*सोनगीर येथील सागर पटेल जिल्हा युवा पुरस्काराने सन्मानित*
डोंगर गाव ( प्रतिनिधी )आर आर पाटीलमहाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालाय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यावतीने जिल्हा युवा पुरस्कार धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री व महा. कॅबिनेट मंत्री मा. श्री जयकुमार भाऊ रावल यांच्या हस्ते सोनगीर येथील मा. कु. सागर राजेंद्र पटेल सर ता.जी धुळे यांना 2024 चा पुरस्कार प्रधान करण्यात आला
यावेळी श्री जितेंद्र पापडकर जिल्हाधिकारी धुळे, धुळे एसपी साहेब, मा. श्री अनुप भैय्या अग्रवाल आमदार धुळे शहर , श्री राम दादा भदाणे आमदार धुळे ग्रामीण, श्री अविनाश टिळे जिल्हा क्रीडा अधिकारी धुळे यांच्या उपस्थितीत आज महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे उचित्य साधत हा पुरस्कार चे वितरण करण्यात आले…
सागर पटेल सर यांनी धुळे जिल्ह्यात सामाजिक , शैक्षणिक, सांस्कृतिक कला व क्रीडा मार्गदर्शन , विद्यार्थ्यांना करिअर समुपदेशन या कार्यामध्ये उत्तम कामगिरी करत व समाजातील असंघटित युवकांना संघटित करून तरुणांच्या व नागरिकांच्या सुप्त गुणांना संधी देऊन भरीव योगदान दिले आहे या कार्याबद्दल जिल्हा युवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले…


