नवविवाहितेच्या छळ प्रकरणी उपाळे(मायणी) येथील नवरा सासू सासऱ्यासह पाचजणांवर गुन्हा दाखल
कडेगाव प्रतिनिधी
विवाहितेस मारहाण शारीरिक व मानसिक त्रास,छळ करून माहेरी हाकलून दिल्या प्रकरणी उपळे मायणी तालुका कडेगाव येथील व सध्या भांडुप टेंभी पाडा येथील रहिवासी नवरा सचिन नामदेव पडळकर, सासु सौ.सुलभा नामदेव पडळकर, सासरा नामदेव रामचंद्र पडळकर, नणंद स्वाती नामदेव पडळकर आणि दिर अमोल नामदेव पडळकर, यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस ठाण्याकडून मिळलेली माहिती अशी की
विवाहिचे उपाळे मायणी येथील सचिन नामदेव पडळकर याचेशी हिंदुधर्मपद्धतीनुसार येडे उपाळे मायणी- तोंडोली रस्त्यावरील एका मंगल कार्यालयात साडे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. विवाहितेचे लग्न झालेपासुन पंधरा दिवसांनी सासरचे सर्वजण भांडुप, मुंबई येथे राहणेस गेले. तेथे सर्वजण आले नंतर थोडे दिवस व्यवस्थित राहीले. त्यानंतर विवाहितेस शुल्लक कारणावरून मारहाण करण्यास सुरुवात केली तसेच वेळोवेळी सासु, सासरे, पती, दिर हे तीला स्वयंपाक व्यवस्थीत करता येत नाही, या कारणावरुन माझा मानसिक शारीरिक छळ करीत होते. सासरचे लोक आज ना उद्या तिच्याशी व्यवस्थित वागतील म्हणुन ती सर्व काही त्रास सहन करीत होती.
या त्रासाबाबत ती माहेरच्या लोकांना बोलत नव्हती. फेब्रुवारी दोन हजार बाविस मध्ये फ्लॅट विकत घेणेकरीता पती सचिन, सासु सासरे, दिर, नणंद अश्यांनी तुझे वडीलांकडुन दोन लाख रुपये घेवुन ये असा तगादा लावला. वडीलांच्याकडून दोन लाख रुपये घेवुन तिने प्लॅट खरेदीच्या आशाने पतीला दिले. थोडे दिवसानंतर फ्लॅट चे देणे भागवणे करीता सासरचे लोकांना पैशाची गरज लागल्याने विवाहितेचे चार तोळे सोने मोडले पैशाची नड वाढल्याने सासरचे लोकांनी तीच्या वडीलांकडून 5 लाख रुपये ची मागणी केली.
त्यावेळी विवाहितेने माझे वडीलांकडे ऐवढे पैसे नाहीत माझे वडील गरीब आहेत असे सांगीतलेवर त्यांनी तीला आणखीनच त्रास देणेस सुरुवात केली.विवाहितेच्या वडीलांनी बँकेचे कर्ज काढून सासरच्या लोकांना 5 लाख रुपये दिले. त्यानंतर ही सासरचे लोक वारंवार शिवीगाळ, मारहाण करुन मानसिक व शारिरीक छळ करीतच होते.
तु तुझ्या वडीलांकडून अजुन दोन लाख रुपये घरखर्च भागवणेकरीता घेवुन ये नाहीतर तु इथे राहायचे नाहीस असे म्हणुन आई -वडीलांना फोन करुन बोलावुन घेतले.
विवाहितेच्या आई वडीलांनी तीच्या सासरचे लोकांना समजावून सांगणेचा प्रयत्न केला परंतू त्यांनी काही न ऐकता तुमची मुलगी येथे नांदवायची असेल तर आमची देणी भागवण्यासाठी दोन लाख रुपये द्या नाहीतर तुमची मुलगी घरी घेवुन जा असे म्हणून शिवीगाळ केल्याने तीच्या आई वडीलांनी तीला माहेरी घेवून गेले.
प्लॅट खरेदी करता सात लाख रूपये घेवुन ये असे सांगीतलेवर सात लाख रुपये देवुन ही परत घरखर्चा करिता दोन लाख रुपये घेवुन ये नाहीतर येथे नांदायचे नाही असे म्हणुन नवविवाहितेच्या आई वडीलांना शिवीगाळ करुन आई वडीलांसोबत माहेरी परत पाठवुन देवुन तीचा मानसिक व शारिरीक छळ केला आहे म्हणुन नवरा सचिन नामदेव पडळकर, सासु सौ. सुलभा नामदेव पडळकर, सासरे. नामदेव रामचंद्र पडळकर, दिर अमोल नामदेव पडळकर, आणि नणंद स्वाती नामदेव पडळकर सर्व रा उपाळे मायणी ता कडेगाव जि सांगली सध्या रा भांडुप टेंबीपाडा जुनीमुंबई यांचे विरुद्ध तक्रार कडेगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
अधिक तपास बिटचे सतीश मुळे,सौ.रुपाली आर सुतार करीत आहेत.