आम्.गोपीचंद पडळकर यांना”उत्कृष्ट संसदपटू” व “उत्कृष्ट भाषण” पुरस्कार जाहीर
आटपाडी प्रतिनिधी
विधान परिषदेचे सदस्य आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कामाची पोहोच म्हणून त्यांना राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेतर्फे सन २०२३-२४ करिता महाराष्ट्र विधानपरिषद “उत्कृष्ट संसदपटू” पुरस्कारासाठी निवड झाली असून दुसरा पुरस्कार “उत्कृष्ट भाषण” या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
एकाच वेळेला उत्कृष्ट संसदपटू व उत्कृष्ट भाषण असे दोन पुरस्कार जाहीर झाले आहेत . या पुरस्कारामुळे पडळकर यांच्या च्याहत्यामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम मंगळवार, दिनांक ०३ सप्टेंबर, २०२४ रोजी दुपारी ०३.३० वाजता मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे मा. राष्ट्रपती महोदयांच्या शुभहस्ते होणार आहे.
सध्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडे महाराष्ट्र विधान परिषद सदस्य व भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पद आहे. त्यांना उत्कृष्ट संसदपटू” व “उत्कृष्ट भाषण” असे दोन पुरस्कार जाहीर झाल्याने भाजपमध्ये व त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.