प्रसाद कडव समाज भूषण पुरस्काराने सन्मानीत
आटपाडी- साहित्यभूमी वृत्तपत्राचे संपादक मा.श्री. प्रसाद बाळासो कडव यांना दिनांक २० एप्रिल रोजी आर्यरवी एंटरटेंनमेंट प्रोडक्शन मुंबई यांचे तर्फे राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय लघुपट चित्रपट मोहोस्तव सन २०२४ च्या निमित्ताने त्यांच्या सामाजिक, कला,तसेच पत्रकारितेच्या क्षेत्रातील योगदान पाहून त्यांना “समाज भूषण” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रसाद कडव हे पाक्षिक साहित्यभूमी वृत्तपत्राचे संपादक आहेत. त्यांची ओळख युवा संपादक म्हणून आहे.पत्रकारितेच्या, माध्यमातून ते समाज्या मधील लोकांना आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचे तसेच सत्यता सामाज्यापुढे ठेवण्याचे कार्य ते करत आहेत . आज पर्यंत त्यांना विविध पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांची पत्रकार क्षेत्रातील सुरुवात ३० मार्च २०१७ पासून सुरु झाली. आज पर्यत त्यांनी विविध संघटने मध्ये देखील राज्यस्तर, जिल्हा स्तर,व्यवस्थापन, अशा उच्च पदावर कार्य केलेले आहे. ते आपल्या जन्मदिना निमित्त दरवर्षी, विविध शाळांना आवशयक ती पुस्तके भेट देतात, वृक्षा रोपणाचे देखील त्यांनी कार्य केलेले आहे. विविध विषयावर त्यांनी विध्यार्थी यांना वेळोवेळी योग्य मार्गदर्शन केलेले आहे. आज पर्यंत देखील त्यांचे कार्य सुरूच आहे.
प्रसाद कडव – समाज्यामध्ये कोणत्याही कामाचा मोबदला न ठेवता आपले कार्य सतत निस्वार्थी पने केली, समाज त्याची योग्य ती दखल घेतोच. आर्यरवी एंटरटेंनमेंट प्रोडक्शन मुंबई यांनी ही दखल देत मला हा पुरस्कार देऊन माझी प्रेरणा, उर्जा आणखीनच वाढवली आहे.
या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन आर्यरवी एंटरटेंनमेंट प्रोडक्शन मुंबई चे संचालक मा श्री महेश तेटांबे यांनी राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय लघुपट चित्रपट मोहोस्तव सन २०२४ या निमित्ताने आयोजित केले होते.सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक मा श्री विजय पाटकर, अभिनेत्री सिद्धी कामथ. मा श्री मकरंद पाध्ये ( धर्मवीर चित्रपट,स्व.बाळासाहेब ठाकरे फेम),जेष्ठ कवी अरुण म्हात्रे ,अभिनेत्री गीता कुडाळकर, अभिनेते अनंत सुतार, अभिनेते सुरेश डाळे आदी मान्य वर होते. सदर पुरस्कार सोहळा मुंबई मराठी ग्रंथसंग्रालय नायगाव दादर पूर्व येथे संपान झाला.