बचेरीच्या पाणी टंचाईग्रस्त भागात तहसीलदार शेजुळ यांच्या टीमने केली पाहणी…चार दिवसात टँकर सुरू करण्यासाठी उपोषणाचा इशारा दिल्याने शासकीय यंत्रणेच्या हालचालींना वेग..
विश्वजीत गोरड /पिलीव प्रतिनिधी-
माळशिरस तालुक्यातील बचेरी येथे माणसाबरोबर जनावरांच्या ही पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झालेली तातडीने टँकर चालू करावेत अन्यथा पंचायत समिती समोर उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांच्या वतीने सरपंच सौ राणीताई गोरड यांनी देताच माळशिरस तालुक्याचे तहसीलदार सुरेश शेजुळ यांनी संबंधित गटविकास अधिकारी पाणीपुरवठा विभाग यांच्यासह यांच्या बचेरी गावाला भेट देऊन टंचाईग्रस्त भागाची पाहणी केली
यावेळी बचेरी गावाच्या एक नंबर तलावाखालील पाणीपुरवठ्याच्या विहिरीची व गावातील पाणीपुरवठा करणाऱ्या स्त्रोत यांची पाहणी केली यावेळी येत्या चार दिवसातच बचेरी गावाला मोठा टँकर सुरू करण्यात येईल अशा पद्धतीचे टँकर मागणीचे प्रस्ताव जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे पाठविले असल्याचे तहसीलदार सुरेश शेजुळ यांनी यावेळी सांगितले
यावेळी पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाच्या मोमीन मॅडम पंचायत समितीचे उपअभियंता दरवेशी मंडळ अधिकारी विजय इकतपुरे उपसरपंच नाना भिसे, माजी सरपंच महादेव पाटील, माजी उपसरपंच मोहन शिकारे, पोलीस पाटील अण्णासाहेब शिकारे पाटील ,ग्राम महसूल अधिकारी दिलीप नाईक नवरे, बिरदेव शिंदे,शहाजी शिंदे, दत्तु ढवळे, काशिंलिंग ढवळे,शिवराम ढवळे,भजनदास वाघमारे आदी पदाअधिकारी आणि ग्रामस्थ महिला यावेळी उपस्थित होते व बचेरी गावाला भेडसावणाऱ्या भीषण पाणी टंचाईची वस्तुस्थिती ची माहिती दिली तसेच रखडलेल्या जल जीवन मशीन मिशन मधील पाणीपुरवठा योजनेचे काम निधी अभावी रखडले असून सदरच्या कामास निधी मिळवून देऊन काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी यावेळी सरपंच सौ राणीताई गोरड यांनी केली ….
फोटोत- बचेरी गावातील टंचाईग्रस्त भागाला भेट देताना तहसीलदार सुरेश शेजुळ पाणीपुरवठा विभागाच्या मोमीन मॅडम उप अभियंता दर्वेशी मंडळ अधिकारी विजय एकच पुरे सरपंच राणीताई गोरड ,विश्वजीत गोरड मोहन शिकारे,महादेव पाटील ,पोलीस पाटील अण्णासाहेब शिकारे व ग्रामस्थ


