तऱ्हाडी विद्यालयात बालमजुरी प्रतिबंधक जनजागृती कार्यक्रम
तऱ्हाडी:-येथील स्व.आण्णासो साहेबराव सोमा पाटील माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर सायन्स कॉलेज तऱ्हाडी येथे लुपिन फाउंडेशन शिरपूर यांच्या वतीने बालमजुरी प्रतिबंधक कायदा जनजागृती बद्दल कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सुभाष भामरे व संचालिका उज्वला भामरे मुख्याध्यापक रावसाहेब चव्हाण लुपिन फौंडेशनचे व्यवस्थापक हर्षल बागुल कृषी मित्र संदीप पाटील. कृषी मित्र अक्षय पाटील. ज्येष्ठ शिक्षक भरत मराठे यांच्या उपस्थित संपन्न झाला
यावेळी कृषी मित्र अक्षय पाटील यांनी विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना बालमजुरी चे दुष्परिणाम व कायद्याने तो गुन्हा आहे याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीची भावना निर्माण केली व या वयात बालमजुरी न करता शिक्षण घेतले पाहिजे शिक्षणाणे स्वतःचा व परीवाराचा विकास होतो . तसेच गावातून बालमजुरी प्रतिबंधक कायदा या विषयी बद्दल गावातील लोकांमध्ये जनजागृती व्हावी यामुळे रॅलीचे आयोजन करण्यात आले . लुपिन फौंडेशन तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट वाटप करण्यात आले . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक आर एस चव्हाण व सुत्रसंचलन अनिल पाटील यांनी मानले व आभारप्रदर्शन भावेश पाटील यांनी केले


