श्री केवल विकमनी यांचे मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस व पोलीस प्रशासनाला निवेदन व गंभीर ईशारा
उल्हासनगर झोन ४ अंतर्गत हद्दीत असणारे सर्व पोलीस स्टेशन च्या हद्दीत रात्रभर चालणारे बेकायदेशीर अनधिकृत बांधकाम करून रात्रभर बेकायदेशीर व्यवसाय करून पोलिस अधिकारी कर्मचारी लाखो करोडो रुपये हफ्ता वसूल करून तरुण पिढी वाया घालवत असल्याबाबत….
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
उल्हासनगर/अंबरनाथ: आज रात्री पासून जर एकही अनधिकृत बेकायदेशीर धंदे नियमित वेळे नंतर चालू दिसला, तर तिथे आम्ही आमच्या पद्धतीने कार्यवाही करून, पोलिसांच्या हफ्तेखोरी भ्रष्टाचाराचे माझ्याकडे असलेले सर्व व्हिडिओ लोकांसमोर जग जाहीर करून पोलिसांची अस्सल वसुली हफ्तेखोरी भ्रष्टाचार लोकांना दाखवणार, त्यानंतर होणाऱ्या दुष्परिणामांना आपण जबाबदार राहणार याची नोंद घ्यावी.
मी केवल विकमानी आपणास कळवू इच्छितो की ठाणे पोलिस आयुक्तालयातील डीसीपी जोन ४ उल्हासनगर हद्दीत असणारे उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर चे सर्वच पोलिस स्टेशन च्या हद्दीत बेकायदेशीर बांधकामे करून रात्रभर ढाबे, डान्सबार, स्पा वेश्याव्यवसाय पार्लर, हुक्का पार्लर, जुगार अड्डे, अवैध लॉटरी, गुटखा शॉप, पान टपरी, चरस गांजा अड्डे, अमलीपदार्थ सेंटर, दारू अड्डे, ढाबे, वाइन शॉप्स, क्रिकेट फुटबॉल स्पोर्ट्स टर्फ, व इतर बेकायदेशीर अनधिकृत व्यवसाय रात्रभर रात्री ४ ते ५ वाजे पर्यंत सुरू असतात, हे धंदे उल्हासनगर झोन ४ दिसीपी ह्यांच्या क्षेत्रात असून, ह्या बेकायदेशीर अनधिकृत रात्रभर चालू असलेल्या व्यवसायातून सर्रास पणे रोज हफ्ता पैसे खंडणी वसूल केली जात आहे, काही ढाब्यावर जाऊन पोलिस अधिकारी कर्मचारी हे फुकट जेवण दारू पार्सल फुकट घेऊन जातात दिसीपी साहेब स्वतःही ढाबा हॉटेल डान्सबार मध्ये जाऊन फुकट दारू व अमली पदार्थांचे सेवन करतात व काही पोलिस जाऊन डान्सबार येथे नाच गाणं वगैरे करतात असे व्हिडिओ दिसत आहेत…. अंबरनाथ येथील एका धाब्यावर चरस गांजा दारू बियर सर्रास पणे दुप्पट भावाने विक्री सुरू आहे व रात्री ३-४ वाजे पर्यंत रोज तो धाबा सुरू असतो तेथे पोलीसवाले, एसीपी, डी.सी.पी. असे सर्व जाऊन नशा करतात व फुकट जेवण करतात आणि तिथून महिन्याला ३ लाख रुपये इतका हफ्ता चालू असून आज पर्यंत त्या आस्थापना वर कधीच कार्यवाही झाली नाही कारण तो ढाबा पोलिस उपायुक्त भ्रष्ट सचिन गोरे यांच्या जावई चा आहे म्हणून तिथे सर्व अधिकारी मेहेरबान आहेत व तिथे जाऊन फुकट दारू व अमलीपदार्थ, जेवण वगैरे करतात……
हेच लाचखोर भ्रष्ट पोलिस काही केसेस मध्ये आरोपींना वाचवण्यासाठी किंवा खोट्या गुन्ह्यात लोकांना फसवण्यासाठी हे पोलिस आरोपींकडून व तक्रारदाराकडून काही समाजकंटक दलालांमार्फत लाखो करोडो रुपये लाचखोरी भ्रष्टाचार करत सामान्य लोकांना फसविण्याचे व त्रास देण्याचे काम करतात. या रात्रभर चालणारे धंद्यांमुळे उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर येथे गुन्हेगारी वाढत असून रात्री अपरात्री रेप मर्डर