शिरपूर तालुक्यात नागरिकांनी रमजान ईद, गुडी पाडवा उत्साहपूर्ण साजरा करा; विशाल कंरके
त-हाडी-प्रतिनिधी
शिरपूर तालुक्यात व त-हाडी परिसरात सर्व धर्मिय समाज बांधवांनी रमजान ईद, गुढी पाडवा आणि रामनवमी हे सण उत्ससाहपूर्ण वातावरणात शांततेत साजरे करावेत जिल्हा प्रशासनासह जिल्हा पोलिस प्रशासनाचे आपणास संपूर्ण सहकार्य राहील आनंदात साजरे करावेत असे आवाहन विशाल कंरके सामाजिक कार्यकर्ते त-हाडी ता शिरपुर यांनी शिरपूर तालुका वासियांना केले रमजान ईद, गुढी पाडवा आणि रामनवमी हे सण शांततेत पार पाडण्यासाठी धुळे जिल्हा शांतता समिती बैठक संपन्न झाली आहे. यावेळी पोलीस अधीक्षक, जिल्हा अधिकारी तहसीलदार यांच्यासह विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.अशी माहिती विशाल कंरके यांनी बोलताना दिली.दि.३०,३१ मार्च २०२५ रोजी हिंदू धर्माचा पावित्र्य सण चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा व मुस्लिम समाजाचा पाक महिना रमजान ईद , हिंदू व मुस्लिम धर्माचे ऐक्य उत्सवात आनंदात साजरे करा असे आवाहन विशाल कंरके सामाजिक कार्यकर्ते त-हाडी यांनी केले आहे.
अलीकडे हिंदू व मुस्लिम समाजाचे अनेक सण एकत्र येताना दिसत आहेत, हे एक प्रकारे एकात्मतेचे प्रतिकच म्हणावे लागेल. अशावेळी समाजबांधवांनी एकीने सण शांततेत साजरे करावेत. सण साजरे करत असताना कुठेही गालबोट लागणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी. कुठे अनुचित प्रकाराची खबर मिळाल्यास त्याची माहिती पोलीसांना तात्काळ द्यावी. सुरक्षा व स्वच्छतेबाबत दक्षता घेतली जाईल. सर्वांना रमजान ईद, गुढी पाडवा आणि रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा.रमजान ईद, गुढी पाडवा आणि रामनवमी सण दोन्ही समाजाने सामंजस्याने व आनंदाने साजरे करावेत.पोलीस प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. समाजकंटकांनी सामाजिक सलोखा बिघडविण्याचे काम केल्यास त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल. समाजमाध्यमांवर पोस्ट करताना कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.शिरपुर तालुक्यात व त-हाडी परिसरात हे माझे गाव आहे, माझ्या गावात मी काहीही अनुचित घटना घडू देणार नाही, असा प्रत्येकाने ठाम विचार करुन सण आनंदात साजरे करावेत. अफवांवर विश्वास ठेवू नये. सामाजिक सलोखा बिघडणार नाही, याची खबरदारी घेऊन हिंदू धर्माचा पावित्र्य सण गुढीपाडवा व मुस्लिम समाजाचा पाक महिना रमजान ईद आनंदात साजरे करावेत असे आवाहन विशाल कंरके सामाजिक कार्यकर्ते त-हाडी ता शिरपूर यांनी केले आहे.

