झरे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून पाणवन आश्रमात आनंदाचे रक्षाबंधन
महाराणी देवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन सोसायटी सांगलीचे, पद्मभूषण डॉ. क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी कला महाविद्यालय, झरे मधील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेविकांनी पानवण ता. माण येतील आश्रमात जाऊन तिथल्या मुलांना राख्या बांधून सामाजिक भान जपत रक्षाबंधन सण साजरा केला.
यावेळी आश्रमातील मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला. त्यानंतर त्या लहान मुलांना खाऊ वाटप केले.महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य आर.एच. पाटील यांनी आपल्या महाविद्यालयाच्या स्वयंसेवकांना आश्रमातील विद्यार्थ्यांची दिनचर्या समजावून घेण्यास सांगितले. आश्रमाचे संस्थापक सखाराम तोरणे गुरुजी आणि रमा तोरणे यांच्याशी चर्चा करून आश्रमाची स्थापना ते एकूण चोवीस वर्षांचा म्हणजे दोन तपांचा प्रवास जाणून घेतला.
त्याचबरोबर तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तोरणे गुरुजींनी भाऊ बहिण नात्यावर आधारित असणारी दोन गाणी सुरपेटीवर गाऊन सर्व विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले. शिवाय कलेचे महत्व सांगताना त्यांनी सांगितले की मी स्वतः टेलिव्हिजनवरील दोन मालिकांमध्ये काम केले आहे. जर तुमच्याकडे कला असेल तर आपण उपाशी राहू शकत नाही. त्यानंतर उमाकांत तोरणे यांनी आश्रमातील एक एक मुले, मुली कोणत्या परिस्थितीतून आली आहेत.
हे प्रत्येक मुलाची करून काहींनी प्रकाशात आणत सांगितले. ऊसतोड मजुरांची, नाचगाणे करून आपले पोट भरणारे, भयानक आजाराने आई बाप मृत्यू पावलेले आणि त्यांच्या मुलांना समाजाने वाळीत टाकले. अशी सर्व मुले आम्ही सांभाळत आहोत हे सांगितले.
आश्रमास भेट देऊन विद्यार्थ्यांना रक्षाबंधन सणाचा आनंद दिल्याबद्दल, तोरणे कुटुंबीयांनी प्राचार्यांचे, एन.एस.एस कार्यक्रमाधिकाऱ्यांचे, महाविद्यालयाचे आणि प्राध्यापक, प्राध्यापिका, विद्यार्थिनी यांचे आभार मानले. यावेळी महाविद्यालयातील , प्रा. एस. डी. मुलाणी, प्रा. डी.एस. देवकुळे,प्रा. सौ. आर. व्ही. काळेल, प्रा. एन.डी. पाटील, प्रा. एम.एस.शिंगाडे, प्रा. व्ही. ए. खिलारी, प्रा. एम.एस. माने, प, प्रा. ए. एम. माळी, श्री. एम.पी. नरळे, श्री. दत्ता सुळे आणि तोरणे कुटुंबीय उपस्थित होते.


