आटपाडीत वाळू माफीयाचे थैमान..
शेतकऱ्यांच्या ओढापत्रतील पाईपलाईन टाकल्या उखडून..
आटपाडी/प्रतिनिधि:
आटपाडी येथील खटकाळे मळा येथील ओढापात्रातील वाळू माफीयांनी वाळू उपसा मोठ्या प्रमाणावर केला आहे. नागेश देशमुख या शेतकऱ्यांची पाइपलाइन उघडुन टाकली आहे. यां बाबत तहसीलदार सागर ढवळे यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.
याच ओढापात्रालगत अनेक शेतकऱ्यांच्या बागायती शेती आहेत. आटपाडी तालुका हा पूर्वीपासूनच वाळू माफिया मुळे कायम चर्चेत असतो. वाळू माफीयांशी असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधामुळे याआधी अनेक महसूल अधिकारी वादात सापडले होते.
नूतन तहसीलदार संतोष ढवळे आल्यानंतर अवैद्यपणे होणारी वाळूची वाहतूक ही बंद झाली होती. परंतु थोड्याच कालावधीनंतर वाळूची वाहतूक पूर्वीप्रमाणे राजरोसपणे सुरू आहे. खटकाळे मळा येथील ओढापात्रातील वाळू उपसा होत असून ,सदर ओढा पात्रा जवळील पाईपलाईन सुद्धा वाळू तस्करांनी उकळून टाकले आहेत. ओढापत्रात मोठमोठे खड्डे पडले असून त्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांना वाळू माफीयांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तरी लवकरात लवकर वाळू माफीयावर कडक कारवाई करावी अशी मागणी शेतकरी नागेश देशमुख यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार संतोष ढवळे यांच्याकडे केली आहे.
चौकट.. तहसीलदार सागर ढवळे यांनी चार्ज घेतल्यानंतर काही प्रमाणात वाळू माफिया थांबले होती .परंतु पुन्हा मागले दिवस पुढे पुन्हा वाळू उपसा करणारणी डोकं वर करत आहे. यावर तह. ढवळे काम भूमिका घेतात याकडे नागरिकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
फोटो.आटपाडी येथील खटकाळे मळा ओढपत्रतील पाईप लाईन उखडून लकली आहे