अबॅकस राष्ट्रीय स्पर्धेत शिंदखेडा शहरातील विनिंग प्रोॲक्टिव्ह अबॅकसच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश….
दि. 18 नोव्हेंबर रोजी धुळे येथील हिरे भवन येथे प्रोॲक्टिव्ह अबॅकसतर्फे विभाग स्तरावर राष्ट्रीय स्पर्धा घेण्यात आली. त्यात धुळे, जळगाव, नंदुरबार अशा तीन जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसह शिंदखेडा येथील विनिंग प्रोॲक्टिव्ह अबॅकसच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेचा निकष असतो सहा मिनिटात शंभर गणित सोडविणे. त्यात वेदांत सोनवणे, चैतन्य पाटील, वेदांत मराठे, अरहान कलाम, युगंधर कासार, सृष्टी देसले, हेतल कासार, योगिता पानपाटील, अश्विनी पाटोळे या 9 विद्यार्थ्यांनी 6 मिनिटापेक्षा कमी वेळेत पेपर सोडवून चमकदार कामगिरी करत विजयी ट्रॉफीचे शिलेदार ठरले व इतर 22 विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल प्राप्त करून शिंदखेडा शहराचे नावलौकिक केले.
दि. 30 जानेवारी रोजी कोल्हापूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील अंतिम स्पर्धेसाठी वेदांत सोनवणे, चैतन्य पाटील, अरहान कलाम, युगंधर कासार, सृष्टी देसले, योगिता पानपाटील, अश्विनी पाटोळे या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शिंदखेडा शहरातील नागरिक व पालकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना विनिंग प्रोॲक्टिव्ह अबॅकसचे संचालक श्री. रितेश देविदास कापुरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.


