निरा देवघर चा वनवास संपणार,मा.खा.रणजितसिंह निंबाळकरच माळशिरस तालुक्याचा दुष्काळ मिटवणार -शिवराज पुकळे
विश्वजीत /गोरड पिलीव प्रतिनिधी –
बुधवार दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी
मा.ना.डॉ.राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री, जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) यांचे अध्यक्षतेखाली मंत्रालय मुंबई येथील दालनामध्ये मा.खासदार रणजितसिंह(दादा)नाईक-निंबाळकर यांच्या मागणीवरुन माळशिरस तालुक्यातील निरा-देवघर प्रलंबित पाणी प्रश्नावर जलसंपदा विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती.
निरा -देवघर प्रकल्पात कृष्णा खोरे विकास महामंडळाचे १७१ व्या बैठकीत ठरल्याप्रमाणे नव्याने समाविष्ट माळशिरस तालुक्यातील कायम दुष्काळी बचेरी, शिगोर्णी,सुळेवाडी,पिलीव, पठाणवस्ती,काळमवाडी, कोळेगाव,गारवाड, मगरवाडी, भांब, फडतरी, लोंढे-मोहीतेवाडी, जळभावी, कोथळे, तरंगफळ,चांदापुरी या गावांना उपसा सिंचन द्वारे पाणी देण्यासंदर्भात चर्चा होऊन ३-४ महिन्यांत सुप्रमा काढण्याचे ठरले.या निमित्ताने दुष्काळी गावांचा पाणीप्रश्न पहिल्यांदाच शासनाच्या अजेंड्यावर आला आहे.
त्याचबरोबर निरा-देवघर मुळ प्रकल्पात असलेल्या गिरवी, पिंपरी (कचरेवस्ती),लोणंद, कन्हेर, इस्लामपूर, रेडे, मांडकी, गोरडवाडी (भांबुर्डी),धर्मपुरी, कारूंडे, मोरोची, नातेपुते, मांडवे, माळशिरस, मोटेवाडी,दहिगाव या गावांना लवकरात लवकर टेंडर काढुन काम सुरू करण्याचे नियोजनही झाले.यामुळे माळशिरस तालुक्यातील दुष्काळी सर्वच्या सर्व गावांमध्ये निरा देवघर चे पाणी येण्याचा मार्ग मा.खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मुळेच मोकळा झाला आहे असे मत निरा देवघर पाण्यासाठी संघर्ष करणारे शिवराज पुकळे यांनी व्यक्त केले.
या बैठकीला पालकमंत्री जयकुमार गोरे भाऊ, बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार सचिन पाटील, आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख, माजी आमदार शहाजी बापू पाटील, माजी आमदार रामभाऊ सातपुते,माजी आमदार दिलीपराव येळगावकर, स्वप्नीलकुमार राऊत, गणेश देशमुख व निरा देवघर प्रकल्प निगडीत सर्व अधिकारी वर्ग उपस्थित होते.


