विभूतवाडी धुलीवंदन साजरे न करणारे गाव….45 वर्षाची परंपरा कायम….
आटपाडी प्रतिनिधी
विभूतवाडी ता. आटपाडी येथे (धुलवड) धुलीवंदन साजरे केले जात नाही. दरवर्षीच नागरिक धुलीवंदन (धुलवड) साजरी करत असतात. त्याचप्रमाणे येथे धुलवड मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत होती. पण सन 1980 मध्ये अशीच अवस्था होती. त्यावेळेला अनेक जण दारूच्या नशेमध्ये नागरिक गुंग होते .
यामुळे आर्थिक व शारीरिक नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये झाले होते ही परंपरा बंद व्हावी म्हणून गावातील सुज्ञ नागरिकांनी अखंड हरिनाम सप्ताहाची स्थापना (धुलवड) धुलीवंदनाच्याच काळामध्ये केली .
याअखंड हरिनाम सप्ताहाच्या काळामध्ये मांस मांसहार करणे व दारू पिण्याचे प्रमाण बंद झाले . त्यामुळे गावातील वादावाद भांडण असा प्रकार संपुष्टात आला.
सन 1981 साली आटपाडी तालुक्याच्या पश्चिमेकडील तर आटपाडी ,माण व खटाव तालुक्याच्या सरहद्दीवरील कराड पंढरपूर महामार्गावर वसलेले विभूतवाडी गाव असून गावाच्या पश्चिम ,दक्षिण ,उत्तर बाजूस डोंगर असून गावाच्या पूर्वेला सपाटीकरण आहे. या गावांमध्ये सर्व जाती धर्माचे नागरिक गुण्या गोविंदाने राहतात. कोणत्याही प्रकारचा जात धर्म पाळाला जात नाही. मग कोणाचे लग्न असो किंवा कोणाच्या घरामध्ये दुःख झालेले असो या वेळेला सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन सुखदुःखामध्ये सहभागी होतात अशी या गावची परंपरा आहे.
तसेच सालाबादप्रमाणे धुलीवंदन धुलवड येत असते या दिवशी मध्य प्राशन करणे व प्रत्येक घरी मटन आणणे आणि दिवसभर मध्य प्राशन करून मौजमजा करणे अशी अनेक गावांमध्ये प्रथा सुरू होती
यातून अनेकांचे वाद सुद्धा उद्भवतात यामुळे धुलीवंदन दिवशी पोलिसांना सतर्क राहावे लागते.
अशीच प्रथा या गावात सुद्धा होती. परंतु मागील 45 वर्षांपूर्वी गावांमध्ये असंच धुलीवंदन धुलवड साजरी केली जात होती. या वेळेला अनेक नागरिक मद्यप्राशन करून जमिनीवर लोळत होते. अनेकांचे वाद होत होते अनेकांची भांडणे होत होती. हाणा-माऱ्या होत्या .या मुळे गावातील काही समजूतदार सुज्ञान नागरिकांनी धुलीवंदनच्या काळामध्ये तुकाराम बीजोउत्सव च्या अगोदर अखंड हरिनाम सप्ताह बसवण्याचे नियोजन केले .त्यावेळी पासून 45 वर्षे झाले हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे.
आणि याच काळात धुलीवंदन धुलवड येत असते, गावात अखंड हरिनाम सप्ताह असल्यामुळे मद्यप्राशन करणे किंवा मटन खाऊन गावात येणे यास गावकऱ्यांनी बंदी घातली व काही जणाला दंड ठोठावले होते.त्यावेळी पासून गावामध्ये धुलीवंदन धुलवड साजरी केली जात नाही. त्या ऐवजी अखंड हरिनाम सप्ताह साजरा केला जातो व तुकाराम विजोत्सव दिवशी सप्ताह समाप्त होतो.
दिनांक 09 मार्चपासूनअखंड हरिनाम सप्त्याहला सुरुवात होते तर दिनांक 15 रोजी दीपोत्सव साजरा केला जातो. तर 16 रोजी तुकाराम बीज उत्सव साजरा केला जातो. सात दिवस दिवसभर ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाचन केले जाते. दररोज संध्याकाळी विविध विषयावर कीर्तन असते. वैशिष्ट्य म्हणजे या अखंड हरिनाम सप्ताह साठी वर्गणी म्हणून कोणाला मागितली जात नाही .तर ग्रामस्थ मनोभावे स्वतः आर्थिक मदत मंदिरामध्ये जाऊन करतात.
आटपाडी तालुक्यातील धुलीवंदन साजरी न करणारे हे एकमेव विभूतवाडी गाव असू शकतं. धुलीवंदन म्हटलं की मध्य प्राशन आलंच.. मटन आलंच आणि यामुळे अनेक वाद विवाद वाढतात. कितीतरी रुपयांचा चुरडा होतो हे सगळं थांबवण्यासाठी या विभूतवाडी गावचा आदर्श इतर गावांनी घ्यावा म्हणजे गावातील तरुण पिढी सुधारेल. कारण धुलीवंदन धुळवड या दिवशी तरुण गंमत म्हणून थोडीशी दारू पितो परंतु काही दिवसांनी त्याला दारूचे व्यसन लागते म्हणूनच तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये धुलीवंदन धुळवडच्या काळामद्ये अखंड हरिनाम सप्ताह सुरू करावा असे आव्हान कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.


