मातीपासून पणती बनविण्यात कारागीर व्यस्त..
‘फिरत्या चाकावरती देशी पणतीला’ आकार
इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या चकाकीत मातीच्या दिव्याचा प्रकाश काही मंद होत आहेत
त-हाडी : दिवाळी प्रकाश पर्व अगदी जवळ म्हणजे तोंडावर येऊन ठेपला असून.सगळीकडे घराघरामधून दिवाळीची तयारी आणि लगबग जोरात सुरुझाली आहेत.दिवाळीत रांगोळी आणि पणत्याविना या उत्सवाची चकमकच अपूर्ण राहते. त्यामुळे कुंभारवाड्यात आता ‘फिरत्या चाकावरती देशी पणतीला’ आकार अशा पणत्या तयार करण्याचा वेग वाढलेला आहे. कुंभारवाड्यात मोठ्या प्रमाणात मातीची दिवे बनविण्यात सुरुवात झाली आहे. यंदा लक्ष्मी प्रसन्न होऊन आपली दिवाळी उजळून निघेल, अशी अपेक्षा कुंभार कारागिरांना असली तरी
दुसरीकडे आधुनिक युगात वेगवेगळ्या प्रकारच्या पणत्या विक्रीला येत असतात. विशेषतः परराज्यातूनही सुबक पणत्या येत असल्या तरीही दिवाळीच्या सणाला मात्र मातीच्याच पणत्या लावून घर उजळण्याची परंपरा ग्रामीण भागात गेली अनेक शतके सुरु आहेत ऐन दिवाळीत महागाई ने कमरडे मोडले आहेत
अशा परिस्थितीत दिवाळी जवळ आल्याने कुंभार समाज दिवे बनविण्यात व्यस्त आहे. ग्रामीण भागात ही कुंभार व्यवसाय कसा तरी तग धरून आहे. त्यामुळे सर्वत्र मातीच्या पणत्या बनवण्याची लगबग सुरू आहे. मातीच्या पणत्या बनविताना आई- वडिलांसोबत मुलेही मातीची दिवे, भांडे, खेळणी, लक्ष्मीच्या मुर्त्या, किल्ले बनविण्यास मदत करत आहेत. कोणी माती मळण्यात व्यस्त आहेतरकोणीहात चाकावर मातीची भांडी घडवत आहेत. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी दिवे लावले जातात. आपल्या अंगणात दिवा लावला की, ‘दिवाजळे आणि विघ्ण टळे अशी म्हण कायम आहे.
उदरनिर्वाहाचे संकट !
आधुनिकतेच्या युगात दिव्याची जागा विद्युत दिव्यांनी घेतली आहे, अशा स्थितीत कुंभार कारागिरासमोरील उदरनिर्वाहाचे संकट अधिक गडद झाले आहे. चिनी दीपमाळांनी तर या कुंभाराचे अधिकच नुकसान केले आहे. वर्षभर या सणाची वाट पाहणाऱ्या कुंभाराची दिवाळी आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. नवीन पिढी कुंभारी कामापासून दूर जात आहे. दिवाळी आणि उन्हाळ्यात मातीपासून बनलेल्या भांड्यांना मागणी वाढत असते, पण बाजारपेठेतील इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या चकाकीत मातीच्या दिव्याचा प्रकाश मंद होत आहे नागरिक हे मातीच्या पणत्याचा वापर केवळ पूजेसाठी करीत आहेत, त्यामुळे त्यांना त्यांच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळत नाही. त्यामुळे कुंभार समाजातील नवीन पिढी ह्या कामापासून दूर जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.


