” राष्ट्रवादी ” शरदचंद्र पवार पक्ष ” सर्वांचा ” आत्मा बनावा...रावसाहेब पाटील, कुमार लोंढे, उत्तमराव कांबळे यांची भावना .
आटपाडी दि . २८ ( प्रतिनिधी )
सर्व सामान्यांच्या व्यथा, वेदना, प्रश्न, समस्या, अडचणी सोडवत त्यांच्या पाठीशी मोठ्या ताकदीने उभे रहात त्यांना आपलेसे केल्यास, भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष सांगली जिल्ह्याचा अव्वल पक्ष ठरेल, असा आत्मविश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटक रावसाहेबकाका पाटील, सामाजीक न्याय विभागाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष कुमार लोंढे शहर जिल्हाध्यक्ष उत्तमराव कांबळे यांनी व्यक्त केला .
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या सामाजीक न्याय विभागाच्या आटपाडी तालुका अध्यक्षपदी दिघंचीचे विनोद उर्फ विलास बनसोडे यांच्या निवडीचे पत्र प्रदान करतेवेळी बोलताना या मान्यवर त्रयींनी हा आत्मविश्वास व्यक्त केला .
आपल्या वाढदिवसा दिनीच निवड झालेल्या विनोद बनसोडे यांना आटपाडीत येवून जिल्हा नेत्यांनी गौरवीत मोठा बहुमान केला . रावसाहेबकाका पाटील, कुमार लोंढे, उत्तमराव कांबळे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले व सत्कार करणेत आला
सर्वोच्य न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ना . श्री . गवई साहेबांच्या मातोश्रींनी मतपत्रिकेवरच मतदान घेतले जावे ही व्यक्त केलेली इच्छा न्यायाची असून देशातल्या जनतेने नेतेमंडळीनी मतपत्रीकेवरच मतदान घेण्यासाठी प्रचंड उठाव आंदोलन करणे गरजेचे असल्याचे मत रावसाहेबकाका पाटील यांनी व्यक्त केले .
सर्व बाजुंनी उपेक्षा झालेल्या आटपाडी तालुक्याला पक्ष संघटनेत मोठी संधी मिळावी आणि आटपाडी तालुक्याच्या शेकडो प्रश्नांच्या निर्गतीसाठी दत्तक आमदार, खासदार दिला जावा, या सादिकभाई खाटीक यांच्या न्याय सुचनेसाठी आपण पक्ष पातळीवर मोठे प्रयत्न करणार असल्याचे सुतोवाच कुमार लोंढे – उत्तमराव कांबळे यांनी केले .
दुष्काळी, मागास, उपेक्षीत, जत तालुक्यातील लढवय्या विवेक कोकरे या तरुणाला सांगली जिल्ह्याचे युवकाचे अध्यक्ष करून प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील साहेब, जिल्हाध्यक्ष देवराजदादा पाटील यांनी उत्तम निर्णय केला आहे . त्याबद्दल या तिघांचेही मनःपूर्वक अभिनंदन मी करतो. खानापूर विधानसभा मतदार संघाचा पक्षाचा अध्यक्ष आटपाडी तालुका वाशीय केला जावा . पक्षाचे आटपाडी तालुका अध्यक्षपद आणि विधानसभा मतदार संघ अध्यक्षपद या दोन्ही पदांवर बहुजन व्यक्तीला संधी दिली जावी . जिल्हा युवकचे कार्याध्यक्षपद सुरज पाटील यांना मिळावे .
आटपाडी तालुक्याच्या शेकडो प्रश्नांवर आवाज उठविणेसाठी दत्तक आमदार , खासदार यांच्याकडे आटपाडी तालुका सोपवावा . सामाजीक न्याय विभागासह, पक्षाच्या सर्व विभागांमध्ये वरिष्टांची कार्यकारणी, महिलांची कार्यकारणी, युवकांची कार्यकारणी – युवतीची कार्यकारणी विद्यार्थ्यांची कार्यकारणी – विद्यार्थीनींनीची कार्यकारणी असे सहा नवे विभाग सुरू केल्यास शेकडो कार्यकर्त्यांना कार्य करणेची संधी देता येवू शकेल. आणि त्यातून पक्ष संघटना मजबुत करता येईल . तसेच ओबीसी, मागासवर्गीय, महिला आणि अल्पसंख्याक घटकातील चौघांची, प्रत्येक जिल्ह्यातील चार तालुका अध्यक्षपदी निवड करून पक्षाने वंचित, उपेक्षित, मागास, महिला घटकांना पुढे आणावे अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ओबीसी विभागाचे प्रदेशचे उपाध्यक्ष सादिक खाटीक यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली .
नुतन तालुकाध्यक्ष विनोद बनसोडे, दिघंचीचे राहुल वाघमारे यांचे उस्फूर्त भाषण झाले . यावेळी कसबे डिग्रजचे माजी उपसरपंच प्रमोद चव्हाण, युवक राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष सुरज पाटील, प्रभाकरबापू नांगरे – पाटील, श्रीकांत नलवडे, श्रीकांत आंबे, मनोज भोसले, किशोर गायकवाड, नितीन डांगे, माणिकराव साळुंखे सर ,संतोष बाड, गणेश ऐवळे, अमित मोरे, अमित वाघमारे, ऋतुराज चंदनशिवे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते . आभार किशोर गायकवाड यांनी मानले .


