सदगुरु साखर कारखाना बंद पाडण्यासाठी राजकीय मंडळी व प्रस्थापित कारखानदारांचे षडयंत्र?
सदगुरु बचावसाठी आता शेतकरी सभासद उतरणार मैदानात
विश्वजीत गोरड/पिलीव प्रतिनिधि –
अध्यात्मिक विश्व गुरु सदगुरु श्री श्री रविशंकरजी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बचेरी आणि राजेवाडी च्या सीमारेषेवर दुष्काळी परिस्थितीला झुंज देत पर्वतासारखा मोठ्या दिमाखात उभा असलेला राजेवाडीच्या माळरानावरील सद्गुरु श्री श्री साखर कारखान्याला आता राजकीय व प्रस्थापित कारखानदारांची नजर लागली की काय अशी आता शंका उत्पन्न झाली आहे .राजकारण असो किंवा एखादा उद्योग धंदा असो समोरचा व्यक्ती जर आपल्यापेक्षा वरचढ ठरत असेल तर त्याला बाद केलं जाते हे महाराष्ट्रात नवीन नाही अशाच प्रकारे उसाला योग्य हमीभाव व वेळेवर बिल सोडण्याची परंपरा असणारा एक वचनी एक बानी व सेंद्रिय शेती , देशी गाय वाचवण्यासाठी नेहमी अग्रेसर असणारा सद्गुरु साखर कारखाना आता अनेक प्रस्थापितांच्या नजरेला खूपत आहे कारण राजकारणा विरहित कारखाना म्हणून सद्गुरु साखर कारखान्याचा उल्लेख केला जातो.
सर्व सामान्य शेतकऱ्यांना समान वागणूक देऊन आपला परका कधीही भेदभाव केला जात नाही प्रोग्रॅम नुसार उसाची तोडणी केली जाते आसपासच्या कारखान्याच्या तुलनेत नेहमी वरचढ दर देण्याची सद्गुरु साखर कारखान्याची भूमिका असते हेच कुठेतरी राजकीय मंडळींना खुपत आहे यामुळे कुठेतरी साखर कारखान्याचे खच्चीकरण करून कोणत्यातरी षड्यंत्रात अडकवून कारखाना अडचणीत आणण्यासाठी मोठे कटकारस्थान केले जात आहे इतर कारखान्यापेक्षा जादा दर देऊनही या कारखान्याला अडचणीत आणले जात आहे व आंदोलने करून कारखाना व्यवस्थापनावर दबाव आणला जात आहे.
कारखान्यातील संपूर्ण व्यवस्थापन हे अध्यात्मिक विचारसरणीचे असल्यामुळे सहन करण्याची क्षमता या संचालक मंडळाची भरपूर आहे याचाच कुठेतरी गैरफायदा घेतला जात आहे जर हा कारखाना राजकीय मंडळींचा असता तर या कारखान्यावर वाकड्या नजरेने बघायची कुणाची हिंमत झाली नसती सततच्या या त्रासाला आता संचालक मंडळ कंटाळले आहे
आता कारखाना बंद करावा अशी मानसिकता आता संचालक मंडळाच्या मनात येत आहे आणि ही बाब सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या दृष्टीने खूप गंभीर आहे जर सद्गुरु साखर कारखाना बंद झाला तर लाखो कुटुंब बेघर होतील लाखो कुटुंबाची उपजीवका ही सद्गुरु साखर कारखान्यावर अवलंबून आहे. दुष्काळी गावांना सद्गुरु साखर कारखान्यामुळे अच्छे दिन आलेले आहेत परंतु सद्गुरु कारखाना चालू असल्यामुळे इतर कारखान्याला त्याचा फटका उसाच्या बाबतीत खूप बसत आहे हे कुठेतरी बाकीच्या कारखानदारांना खटकत आहे म्हणून हा कारखाना अडचणीत आणून स्वतःची पोळी भाजण्याचा डाव तर नाही ना राजकीय मंडळींचा?
असा विचार सर्वसामान्य शेतकरी सभासदांच्या मनात येत आहे त्यामुळे आता कारखाना वाचवण्यासाठी सर्वसामान्य शेतकरी मैदानात उतरणार आहे असे मत ऊस उत्पादक शेतकरी सभासद शिवराज पुकळे यांनी बोलून दाखवली. एखादा उद्योग धंदा करत असताना चांगल्या बाबी बरोबर काही प्रमाणात वाईट गोष्टींना ही तोंड द्यावी लागते परंतु सद्गुरू साखर कारखाने याबाबतीत 90 टक्के जरी चांगल्या गोष्टी असल्या तरी दहा टक्के उणीवा असतील तर आपण थोड्याफार प्रमाणात सहन केल्या पाहिजे परंतु असे न करता 90% चांगल्या गोष्टींचा विचार न होता दहा टक्के उणीवांना टार्गेट केले जाऊन वारंवार व्यवस्थापनाला त्रास दिला जात आहे.
भारत देश कायदेशीर मार्गाने चालणारा असून कायद्यातून हक्क मागायचा सोडून प्रत्येक वेळी कारखाना व्यवस्थापनाला अडचणीत आणि कोंडीत पकडले जात आहे जर हा कारखाना बंद झाला तर या दुष्काळी भागाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे आणि उसासाठी माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना प्रस्थापितांच्या पायावर नतमस्तक व्हावे लागणार आहे याचाही सर्व लोकांनी गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे असे मत आता सर्वसामान्य शेतकरी व्यक्त करत आहे







