• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

आंदोलनानंतर प्रतिकात्मक पूजा करून हिंदु संघटनांची केंद्र सरकारकडे मागणी……मुंबईजवळील घारापुरी लेणीतील शिवपिंडीच्या पूजेचा अधिकार द्या !

माणगंगा by माणगंगा
February 16, 2024
in मुंबई
0
आंदोलनानंतर प्रतिकात्मक पूजा करून हिंदु संघटनांची केंद्र सरकारकडे मागणी……मुंबईजवळील घारापुरी लेणीतील शिवपिंडीच्या पूजेचा अधिकार द्या !

आंदोलनानंतर प्रतिकात्मक पूजा करून हिंदु संघटनांची केंद्र सरकारकडे मागणी

मुंबईजवळील घारापुरी लेणीतील शिवपिंडीच्या पूजेचा अधिकार द्या !

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई – युनोस्कोने जागतिक वारसा म्हणून मान्यता दिलेली मुंबईजवळील घारापुरी बेटावर ‘घारापुरी लेणी’ (एलेफंटा केव्हज्) हे भगवान शिवाचे प्राचीन स्थान आहे. हिंदूंचा सांस्कृतिक ठेवा आणि धार्मिक स्थळ असलेल्या घारापुरी येथे हिंदूंना पूजेचा अधिकार मिळावा, यासाठी हिंदु संघटनांनी जनआंदोलन करत केंद्र सरकारकडे मागणी करण्यात केली. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, हिंदु जनजागृती समिती आणि ‘सुदर्शन वाहिनी’च्या पुढाकाराने घारापुरी येथील शिवपिंडीची प्रतिकात्मक पूजाअर्चा केली. या वेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे आणि सुदर्शन वाहिनीचे मुख्य संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांनी या जनआंदोलनाचे नेतृत्त्व केले. या पूजाविधीसाठी घारापुरी ग्रामपंचायतीचे उपसरपंच बळीराम ठाकूर यांसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथून हातात भगवे ध्वज घेऊन ‘हर हर महादेव’, ‘जय श्रीराम’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या घोषणा देत धर्मप्रेमींनी घारापुरी लेणीकडे प्रयाण केले. येथील शिवपिंडीला गंगाजलाने अभिषेक करून पुष्प अर्पण करून सामूहिक आरती करण्यात आली. या ठिकाणी शिवस्तोत्राचे पठण करून हिंदूंनी ‘हर हर महादेव’चा जयघोष केला.

काय आहे प्रकरण ! : घारापुरी येथील लेणी ६-८ व्या शतकाची असल्याचे मानले जाते. येथील लेणी म्हणजे भारतीय शिल्पकलेचा सर्वोत्कृष्ट नमुना मानला जातो. येथे ५ गुंफांचे समूह असून या सर्व गुंफांमध्ये शैवलेणी कोरण्यात आली आहेत. पोर्तुगीजांच्या काळात या शिल्पांची तोडफोड केली गेली. ब्रिटिशांच्या काळात या शिल्पांवर गोळीबारीचा सराव करण्यात आला. त्यामुळे सद्यस्थितीत येथील बहुतांश शिल्पे भग्न झाली आहेत. ही लेणी केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारित असून येथील शिवपिंडीची पूजाअर्चा बंद आहे.

धार्मिकस्थळी पूजेचा अधिकार नसणे हा हिंदूंवरील अन्याय ! – रमेश शिंदे

केंद्रीय संसद समितीच्या अहवालानुसार पुरातत्व विभागाच्या अंतर्गत असलेल्या धार्मिक स्थळांच्या ठिकाणी पूजा करण्याची अनुमती देण्यात आली आहे. केंद्रीय पुरातत्व विभागाने जर त्यांच्या अखत्यारितील धार्मिक ठिकाणी पूजेची अनुमती दिली असेल, तर राज्यांनाही ती देण्यास काहीच हरकत नाही. जगन्नाथपुरी येथे कोणार्क सूर्यमंदिरात हिंदूंना पूजेचा अधिकार नाही. सूर्यदेवाची मूर्ती समोर असूनही हिंदूंना पूजा करता न येणे, हा एकप्रकारचा अन्यायच होय, असे हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी म्हटले आहे.

हिंदूंनी आपल्या संस्कृतीचा आदर केला, तर अन्यही करतील ! – रणजित सावरकर

जीवन जगतांना संस्कृतीचा अभिमान बाळगायला हवा. घारापुरी येथील लेणी आमची संस्कृती आहे. कुणासाठी ही श्रद्धास्थाने असतील, तर कुणासाठी पूजास्थाने असतील. दृष्टीकोन वेगवेगळे असू शकतात; मात्र ही लेणी आमच्या पूर्वजांनी घडवली आहेत, हे सत्य आहे. त्यामुळे त्यांचा अवमान करणे कुणालाही आवडणार नाही. कुणी आपल्या घरात यायचे आणि देवघरात चपला घालून शिरायचे, हे योग्य नाही. चर्चमध्ये जोडे घालून जाणे चालत असले, तरी हिंदूंच्या देवघरात चपला घालणे, ही आपली संस्कृती नाही. आपण आपल्या संस्कृतीचा आदर केला, तर अन्यही करतील, असे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर यांनी म्हटले आहे.

पुरातत्व विभागाच्या सर्व धार्मिकस्थळी हिंदूंना पूजेचा अधिकार मिळावा ! – सुरेश चव्हाणके

पुरातत्व विभागाच्या अखत्यारित असलेल्या मंदिरांमध्ये पूजा होत नाही; पण पुरातत्व विभागाच्या अखत्यारित असलेल्या मशिदींमध्ये नमाजपठण होते. पुरातत्व विभागाच्या अखत्यारितील हिंदूंच्या धार्मिकस्थळांमध्येही चप्पल घालून जातात. घारापुरी येथील धार्मिक स्थळाचीही अशीच स्थिती आहे. पुरातत्व विभागाच्या अखत्यारित हिंदूंची जेवढी धार्मिक ठिकाणे आहेत, त्या ठिकाणी पूजाअर्चा चालू करण्यासाठी अनुमती मिळावी, तसेच तेथे पादत्राणे घालून प्रवेश करण्यावर बंदी घालावी, अशी आमची मागणी असल्याचे सुदर्शन वाहिनीचे संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांनी म्हटले आहे.

घारापुरी लेणी हे शिवाचे स्थान आहे. त्यामुळे घारापुरी गुंफा सोमवारी बंद असू नये, अशी मागणी आम्ही यापूर्वीच भारतीय पुरातत्व विभागाकडे केली आहे. येथील शिवमंदिरात पूजन करता यावे, अशी मागणीही आम्ही शासनाकडे केली आहे, असे घारापुरी येथील उपसरपंच श्री. बळीराम ठाकूर यांनी या वेळी म्हटले.

Views: 214
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
साहेबांना लाख रु पगार, तरी फुकटचा रेशन सुटेना……साहेबांना लाख रु पगार, तरी फुकटचा रेशन सुटेना………..मयताचे नांवे कमी करुन नवीन सर्वे करण्यात यावा………..आता पर्यंत फक्त ४ अधिकारी यांनी स्वतःहून सोडले धान्य.

साहेबांना लाख रु पगार, तरी फुकटचा रेशन सुटेना……साहेबांना लाख रु पगार, तरी फुकटचा रेशन सुटेना………..मयताचे नांवे कमी करुन नवीन सर्वे करण्यात यावा...........आता पर्यंत फक्त ४ अधिकारी यांनी स्वतःहून सोडले धान्य.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)