आटपाडी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी महायुतीधर्म पाळावा.. संजयकाका पाटील यांना बहुमताने विजयी करा. ऍड.वैभवदादा पाटील
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी महायुतीधर्म पाळावा असे आव्हान सांगली जिल्हा राष्ट्रवादी (अजित पवार गटाचे )जिल्हाध्यक्ष ऍड.वैभवदादा पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
आटपाडी तालुक्यांमध्ये झरे ,दिघंची, आटपाडी व कारगणी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा(अजित पवार )गटातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत राष्ट्रवादी चे जिल्हाध्यक्ष ऍड .वैभवदादा पाटील यांनी आवाहन केले .
झरे येथील बैठकीत विटा अर्बन बँकेचे संचालक सचिन राजमाने, विजय अनुसे, नितीन वाघमारे, समाधान पाटील, रमेश शिंगाडे, रावसाहेब पिंजारी, विजय माने, कैलास पवार, धनंजय वाघमारे, रामचंद्र डिसले, केशव तरसे, सुखदेव खताळ, खाशाबा खताळ, चंद्रकांत खताळ, अर्जुन पारेकर, अशोक भानुसे, नागेश सूर्यवंशी, संतोष शिंगाडे, राजेंद्र शिंगाडे, दिलीप आंधळकर, प्रल्हाद आंधळकर, दत्तात्रय खोत, रवींद्र खोत ,तानाजी टिंगरे, पांडुरंग बाबर ,नितीन कारंडे, महेश डोंगरे, बाळू पवार ,ज्ञानेश्वर होळे, विजय माने,गजानन माने, विशाल मोटे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकी मध्ये सर्वच कार्यकर्त्यांनी आपापल्या अडचणी मांडल्या . तर अनेक कार्यकर्ते आक्रमक विचार मांडत होते या वेळेला ऍड .वैभव पाटील यांनी तुमच्या सर्व अडचणी सोडवल्या जातील.तसेच आजपर्यंत कोणत्याच कार्यकर्त्याला दुरावा दिला नाही व पुढील काळात ही दुरावा देणार नाही .असा शब्द कार्यकर्त्यांना दिला.
आपल्याला पक्षाचा आदेश आहे तो पाळावयाचा आहे .त्यामुळे सर्वांनी एकजुटीने महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांचे काम जोमाने करून त्यांना विजयी करायचे आहे. असे आव्हान ऍड.वैभव पाटील कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले.