त-हाडी परिसरात शिक्षीका वाटत आहे घरोघरी “पोलचिट”
त-हाडी- प्रतिनिधी
शिरपूर तालुक्यातील त-हाडी येथील परिसरात जिल्हा परिषद शाळेचे शिक्षकवृंद मतदान केंद्र स्तरीय अधिकारी गावात घरोघरी जाऊन पोलचिट वाटत आहे.०९ शिरपूर मतदार संघातील शहरात व गावात निवडणूक विभागाने मतदार पोलचीट वाटपसाठी आदेश देण्यात आले आहे.विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला केवळ ६ दिवस उरले आहेत.
राजकीय पक्ष, उमेदवार यांच्या प्रचाराचे घमासान अंतिम टप्प्यात आहे. शिक्षकदेखील निवडणुकीच्या कामात व्यस्त झाले आहेत. प्रत्येक मतदाराच्या हातात मतदारचिठ्ठी देण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे. आणि शिक्षक ते काम अतिशय चोख करत आहे.विधानसभा निवडणुकीचे मतदान २० नोव्हेंबरला होत आहे तत्पूर्वी १५ नोव्हेंबर पर्यंत प्रत्येक मतदाराचे हातात मतदारचिठ्ठी पोहचण्याची जबाबदारी मतदान केंद्र केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांची आहे. शिक्षकांसोबत विविध शासकीय यंत्रणातील कर्मचारी निवडणुकीच्या कामकाजात व्यस्त झाले आहेत.
या कर्मचाऱ्यांचे आतापर्यंत दोन वेळा प्रशिक्षण वर्ग देखील झाले आहे. काही शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी नेमण्यात आले आहे. निवडणूक विभागाने तयार केलेल्या मतदार चिठ्ठ्या (वोटर स्लिप) मतदारापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी शिक्षक यांच्यावर देण्यात आली आहे. निवडणूक यंत्रणेत सहभाग हे राष्ट्रीय कर्तव्याचा भाग आहे. लहान गावात एक – दोन दिवसात मतदारचिठ्ठ्यांचे वाटप करण्यात आले. मात्र मोठ्या गावात शहरांमध्ये हे काम मागील ६ दिवसांपासून सुरू आहे.
शिक्षक स्वतः मतदारचिठ्ठीचे वाटप करीत असताना मतदारांचे स्थलांतर, भाड्याचे बदललेले घर, पत्त्यात बदल झाला असल्यास त्याची नोंद घ्यावी लागते. काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी कमी झालेल्या मतदान केंद्रावरील शिक्षकांनी मतदान जनजागृती केलेली आहे.
जिल्हा निवडणूक अधिकारी जिल्हाअधिकारी धुळे यांच्या आदेशाने त-हाडी परिसरात जेष्ठ नागरिक, नवमतदारांसह सर्व मतदारांना पोलचिटचे (मतदान माहिती चिठ्ठी)वाटप करत आहे. ८५ वर्ष वयाच्या ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग नागरिकांना होम व्होटिंग ची पूर्व कल्पना शिक्षक दिली आहे . यापैकी काही मतदार हे होम व्होटिंग करणार आहेत दि.१४/११/२४ रोजी पासून १२ डी फार्म भरून मतदारांनी घरी पोस्टल मतदान करण्याचा पर्याय स्वीकारला आहे. दिव्यांग , जेष्ठ नागरिक यांना होम वोटिंग लाभ मिळणार असल्याचे माहिती शिक्षीका शिवागी देवरे व योगिता पाटील यांनी प्रतिनिधीशी यांच्याशी बोलताना सांगितले आहे.