• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

बंदोबस्त मायणीत राडा अंबवडेत ,शिवजयंतीत डीजे लावण्यावरून हुल्लडबाजी

माणगंगा by माणगंगा
February 21, 2025
in Uncategorized
0
बंदोबस्त मायणीत राडा अंबवडेत ,शिवजयंतीत डीजे लावण्यावरून हुल्लडबाजी

बंदोबस्त मायणीत राडा अंबवडेत

शिवजयंतीत डीजे लावण्यावरून हुल्लडबाजी

मायणी :- प्रतिनिधी ,दत्ता कोळी

                  काल बुधवारी संपूर्ण जगात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी झाली. प्रशासनाकडून पारंपरिक वाद्य ,देखावे,आणि आवाजाची मर्यादा पाळण्याच्या सूचना देऊनही काही ठिकाणी मंडळे डिजेचा दणदणाट व एकमेकांवर वर्चस्व दाखवण्याचा अट्टाहास करताना दिसून आली. शिवजयंतीच्या निमित्ताने मायणी येथे वडुज पोलीस प्रशासनाकडून संभाव्य वादाची परस्थिती टाळण्यासाठी तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. परंतु, मायणी शिवजयंती शांततेत पार पडली आणि अंबवडेत डीजेच्या दणदणाटावरून जोरदार वाद पेटला. यामुळे पोलिसांनी हुल्लडबाजाची हयगय न करता अनेकांना "काठीचा प्रसाद वाटावा लागला".

               वडुज पोलीस ठाण्याचे ठाण्याचे पोलिस निरीक्षण घनश्याम सोनवणे यांनी शिवजयंती पारंपरिक उत्साहात परंतु कायद्याचे उल्लंघन न करता पार पाडण्याचे आवाहन केले होते. यास अनेक गावात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.पोलीस ठाण्याच्या अंतर्गत अनेक गावात जिवंत देखावे, शिवज्योत,रक्तदान, पोवाडे, पारंपरिक वाद्ये यांच्यासह जयघोषात शिवजयंती पार पडली. मायणी येथे दरवर्षी एकच जयंती संपन्न होत असताना यंदा सार्वजनिक शिवजयंती उत्सव पार पाडण्याच्या नियोजनात अचानक बदल होऊन सार्वजनिक शिवजयंती  उत्सव समिती मार्फत व सुरेंद्रदादा युथ क्लब मार्फत अशा चांदणी चौक येथे एकाच ठिकाणी दोन शिवजयंती साजरा करण्याचा अचानक निर्णय करण्यात आला. गावात बाबर टेक्स्टाईल मार्फत पारंपरिक पोवाडे व पूजन आरती व आजिंक्य उद्योग समूहाकडून रक्तदान आयोजित करून शिवजयंती साजरी करण्यात आली.

              मायणी चांदणी चौकात दोन आयोजकांकडून शिवजयंती एकाच ठिकाणी साजरी करण्यात येणार असल्याने पोलीस प्रशासनाने संभाव्य वादाची पार्श्वभूमी म्हणून याठिकाणी तगडा बंदोबस्त तैनात केला होता .दोन्ही आयोजकांना नियोजन बद्धतेप्रमाने कार्यक्रम व मिरवणुकीत वेळेत फरक ठेऊन कार्यक्रम करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. तरीही मिरवणुकी दरम्यान समोरासमोर डीजे वाजवण्याचा अट्टाहास दोन्ही बाजूने करण्यात आला होता. परंतु पोलिसांचा योग्य बंदोबस्त यामुळे कोणताही अनुचित प्रकार याठिकाणी घडला नाही. परंतु मायणी येथे ऐन भरात शिवजयंती असताना अंबवडे ता. खटाव येथे आयोजित दोन मंडळाकडून डीजे वाजवण्याचा प्रकारावरून बाचाबाची सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सोनवणे यांना मिळाली. त्यांनी मायणी येथील पोलीस बंदोबस्त तातडीने अंबवडे येथे हलवला. त्याठिकाणी डिजेचा आवाज कमी करण्याच्या सूचना देण्यासाठी गेलेल्या पोलीस प्रशासन कर्मचाऱ्याला उद्दट उत्तर देऊन उलट जाब विचारण्याचा प्रकार अंबवडे येथील काही हुल्लडबाजी करणाऱ्यांनी केला. 

              संबंधित प्रकार पोलीस अधिकाऱ्यांनी पाहताच घटनास्थळावर जाऊन संबंधित हुल्लडबाजांवर डंडे का प्रसाद बरसताच ताबडतोप अंबवडे गावात भयाण शांतता पसरली. अंबवडेत मोठ्या उत्साहात दिवसभर सुरू असलेल्या देखण्या कार्यक्रमांचा शेवट हुल्लडबाजी मुळे रात्री सर्वत्र नाराजी पसरविणारा ठरला. गावागावात डिजे,डॉल्बी बाबत नाराजी असतानाच या प्रकारामुळे सदैव शांत आणि संयमी असणाऱ्या पोलीस निरीक्षक सोनवणे यांचा आक्रमक बाणा पाहून हुल्लडबाजी करणाऱ्यांच्या भय आणि लोकांना हायसे आणि आश्चर्य वाटले. 

           शिवजयंतीच्या निमित्ताने संपूर्ण जग आपल्या राजाची त्यांनी दिलेल्या शिकवणी नुसार परंपरेला अनुसरून हा उत्सव साजरा करीत असताना काही ठिकाणी वयक्तिक आनंदासाठी गाव वेठीस धरून होणाऱ्या अशा सार्वजनिक कार्यक्रमातील हुल्लडबाजीला जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनाने कठोर नियमांनी बांधून ठेवणे गरजेचे बनले आहे.
Views: 105
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
आपल्या इतिहासाचे वस्तुनिष्ठ पुनर्लेखन व्हायलाच हवे…ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

आपल्या इतिहासाचे वस्तुनिष्ठ पुनर्लेखन व्हायलाच हवे…ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)