मारामारी भांडण मुलींची छेड छाड असे गुन्हे रोज सर्रास पणे खुलेआम घडत असून, पोलिस हे गुन्हे रोखण्यात १००% अपयशी आहेत कारण पोलिस खात पैशांसाठी विकल गेल आहे…. काही पैसे घेऊन स्वतः ची इज्जत अब्रु व सर्वकाही विकून टाकतात पैशांसाठी…… पोलिसांना पैसे देऊन विकत घेऊन कुठलाही गुन्हा कोणीही केला तरीही पैसे दिले तर कार्यवाही होणार नाही असे दिसून येत आहे व गुन्हेगारांना १००% माहीत झालं आहे की कुठलाही काहीही गुन्हा करा…. पोलीस आपल काही वाकडे करू शकत नाही व पैसे देऊन पोलिस व सर्वांना विकत घेऊ शकतो…
डीसीपी श्री सचिन गोरे हे उल्हासनगर येथे चालू असलेल्या अमली पदार्थ व वेश्या (रांड)/(सेक्स रॅकेट) व्यवसायात भागीदार आहेत व तिथून दरमहा ५०% पैसे यांना मिळतात म्हणून कुठलीच कार्यवाही त्या अनधिकृत बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या आरोपींवर होत नाही व रात्री ४ ते ५ वाजे पर्यंत धंदे चालू असतात….. उल्हासनगर झोन ४ चे उपायुक्त श्री सचिन गोरे हे पैशांसाठी कुठल्याही थरावर जाऊन आरोपींना वाचवतात व लोकांवर अन्याय करून पैसे घेऊन आरोपींना शिक्षा न देता मोकाट सोडून देतात व मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करतात असे दिसून येत आहे….. उल्हासनगर झोन ४ चे उपायुक्त श्री सचिन गोरे हे कायद्याचे रक्षक आहेत की भक्षक हे प्रश्न लोकांना पडले आहे कारण ह्यांनी बिल्डरांना धमक्या देऊन खंडणी वसूल करणे, लोकांना त्रास देणे, तक्रारीवर सेटलमेंट दलाली करणे, बेकादेशीर अनधिकृत धंदे वाल्यांना वसुली साठी त्रास देऊन, विनापरवाना शस्त्र पुरविणे, काही आरोपींना मोठ्या गुन्ह्यात क्लीन चिट देतात व त्यांच्याकडून जागा प्लॉट फ्लॅट खंडणी वसुली स्वरूपात घेत त्यांच्या सोबत साठगाठ करतात व पैशांसाठी विकले जातात…..
ह्यांना लाज वाटतं नाही की हे भारतात राहून देशद्रोही सारखे अवैध बेकायदेशीर अनधिकृत धंद्यांना पाठींबा देत, चोर, गुन्हेगार, आरोपी, बेकायदेशीर धंदे करणारा, हफ्ता वसुली करणारा, खंडणीखोर, देशी दारू अड्डे वाले, क्रिकेट फुटबॉल टर्फ मालकांना व्यवसायात भागीदारी साठी त्रास देणे व इतर समाजकंटक लोकांना पाठिंबा देऊन, बेकायदेशीर अनधिकृत धंद्यांना सहकार्य करतात……
उल्हासनगर झोन ४ च्या हद्दीत उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर असे ३ मोठे शहर असून येथे रात्रभर हे अनधिकृत बेकायदेशीर धंदे वाल्यांकडून डिसीपि श्री. सचिन गोरे हे स्वतःच्या खाजगी व कनिष्ठ पोलिस अधिकारी मार्फत व पोलिस स्टेशन च्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्या संगनमताने दर महिन्याला ४ ते ५ कोटी रुपये वसुली करत असून ही रक्कम सरकारी तिजोरीत जमा न करता ही ४ ते ५ कोटी रुपयांची रक्कम हे स्वतःच्या खाजगी तिजोरीत भरून या रक्कमेवर दिसिपी महोदय हे कुठलाच आयकर किंवा जी.एस.टी. देखील भरत नसून, दिसीपी सचिन गोरे हे मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करत असून ह्यांच्यावर केंद्रीय यंत्रणा मार्फत /एसआयटी मार्फत/ आयकर विभागा मार्फत/ केंद्रीय इ डी मार्फत कार्यवाही कार्यात यावी….
