आटपाडी तालुका कृषी कार्यालयात कामगारांचा वनवा… असून तोटा तर नसून खोळंबा ….दीड तासाहून अधिक एकही अधिकारी उपलब्ध नसल्याने शेतकरी त्रस्त.
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांचा आत्मा म्हणजे तालुका कृषी कार्यालय होय . याच कार्यालयातून शेतकऱ्यांना संजीवनी मिळण्यासाठी अनेक योजना मिळतात त्याचा लाभ थेट शेतकऱ्यांना होतो. परंतु या कार्यालयामध्ये अधिकारी असून तोटा आणि नसून खोळांबा अशी अवस्था झाली आहे.20 जून रोजी दुपारच्या सत्रात 12 ते 1.30 च्या दरम्यान तालुक्यातील अनेक शेतकरी कृषी कार्यालया मध्ये आले होते
.परंतु या कृषी कार्यालयामध्ये एकही अधिकारी उपलब्ध नव्हते. त्यामुळे अनेक शेतकरी कार्यालयाकडे येत होते आणि पुन्हा परत जात होते.एक तर कृषी कार्यालय प्रशासकीय इमारत दुसऱ्या मजल्यावर आहे.अनेक वयोवृद्ध शेतकऱ्यांना दुसऱ्या मजल्यावर जाताना व येताना त्यांना त्रास होत होता. वयोवृद्ध नागरिकांची दमछाक होत होती.
परंतु या अधिकाऱ्यांना याचं काहीही घेणं देणं नाही.तालुक्यातून 70 किलोमीटर वरून कृषी कार्यालय मध्ये शेतकरी अनेक योजनांची माहिती विचारण्यासाठी किंवा पूर्वी दिलेले प्रस्ताव पाहण्यासाठी येत असतात ,परंतु या कार्यालयामध्ये अधिकारीच उपलब्ध नसल्याने अनेक शेतकऱ्यांना कार्यालयाच्या बाहेर ताटकळत बसावे लागत आहे.शेतकऱ्याला हेलपाटा झाला काय आणि नाही काय याचे अधिकाऱ्यांना काही घेणं देणं नाही.
वयोवृद्ध नागरिक एसटीने तालुक्याला येतात व परत एसटीने जातात. एसटीच्या वेळेत त्यांना बस थांब्यावरती थांबावे लागते. जर एसटी चुकली तर काय करायचे याचं कृषी विभागाला कोणतेही गांभीर्य नाही.कृषी विभागांमध्ये शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक योजना येतात ,परंतु अधिकाऱ्याकडून त्या योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाहीत .तर अनेक वेळा कार्यालय ओस पडलेले असते
.त्यामध्ये एक ही अधिकारी नसतो. आणि जर एखादा अधिकारी असेल तर शेतकऱ्यांना व्यवस्थित माहिती देत नसल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा नाहक त्रास होत आहे.तरी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन शेतकऱ्यांसाठी कायमस्वरूपी अधिकारी उपलब्ध राहण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.फोटो .आटपाडी तालुका कृषी कार्यालय 12 ते 1.30 च्या दरम्याने असे ओस पडले होते.