गॅस एजन्सी कडून ग्राहकांची दिशाभूल, सन 2011 मध्ये घेतलेले कनेक्शन सिस्टीम मधून गायब ……….
.शुभम गॅस एजन्सी म्हसवड ता.माण यांच्याकडून सन 2011 मध्ये कौशल्या तुकाराम मोटे उपभोक्ता क्रमांक 008858 या क्रमांगॅस एजन्सी कडून ग्राहकांची दिशाभूल, सन 2011 मध्ये घेतलेले कनेक्शन सिस्टीम मधून गायब …ग्राहक त्रस्त्रकेसरी वृत्तसेवा आटपाडी शुभम गॅस एजन्सी म्हसवड ता.माण यांच्याकडून सन 2011 मध्ये कौशल्या तुकाराम मोटे उपभोक्ता क्रमांक 008858 या क्रमांकाने गॅस कनेक्शन घेतले होते. परंतु आज रोजी शुभम गॅस एजन्सी कडे चौकशी केली असता तुमचे कनेक्शन सिस्टीम मध्ये कुठेही दिसून येत नाही, असे सांगितले जात आहे.
तर कौशल्या मोटे यांना ज्या वेळेला म्हणजे सन 2011 मध्ये कनेक्शन दिले होते त्यावेळेला त्या कनेक्शनचे पुस्तक गॅस एजन्सी दिले होते. परंतु आज रोजी शुभम गॅस एजन्सी म्हसवड हे आमच्याकडे तुमचे कनेक्शनच नाही असे ठामपणे सांगत आहेत.अलीकडच्या काळामध्ये खरसुंडी ता.आटपाडी व कलेढोन ता .खटाव येथेही गॅस एजन्सी झाली आहे. तुमचे कनेक्शन तिकडे ट्रान्सफॉर्म झाले आहे, असे शुभम गॅस एजन्सी वाले सांगत आहेत .परंतु कलेढोण व खरसुंडी येथील गॅस एजन्सी मध्ये चौकशी केली असता सिस्टीमला कुठेही कनेक्शन दिसून येत नाही. आणि शुभम गॅस एजन्सी वाले कोणतेही उत्तर देण्यास तयार नाहीत. त्यामुळे गॅस धारकांना नाहक त्रास होत आहे. गॅस भरून तरी कुठून घ्यायचा ही अडचण होत आहे. गॅस कनेक्शनचे पुस्तक असून ज्यादा दराने गॅस भरून घ्यावा लागत आहे.
याबाबत शुभम गॅस एजन्सी यांच्याकडे चौकशी केली असता, फोन उचलून साईडला ठेवणे, पाहतो, बघतो असे म्हणून तासंनतास फोन सुरू ठेवणे असे प्रकार घडत आहेत.पूर्वी म्हसवड येथील शुभम गॅस यांच्याकडे झरे परिसरातील सर्व कनेक्शन होती .परंतु त्यानंतर खरसुंडी व कलेढोण ता.खटाव येथे भारत गॅस एजन्सी सुरू झाल्यानंतर शुभम गॅस एजन्सी यांच्याकडीलल काही कनेक्शन खरसुंडी गॅस एजन्सी व मारुतीबगॅस एजन्सी कालेढोन यांच्याकडे कंपनीने वर्ग केली आहेत. परंतु कौशल्या मोटे यांचे कनेक्शन कलेढोण किंवा खरसुंडी येथील एजन्सीकडे दिसून येत नाहीत. तर शुभम गॅस एजन्सी म्हसवड हे कोणत्याही पद्धतीचे उत्तर देत नाहीत.
म्हणजे गॅस कनेक्शन घेतले होते का हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या कौशल्या मोटे यांच्याकडे शुभम गॅस एजन्सी चे गॅस कनेक्शन चे पुस्तक आहे. आणि त्यांना गॅस मिळत नाही .शुभम गॅस एजन्सी यांचेकडे अनेक वेळा चौकशी केली असता कोणत्याही पद्धतीचे उत्तर देत नाहीत , प्रत्यक्ष भेटले असता टोलवाटोलविचे उत्तर देतात .म्हणजे कौशल्य मोटे यांचे गॅस कनेक्शन बोगस आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तर शुभम गॅस एजन्सी ने त्यांच्या सही शिक्क्याचे गॅस पुस्तक कौशल्या मोटे यांना सन 2011 मध्ये दिले आहे. जर शुभम गॅस एजन्सीने गॅस पुस्तक दिले आहे .तर मग गॅस कनेक्शन गेले कुठे ? सिस्टीम मध्ये दिसत कसे नाही. हा गंभीर प्रश्न आहे. तरी शुभम गॅस एजन्सी च्या सर्व कनेक्शनची चौकशी व्हावी अशी मागणी कौशल्या मोटे, व नागरिकांतून होत आहे.