ठाणे पोलिस आयुक्तालयातील जोन ४ उल्हासनगर चे उपायुक्त सचिन गोरे यांच्या हद्दीत उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर येथे असलेले २ नंबर धंद्याची यादी व तिथून मिळणारे हफ्ते अंदाजे रक्कम :-
१) ढाबे – २७५+ ढाबे (२५०००-७५०००) टेबल नुसार.
२) डान्सबार – ३०+ अंदाजे (५००००-१.५ लाख) टेबल व डांसर नुसार.
३) क्रिकेट फुटबॉल टर्फ – १२०+ अंदाजे (२५०००-४००००) रात्री उशिरा चालू असे नुसार.
४) जुगार/ अवैध लॉटरी शॉप – १५०+ अंदाजे (१.५ लाख ते ५ लाख) रात्री उशिरा नुसार.
५) वेश्या (रँड बाजार) – ५००+ अंदाजे (३००००-१.५ लाख) धंदा नुसार.
६) चरस गांजा अमलीपदार्थ विक्री – ६०+ केंद्र अंदाजे .(१.५ लाख ते ५ लाख) विक्री नुसार.
७) खंडणी अपहरण व आरोपींकडून वसुली – १० ते १५ लोकांकडून रोज. अंदाजे (५-१० लाख रुपये रोज) गुन्हे दाखल नुसार.
या ४ ते ५ कोटी रुपये हफ्ता वसुलीत ठाणे पोलिस आयुक्त श्री आशुतोष डुंबरे, ठाणे पोलीस सह. आयुक्त श्री ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त कल्याण (पूर्व प्रादेशिक विभाग) श्री. संजय जाधव, उल्हासनगर चे एसीपी अमोल कोली, अंबरनाथ चे एसीपी शैलेश काळे व इतर कोण कोण लोक हे सामील आहेत की नाही ,
ह्यांच महिन्याचा किती हफ्ता आहे, हे सर्व आयकर व जीएसटी भारतात का याचीही सखोल चौकशी करून हफ्तेखोर लाचखोर दोषींवर कार्यवाही करण्यात यावी अशी विनंती आहे. हा माझा तक्रार पत्र असून, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, सचिव, पोलिस महासंचालक महाराष्ट्र, उप मुख्यमंत्री महाराष्ट्र, सर्वांना हा तक्रार पत्र पाठवत असून जर माझ्या तक्रारीवर कार्यवाही झाली नाही व रोज रात्री दिलेल्या वेळे नंतर रात्रभर चालणारे धंदे बंद केले नाही तर दोषींच्या दालनाबाहेर उपोषण आंदोलन कायदेकीय मार्ग निवड करणार व विरोध प्रदर्शन करणार असे जाहीर करतो…….
असे देशद्रोही पोलीस अधिकारी जर आपल्या देशात राहिले तर पुढील काळात भारतात पाकिस्तानी बांगलादेशी लोकं वाढतील व बिंदास गुन्हे घडवतील…. म्हणूनच माझी रीतसर कायदेशीर तक्रार आहे, या नराधम हफ्तेखोर भ्रष्ट दिसिपी श्री. सचिन गोरे याला निलंबन करून कडक कठोर कार्यवाही करावी अन्यथा आंदोलन उपोषण करणारं……


