी यांनी आत्महत्येचा इशारा दिला होता परंतु नंतर मी न्यायालयात सांगितले मी सध्या  आत्महत्या करणार नाही व माझ्या आत्महत्येचा इशारा सध्या तात्पुरता स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

जसे मी तक्रार पत्रात आपणास कळवले आहे की माझ्यावर कर्ज झाले असून मी प्रचंड मानसिक, शारीरिक,  व आर्थिक त्रास मध्ये आहे म्हणूनच आरोपी नावे:-

१-  सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री सुहास विठ्ठल पाटील,

२- वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री.अशोक संभाजी भगत

३- पोलिस निरीक्षक गुन्हे – श्री तुकाराम पदीर

यांना निलंबित करून यांनी माझ्यावर केलेल्या अन्याय, मारहाण, शिवीगाळ, हफ्ता वसुली नुसार गुन्हा दाखल करून कार्यवाही करावी अशी विनंती करतो . आपण मला योग्य तो न्याय मिळवून देणार अशी आशा व्यक्त करतो.

मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो कीठाणे पोलिस आयुक्तालय अंतर्गत असणारे शिवाजीनगर पोलिस स्टेशन अंबरनाथ च्या हद्दीत रात्रभर  गांजा, चरस, हिरोईन, ड्रॅग्ज, एम.डी पावडर, देसी विदेशी दारू या सर्व अमली पदार्थांची विक्री खुल्या प्रकारे होत असून  शिवाजीनगर पोलिस स्टेशन अंबरनाथ यांच्या हद्दी मध्ये रात्रभर बेकायदेशीरपणे सर्व अनधिकृत धंदे चालू  असतात व याच शिवाजीनगर पोलिस स्टेशन चे काही वरिष्ठ, कनिष्ठ, हवलदार, बीट मार्शल, पेट्रोलिंग, डीबी गँग ह्यांच्या हस्ते मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर हफ्ता वसुली चालू आहे व यातून २०-२५ लाख रुपये प्रतिमहा इतकी रक्कम हे सदरचे वरिष्टांमार्फत वसुली होत आहेत. सदरचे हफ्ते कोणाकडे जमा होत आहे ??

वरिष्ठ हे हफ्ते स्वतःकरिता वसुली करतात का ?? या सर्व वसुली मागे कोण आहे ?? कोणा कोणा पर्यंत हा हफ्ता पोचतो व कोण कोण भागीदार आहेत ?? सरकारी अधिकारी यांना कोणी हफ्ते वसुलीची परवानगी दिली ?? ह्यांच्याकडे हफता वसुली करण्याचा लायसन्स आहे का ?? जनतेला पडलेले हे प्रश्न आहेत.

या सर्व प्रकरणामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून व्यावसायिकांना चिंता आहे व यामुळेच लोक पोलिसांना  घाबरून राहत आहेत. याचे आपण सखोल कठोर कडक तपास करून सर्व आरोपींना शिक्षा द्यावी व पोलिस खत्यामधून निलंबन करावे अशी नम्र विनंती.

Views: 314
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
सदगुरू श्री. श्री. साखर कारखान्याने जलप्रदूषण व हवाप्रदूषण थांबवावे अन्यथा आंदोलन.. सरपंच शिरकांडे

सदगुरू श्री. श्री. साखर कारखान्याने जलप्रदूषण व हवाप्रदूषण थांबवावे अन्यथा आंदोलन.. सरपंच शिरकांडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष
  • आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे
  • विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)