संत निरंकारी मिशन च्या मानव एकता दिवसा निमित्त 217 जणांचे रक्तदान
देशभरात ३०,००० युनिट रक्तदान
तासगांव: दरवर्षी प्रमाणे संत निरंकारी मिशन च्या वतीने 24 एप्रिल रोजी बाबा गुरबचनसिंहजी यांच्या पावन स्मृतिप्रित्यर्थ प्रेम व बंधुभावना जागविणारा ‘मानव एकता दिवस’ श्रद्धा व भक्तीभावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या प्रसंगी संत निरंकारी सत्संग भवन , तासगांव येथे आयोजित रक्तदान शिबिरात 217 जणांनी स्वईच्छेने रक्तदान केले तर देशभरात सुमारे 500 हून अधिक शाखांमध्ये रक्तदान शिबिरांची अखंड श्रृंखला आयोजित करण्यात आली व एकूण 30,000 युनिट रक्तदान झाले.
तासगांव येथील रक्तदान शिबिर सातारा झोन चे झोनल प्रभारी आ.नंदकुमार झांबरे जी यांच्या विशेष मार्गदर्शना खाली पार पडले. शिबिराचे उद्घाटन सेक्टर संयोजक आ.दत्तात्रय जगताप जी यांच्या हस्ते करण्यात आले . हे महाअभियान केवळ रक्तदान नसून सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांचा करुणा, सेवा आणि एकत्वाचा संदेश जीवनात उतरविण्याचे सजीव माध्यम आहे जे आम्हाला शिकवते की , मानवता हाच सर्वोच्च धर्म होय याच प्रेरणेने युक्त संत निरंकारी मिशन सेवा आणि समर्पणाच्या पथावर निरंतर मानवतेचा मार्ग प्रशस्त करत आहे.
निरंकारी बाबा हरदेवसिंहजी यांनी “ रक्त नाड्यांमध्ये वाहावे, नाल्यांमध्ये नको ” हा अमर संदेश देऊन रक्तदानाला मिशनच्या आध्यात्मिक सेवेचे अभिन्न अंग बनवले.
शिबिराच्या पश्चात मानव एकता दिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी विशेष सत्संग समारोह आ.रुपेश जाधव जी, सातारा यांच्यां प्रमुख उपस्थितीत पार पडला ज्या द्वारे बाबा गुरबचनसिंहजी व अन्य बलिदानी संतांच्या दिव्य जीवनातून प्रेरणा प्राप्त करण्यात आली व मानव एकता कशी स्थापित होईल याचे मार्गदर्शन लाभले. सत्संग सोहळ्यास आटपाडी, बिरणवाडी, सावळज, तासगाव इ. ठिकाणांहून संत महापुरुष उपस्थित राहून सद्गुरुंचा आशिर्वाद प्राप्त केले.
रक्त संकलन रेड क्रॉस मान्यता प्राप्त शिरगांवकर रक्तपेढी सांगली यांनी केले . रक्तदान शिबिरामध्ये तासगांव शहर व तालुक्यातील युवकांनी ही रक्तदान करून मोलाचे योगदान दिले.उपस्थित सर्व संत महात्मांचे आभार तासगांव चे मुखी आप्पासाहेब कदम यांनी मानले.सेवादल युनिट क्र.1185 व साधसंगत ने शिबिराचे नियोजन केले.


