आटपाडी पोलिसांची दबंगगिरी,, न्याय मागणाराच चोपले…. तक्रारदार जखमी
पोलीस निरीक्षक यांचेकडे लेखी तक्रार ….
आटपाडी पोलिसांची दबंगगिरी,, न्याय मागणाराच चोपले…. तक्रारदार जखमी
पोलीस निरीक्षक यांचेकडे लेखी तक्रार ….
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी पोलीस स्टेशन मध्येब दीलेल्या तक्रारीची चौकशी करायास गेलेले तक्रारदार यांनाच पोलीस कर्मचारी प्रमोद रोडे, यांनी पोलिस स्टेशनमध्ये विनाकारण कोंडुन केलेली मारहाण व शिवीगाळ केल्या बाबत पोलीस निरीक्षक यांचे कडे रीतसर तक्रार केली आहे.
याबाबत माहिती अशी की शरद गोरख भालेराव यांनी पोलिस स्टेशनला दि. १२/०८/२०२४ रोजी तक्रारी अर्ज दिला आहे. त्या संदर्भात पोलिस स्टेशनला गेले असता तेथील कर्मचारी प्रमोद रोडे कडे तो तक्रार अर्ज तपासासाठी आहे अशी माहिती पी. आय. विनय बहिर यांनी सांगितले. त्या सदर्भात आम्ही पोलिस कर्मचारी प्रमोद रोडे यांची १६/०८/२०२४ रोजी भेट घेतली व त्या आधी आम्ही दि. ०८/०८/२०२४ रोजी पासुन पोलिस स्टेशनला येत होतो आमचा अर्ज दि. ११/०८/२०२४ रोजी उपस्थित ठाणे आमलदाराने घेतला होता मात्र कसलीही अर्जाची पोहच न देता माघारी पाठवुन उदया दि. १२/०८/२०२४ रोजो पोलिस स्टेशनला या तुम्हाला पोहच देतो असे सांगण्यात आले व १२/०८/२०२४ रोजी आम्हाला पोहच दिली. दि. १३/०८/२०२४ ला तुम्ही या तक्रारदार व जाबदारानां बोलावुन घेतो असे सांगण्यात आले होते.
परंतु दि. १३/०८/२०२४ ला पोलिस स्टेशनला गेलो असता आम्हाला दिवसभर थांबवून कोणत्याही प्रकारचा तपास न करता आम्हाला परत दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले तसेच पुढे आम्ही दि. १३/०८/२०२४ ते दि. १६/०८/२०२४ पर्यंत वारंवार पो. स्टे. ला येत होतो. मात्र जाबदारला पोलिसांनी वारंवार संपर्क करुनही जाबदार आले नाहीत. मात्र दि. १६/०८/२०२४ रोजी रात्री पोलिस कर्मचारी प्रसाद रोडे यांनी रात्री उशीरा ७ च्या दरम्यान सांगितले की, उदया दि. १७/०८/२०२४ रोजी सकाळी पोलिस स्टेशनला मी जाबदाराला सकाळी बोलावुन घेतो व तुमचा अर्ज निकाली काढतो असे सांगितले
त्याप्रमाणे आम्ही सकाळी ११ च्या दरम्यान गेलो व तेथे पो. कर्मचारी प्रमोद रोडे नसल्यामुळे आम्ही त्यांची येण्याची वाट पाहीली व ११.३० ते” १२.०० वाजण्याच्या दरम्यान पो. कर्मचारी प्रमोद रोडे यांनी बसलेल्या रुम मध्ये आम्हाला बोलावले व आम्ही आतमध्ये गेलो असता पोलिस कर्मचारी प्रमोद रोडे बसलेले होते. प्रमोद रोडे यांनी माझा मित्र शरद भालेराव यांने दिलेल्या तक्रारी अर्जातील जाबदाराला आमच्या समोर न बोलविता फक्त मला (अजित जाधव) व तक्रारी अर्जदार शरद भालेरावला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली व शिवीगाळ करता करताच अचाणक खुर्चीवरुन उठले व दार बंद केले व मला (अजित जाधव) “तू कधी पैसे देणार आहेस त्या माणसाचे … आताच्या आता पैसे दे नाहितर तुला उगडा करुन मारील. ” असे म्हणुन आय घाल्या बहनचोत .. मादरचोत.. जाधवा तुझी जातच तसली आहे… जाबदारचे पैसे दे असे म्हणत होते.
मी त्यांना विनंती केली की, साहेब मला एका महीन्याची मुदत दया मी लेखी लिहुन दयाला तयार आहे. असे म्हणत असताना अचानकपणे त्यांनी खोलीचे दार बंद केले व माझी कॉलर पकडुन पोलिस कर्मचारी प्रमोद रोडे यांनी हाताने कानाखाल्या मारण्यास सुरुवात केली .त्यांच्या मारहाणीमध्ये मी खाली पडलो असता त्यांनी मला लाथा बुक्यांनी ही मारहाण केली माझ्यासोबत आसलेला माझा मित्र शरद भालेराव यांनी ही हात जोडुन साहेब त्याला मारु नका अशी विनंती केली परंतु साहेब कोणत्याही परीस्थितीत ऐकण्याच्या मनस्थिीती नव्हते ते आणखीनच जोर जोरात मारु लागले. त्यानंतर त्यांनी खोलीचे दार उघडुन आम्हाला बाहेर काढले.
त्यानंतर माझ्या तोंडावर मारलेचे वळ उमटले असल्यामुळे व मला अस्वस्थ वाटु लागल्यामुळे माझ्या मित्राने म्हणजेच शरद भालेराव यांने मला आटपाडी ग्रामीण रुग्नालयात उपचारासाठी आणले त्यानंतर माझ्यावरती उपचार करण्यात आले . त्यानंतर रुग्नालयातील कर्मचारींनी मारहाणीची माहीती आटपाडी पोलिस स्टेशनला कळवीली होती.
एका पोलिस शिपायास गुन्हयातील तपास करण्याचा कोणताही अधिकार नसताना माझ्याकडे तपास आहे. असे सांगुन व त्या तपासा दरम्यान फिर्यादी पक्षाच्या मित्रासच पोलिस शिपाई प्रमोद रोडे यांचेकडुन अमानुष मारहाण करण्यात आली. तरी माझी पोलिस स्टेशनचे कर्मचारी प्रमोद रोडे यांचे विरुदध मला केलेल्या अमानुष मारहाण तसेच अर्वाच्य भाषेत केलेल्या शिवीगाळी चे पोलिस स्टेशन मधील दि. १७/०८/२०२४ रोजीचे सी.सी. टीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपास करुन पोलिस स्टेशनचे कर्मचारी प्रमोद रोडे यांचे विरुदध योग्य ती कायदेशीर कार्यवाही करुन मला न्याय दयावा. अश्या आशयाचे निवेदन पोलीस निरीक्षक बहिर यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
फोटो…पोलीस अधिकाऱ्यांच्या मारहाणीत तक्रारदार अजित जाधव युवक जखमी