• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

एकजूट सणगर समाजाची सदैव पाठराखण करणार – सुरेंद्र गुदगेबहुप्रतिक्षेतील समाज मंदिराचे उद्घाटन संपन्न : समाजात आनंदोत्सव

माणगंगा by माणगंगा
March 4, 2025
in Uncategorized
0
एकजूट सणगर समाजाची सदैव पाठराखण करणार – सुरेंद्र गुदगेबहुप्रतिक्षेतील समाज मंदिराचे उद्घाटन संपन्न : समाजात आनंदोत्सव

एकजूट सणगर समाजाची सदैव पाठराखण करणार – सुरेंद्र गुदगे
बहुप्रतिक्षेतील समाज मंदिराचे उद्घाटन संपन्न : समाजात आनंदोत्सव

मायणी दि.४ :- प्रतिनिधी


सणगर समाजाने गेल्या वर्षी केलेल्या समाज मंदिराची मागणी आज पूर्ण झाली आहे. फक्त आश्वासन न देता ग्रामपंचायतीकडून गावात जागा उपलब्ध करून देऊन दहा लाख रुपयांची देखणी समाज मंदिराची इमारत आज प्रत्यक्ष उभा राहिली आहे. भूतकाळातील बाबींकडे आम्ही लक्ष न देता या कामासाठी सर्व समाज एकजूट झाला ही बाब आम्ही पहिली.या कामासाठीच नाही तर आपली प्रत्येक मागणी पूर्ण करण्यासाठी हा सुरेंद्र गुदगे सदैव तत्पर राहून आपल्या एकजूट समाजाची सदैव पाठराखण करेल, अशी ग्वाही सुरेंद्र गुदगे यांनी समस्त सणगर समाजाला दिली.


ते मायणी येथील इंदिरानगर परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या सणगर समाज मंदिर सभागृहाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी सरपंच सोनाली माने, उपसरपंच दादासो कचरे, मार्केट कमिटी संचालक स्वप्नील घाडगे, यशवंत सोसायटी चेअरमन अनिल माळी, रणजित माने,ग्रामपंचायत सदस्य समीर नदाफ, ऋत्विक गुदगे, हेमंत जाधव,महेश थोरात,युवराज भिसे,किशोर माळी , चंद्रकांत भोंगाळे, हणमंत भोंगाळे ,शिवाजी भोंगाळे ,लक्ष्मण भोंगाळे ,अधिकराव भोंगाळे, एसकुमार भोंगाळे, तंटामुक्ती कमिटीचे अध्यक्ष प्रकाश कणसे,माजी मार्केट कमिटी संचालक अरुण जाधव , पापाभाई नदाफ, महादेव माळी, मायणी अर्बन बँकेचे संचालक अन्सार इनामदार, संजय कांबळे, अभिजित कचरे, शिवप्रसाद कुंभार, अभिजित माळी, विलास सोमदे, चेतन लांब, अतुल सुरमुख, गणेश माने, सोमनाथ यवले आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला नूतन सभागृहाची कोनशिला उद्घाटन करण्यात आले. तसेच फित कापून समाज मंदिरात प्रवेश करण्यात आला.

                 यावेळी पुढे बोलताना गुदगे म्हणाले, गावात अल्पसंख्या असणारे अनेक समाज आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका , त्यांच्या अडीअडचणी आणि त्यांच्या आवाजाकडे तुमचे लक्ष असले पाहिजे, ही शिकवण स्व. भाऊसाहेब गुदगे यांची आहे. भूमिपूजन आणि आजचे उद्घाटन या दोन्ही वेळचा या जागेतील विशेष फरक दिसून येत आहे. यासाठी समाजाची एकत्र विचारसरणी व ऊर्जा कारणीभूत आहे. हे समाज मंदिर म्हणजे विधायक गोष्टीसाठी विचार बैठकासाठी आणि पुढील पिढीवर संस्कार घडवणारे केंद्र बनावे.समाजाच्या एकोप्यामुळे कोणतेही असाध्य कामही साध्य होते. असे हे एक मूर्तिमंत उदाहरण आहे. 

    समाजातील दोघांना ग्रामपंचायतीकडून घरकुले उपलब्ध झाली आहेत. मायणी अर्बन बँकेतून आपल्या समाजातील कष्टकरी युवकांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी आपण सदैव तत्पर राहणार आहोत.समाज चांगल्या पद्धतीने संघटित झाला आहे. याला दृष्ट लावण्याचे काम जर कोण करत असेल तर अशाही प्रवृत्तींना ओळखा आणि  दोन हात लांब ठेवा. समाजाच्या एकोप्याला दृष्ट लागता उपयोगाची नाही. हा समाज संघटित असला तर अजून बरीच काम आपल्याला करून घेता येतील. त्यासाठी मी सदैव प्रयत्नशील असेल, असे आश्वासनही गुदगे यांनी दिले.

       यावेळी उपसरपंच दादासो कचरे म्हणाले, धनगर आणि सणगर यांचे काम एकमेकांवर अवलंबून होते. मायणी ग्रामपंचायतींने या समाजाला फक्त समाज गृहासाठीच जागा न देता त्यापुढील वाढीव जागाही प्रदान केली आहे. या माध्यमातून आपण याठिकाणी समाज हिताच्या बाबी उभारू शकता. यासाठी ग्रामपंचायत आपल्या सोबत असेल.
       संपूर्ण सभागृहात आपल्या समाजाच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या विणकर कामाची माहिती चित्र स्वरूपात सर्वत्र लावण्यात आली असून यामुळे पुढील पिढीला याची माहिती मिळेल. या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. 

       सभागृह निर्मिती निधीला समाजाने स्वनिधीची जोड देत सभागृह व परिसराचा कायापालट केला असून एक आदर्श समाज सभागृहाचे रूप याठिकाणी निर्माण झाले आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रकाश भोंगाळे यांनी केले. तर आभार प्रवीण भोंगाळे यांनी मानले.
Views: 85
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
चतुरस्र व्यक्तिमत्त्वाचे धनी: बापुसाहेब साठे……..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

चतुरस्र व्यक्तिमत्त्वाचे धनी: बापुसाहेब साठे........ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)