• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

भाजपाची मागच्या दहा वर्षांतील उपलब्धी काय आहे?.तुमच्या काळ्या, गोऱ्या पत्रिकेची पुंगळी तुमच्याकडेच ठेवा, आमच्या निषेधाची ही ‘लाल पत्रिका’ उद्वेगाने मांडत आहोत.

माणगंगा by माणगंगा
February 16, 2024
in मुंबई
0
भाजपाची मागच्या दहा वर्षांतील उपलब्धी काय आहे?.तुमच्या काळ्या, गोऱ्या पत्रिकेची पुंगळी तुमच्याकडेच ठेवा, आमच्या निषेधाची ही ‘लाल पत्रिका’ उद्वेगाने मांडत आहोत.

भाजपाची मागच्या दहा वर्षांतील उपलब्धी काय आहे?.

तुमच्या काळ्या, गोऱ्या पत्रिकेची पुंगळी तुमच्याकडेच ठेवा, आमच्या निषेधाची ही ‘लाल पत्रिका’ उद्वेगाने मांडत आहोत.

एडवोकेट शीतल श्यामराव चव्हाण यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई: भाजप हा आजघडीला जगातील सर्वात भ्रष्ट राजकीय पक्ष आहे. या पक्षाने सर्व विरोधी पक्षांवर मोठमोठ्या भ्रष्टाचाराचे आरोप केले, भ्रष्टाचार संपवण्याचे आणि काळा पैसा परत आणण्याचे आश्वासन दिले. मात्र सत्तेत येताच भ्रष्टाचारी लोकांना तुरुंगात घालून काळा पैसा चलनात, लोकोपयोगात आणायचे तर सोडूनच द्या पण सर्व भ्रष्ट लोकांना स्वत:च्या पक्षात सामील करुन घेवून या पक्षाने भ्रष्टाचाराच्या प्रकरणांना ‘क्लीन चीट’ देण्याचे सत्रच सुरु केले. नोटाबंदीच्या माध्यमातून गोरबरीबांना त्रास दिला व धनिकांचा काळा पैसा पांढरा करण्याच्या निमित्ताने शेकडो कोटींचा अपहार केला, सार्वजनिक मालकीच्या संस्थांची मनमानी पद्धतीने, किरकोळ किमतीत व आपल्या निकटच्या लोकांनाच विक्री करुन अब्जावधींचा मलिदा जमवला. उद्योगपती व भांडवलदारधार्जिने धोरण आणून हजारो कोटींचा ‘कॉर्पोरेट फंड’ पार्टीकडे वळवला.

म्हणजे भ्रष्टाचार संपवणे, काळा पैसा परत आणणे तर सोडाच पण आधीच्या सर्व भ्रष्टाचारांचे नियमितीकरण करुन, त्यांना ‘क्लिन चीट’ देवून नवनव्या भ्रष्टाचारांची व भ्रष्टाचाराच्या पद्धतींची निर्मिती या पक्षाने सत्तेत येवून केली. आधीचा भ्रष्टाचार एकेरी होता त्याला अधिक व्यापक करीत भाजपाने अनेक मार्गाने प्रशस्त केले, सदृढ केले, तीव्र केले आणि आधीच्यापेक्षाही कठोरपणाने व राजरोसपणे राबवले. या भ्रष्टाचाराविरुद्ध कुणी काही बोलले तर तो देशद्रोही आहे, धर्मद्रोही आहे असा वैचारिक भ्रष्टाचार सर्वत्र बिंबवला. पक्ष फोडणे, दुसऱ्या पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले शेकडो लोकप्रतिनिधी स्वत:च्या पक्षात घेणे, स्वायत्त संस्थांच्या गळ्यात सत्तेचे पट्टे घालून त्यांना आपल्या इशाऱ्यावर हाकणे, सैनिकांच्या बलिदानाचे श्रेयही निवडणूकांच्या रिंगणात चलनासारखे वापरणे, जाती-जातीत, धर्मा-धर्मात, नात्या-गोत्यात, माणसा-माणसात भांडणे लावणे, देवा-धर्माची कैफ चढवून गर्दीला उन्मत्त बनवणे असे अनेक नैतिक भ्रष्टाचारही भाजपने केले आहेत. जर्मनीच्या नाझी आणि इटलीच्या फॅसिस्ट पक्षाने लोकांना सरळसरळ संपवले पण भाजपा देश, देशातील जनता, देशाच्या संविधानाची मूल्ये क्षणाक्षणाला, रोजरोज तडपवून संपवत आहे.

पुढच्या कित्येक पिढ्या यातून सावरणार तर नाहीतच पण दिशाहीन होवून भरकटत, आपापसात भांडत राहतील याची तजवीज भाजपाने या दहा वर्षात केलेली आहे. म्हणून आधुनिक जगाच्या इतिहासात सर्वात क्रूर, अमानवी, हिंसक तसेच वैचारिक, नैतिक, आर्थिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय अशा सर्व पातळ्यांवरील भ्रष्ट पक्ष म्हणून नोंद होण्यास भाजप पात्र झाला आहे. हीच भाजपची मागच्या दहा वर्षांतील खरीखुरी उपलब्धी आहे. तुमच्या काळ्या, गोळ्या पत्रिकांची पुंगळी तुमच्याजवळच ठेवा पण जनतेला बेचिराख केल्याबद्दलची ही ‘लाल पत्रिका’ आज उद्वेगाने मांडण्याची वेळ आली आहे.

Views: 185
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
आटपाडीत वाळू माफीयाचे थैमान..शेतकऱ्यांच्या ओढापत्रतील पाईपलाईन टाकल्या उखडून.. महसूल विभागाचे दुर्लक्ष

आटपाडीत वाळू माफीयाचे थैमान..शेतकऱ्यांच्या ओढापत्रतील पाईपलाईन टाकल्या उखडून.. महसूल विभागाचे दुर्लक्ष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)