पडळकरवाडीत जमिनीच्या वाटपावरून द्राक्ष बाग तोडली
. पडळकरवाडी ता. आटपाडी येथील सुखदेव तानाजी पडळकर यांची द्राक्ष बाग चुलत भवानी तोडून टाकली आहे .यामध्ये सरासरी त्यांचे 80 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत सुखदेव तानाजी पडळकर यांनी दादा चंदू पडळकर , प्रशांत दादा पडळकर, अजय दादा पडळकर, कुंडलीक विठोबा पडळकर सर्व राहणार पडळकरवाडी यांच्या विरोधात तक्रार नोंद केली आहे .
यातील फिर्यादी सुखदेव तानाजी पडळकर यांचे दादा चंदू पडळकर , प्रशांत दादा पडळकर, अजय दादा पडळकर ,कुंडलीक विठोबा पडळकर हे चुलत भाऊ असून जमीन वाटून द्या नाहीतर तुमची द्राक्ष बाग कापणार आहे ,अशी धमकी दिली होती.
या घमकी प्रमाणे सामायिक क्षेत्रातील द्राक्ष बागेतील 300 झाडे तोडून अंदाजे 80 हजार रुपये चे नुकसान केले आहे.पुढील तपास पो.हे कॉ.जाधव करित आहेत.


