• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

कोंढावळ येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ सोहळा साजरा

माणगंगा by माणगंगा
February 11, 2024
in मुंबई
0
कोंढावळ येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ सोहळा साजरा

कोंढावळ येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ सोहळा साजरा

कोंढावळ -प्रतिनीधी

शहादा तालुक्यातील कोंढावळ येथील
संत सावता माळी बहुउद्देशीय विकास मंडळ संचालित क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ घेण्यात आला.कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता दहावीचे वर्ग शिक्षक डी. एस. जगताप यांनी केले.क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक जे. पी. माळी हे होते.

तसेच कार्यक्रमाचे सूत्र संचालन भैरवी गोसावी व धनश्री माळी या विद्यार्थीनी केले. त्यानंतर इयत्ता दहावीच्या विद्यार्थीनी भूमिका माळी, ललिता माळी, दिशा धनगर, भैरवी गोसावी, धनश्री माळी यांनी आपल्या मनोगतातून सहा वर्ष या शाळेत शिक्षण घेतल्याने खऱ्या अर्थाने सदैव शाळा आमच्या आठवणीत राहील अशा भावना व्यक्त केल्या. यातील काही विद्यार्थिनींनी कोरोना काळातही विदयालयातील शिक्षकांनी अभ्यासात ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून खंड पडू दिला नाही या बदल शिक्षकांचे आभार व्यक्त केले.

त्यानंतर शाळेतील उपशिक्षक प्रमोद परदेशी यांनी आपल्या मनोगतातून संगत चुकली तर आयुष्याची दिशा चुकते या विषयावर मार्गदर्शन केले ते म्हणाले शालेय जीवनात शिक्षकांनी केलेले संस्कार हे
अत्यंत महत्त्वाचे असतात. शाळेचा निरोप घेतल्यानंतर च्या पुढील आयुष्यात दिशा ठरविणे महत्त्वाचे आहे. जीवनाचे व शिक्षणासाठीचे ध्येय नसेल तर आयुष्य भरकटते म्हणून ध्येय ठरवून वाटचाल केली तर यश मिळते. आपल्या यशाच्या आड येणारी कुसंगत टाकून सुसंगती स्वीकारली पाहिजे. त्या नंतर जी. डी. वाल्हे यांनी आपल्या मनोगतातून छत्रपती शिवाजी महाराज यांचे ध्येयवादी जीवन आपल्या भविष्याचे ध्येय धोरण ठरवण्यासाठी प्रेरणादायी असल्याचे मत मांडले.

झाशीची राणी ,माऊंट एव्हरेस्ट सर करणारा जगाचा पहिला गिर्यारोहक ऑस्ट्रेलियाच्या सर हिलरी, अरुणिमा सीन्हा, भारताचे माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम आदी प्रेरणादायी चरित्र यांची उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनात प्रेरणात्मक विचार कसे महत्वाचे असतात हे सांगितले.कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक जे. पी. माळी यांनी शालेय जीवनातील विद्यार्थ्यांच्या आठवणी ही भविष्यातील शिदोरी असते असे मत मांडले, तर क्रीडाशिक्षक के. एस. सैंदाणे यांनी गेल्या सहा वर्षातील वाटचालीच्या विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या क्षणांच्या विचार मुलांकडे ठेवला. त्यानंतर एम. एम. माळी यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना जीवन सुंदर कसे जगावे या विषयी पुढील जीवनाच्या प्रवासावर प्रकाश टाकला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डी. एस. जगताप, आर. एच. खैरनार, एस. पी. सोनवणे तसेच एस. डी. बैसाणे यांनी प्रयत्न केले.

Views: 152
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
सदगुरु साखर कारखाना बंद पाडण्यासाठी राजकीय मंडळी व प्रस्थापित कारखानदारांचे षडयंत्र ? सदगुरु बचावसाठी आता शेतकरी सभासद उतरणार मैदानात

सदगुरु साखर कारखाना बंद पाडण्यासाठी राजकीय मंडळी व प्रस्थापित कारखानदारांचे षडयंत्र ? सदगुरु बचावसाठी आता शेतकरी सभासद उतरणार मैदानात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)