• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

दिघंचीत महालक्ष्मी सहकार पतसंस्थेवर ठेवीदारांचा मोर्चा … ठेवीदार महिला अध्यक्ष व सचिवाच्या अंगावर धावून गेल्या… ठेवीदार महिलांनी सचिवाच्या कानशिलात लगावली….महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला उस्फूर्त प्रतिसाद…..

माणगंगा by माणगंगा
June 20, 2025
in Uncategorized
0
दिघंचीत महालक्ष्मी सहकार पतसंस्थेवर ठेवीदारांचा मोर्चा … ठेवीदार महिला अध्यक्ष व सचिवाच्या अंगावर धावून गेल्या… ठेवीदार महिलांनी सचिवाच्या कानशिलात लगावली….महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला उस्फूर्त प्रतिसाद…..

दिघंची महालक्ष्मी सहकार पतसंस्थेवर ठेवीदारांचा मोर्चा … ठेवीदार महिला अध्यक्ष व सचिवाच्या अंगावर दाखवून गेल्या… ठेवीदार महिलांनी सचिवाच्या कानशिलात लगावली….महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला उस्फूर्त प्रतिसाद

आटपाडी प्रतिनिधी महालक्ष्मी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा स्नेहल शेटे यांच्या घरावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी ठेवीदार महिला अध्यक्षा आणि सचिवाच्या अंगावर धावून गेल्या. एका महिला ठेवीदाराने सचिव हणमंत माळी यांच्या कानशिलात लगावली. प्रसंगी घरदार, शेती विका पण ठेवीदाराचे पैसे द्या, ठेवीदाराचे पै न पै न वसुल केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला. मोर्चाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केले. हा मोर्चा दिघंची स्टॅन्ड पासून सुरुवात झाली. शाहू फुले आंबेडकर चौकातील संत सावता माळी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ढाल, ताशा, हलगीच्या तालावर मोर्चाला सुरुवात झाली.

ठेवीदाराच्या ठेवी मिळाल्याच पाहिजेत, संचालकानो मालमत्ता विका पण ठेवी द्या, संचालक मंडळाचे करायचे काय, खाली मुंडी वर पाय, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो, अशा घोषणा देत मोर्चा मुख्य बाजार पेठेतून संस्थेच्या अध्यक्षा स्नेहल शेटे यांच्या घरा समोर आला. या ठिकाणी संस्थेचे सचिव आणि अध्यक्षा यांना पाहताच ठेवीदार संत प्त झाले. काही महिला ठेवीदार सचिवाच्या अंगावर धावून गेल्या यानेच आमचे वाटुळे केले असे म्हणत महिलांनी सचिव हणमंत माळी यांच्या कानाखाली लगावली. महिलांनी पायातील काढून हातात घेतले मात्र महेश खराडे यांनी मध्यस्थी करत महिलांना शांत केले. यावेळी इंदुबाई झरे, सिंधुताई ढाले यांनी आपल्या करून कहाण्या सांगितल्या आमचे पती पैसे न मिळाल्याच्या नैराश्यातून मरण पावले, या वेळी उपस्थिताच्या डोळ्यात पाणी तरळले. आंदोलकासमोर बोलताना महेश खराडे म्हणाले साडे चार कोटीच्या ठेवी आहेत त्यातील एक रुपयाही मिळालेला नाही.

साडे पाच कोटीचे कर्ज वाटप बोगस आहे. मयत लोकांनाही कर्ज वाटप केल्याचे दाखविण्यात आले आहे. विना तारण कर्ज वाटप करण्यात आले आहे शेअर्स ची रक्कम ही हडपण्यात आली आहे. कर्ज वसुलीही करण्यात येत नाही, 101 आणि जप्तीची कारवाई ही सुरु नाही. त्यामुळे सदर संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमा, कर्जदाराच्यावर जप्तीची कारवाई सूरू करा, दोन वसुली अधिकारी नियुक्त करावी अशी मागणी त्यांनी केली. कर्जातून ठेवीच्या वसुली झाली नाही तर संस्थेच्या अध्यक्षा स्नेहल शेटे आणि सचिव हणमंत माळी यांनी त्यांची मालमत्ता विकून पैसे द्यावेत या घोटाळ्याला तेच जबाबदार आहेत त्यामुळे घरदार विकून पैसे वसुल करू पण एक पैही सोडणार नाही. ठेवीदारांना ठेवी मिळवून दिल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही.

असा इशारा खराडे यांनी शेवटी दिला.यावेळी राजकुमार पडळे, डॉ दिगंबर मोरे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी एक महिन्यात सर्व कर्जदारावर जप्तीची कारवाई करू आणि ठेवीदाराचे पैसे देण्यास सुरुवात करू असे लेखी पत्र संस्थेच्या वतीने देण्यात आले. यावेळी स्वाभिमानीचे तालुका अध्यक्ष विजय माने, पांडुरंग शेरकर, निवृत्ती औंधकर, मधुकर मोरे , मारुती भोसले, देवा यादव, शिवाजी सावंत आदिनी मनोगत व्यक्त केले यावेळी जगन्नाथ मोरे, अमित दबडे, केशव शिरकाडे, निशिकांत पोतदार उत्तम चंदनशिवे, गोरख चंदनशिवे आदिसह मोठ्या संख्येने महिला व पुरुष ठेवीदार उपस्थित होते.

Views: 91
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
मस्साजोगची पुनरावृत्ती असलेल्या संजय करचे खंडणी व खून प्रकरणात वडूज जिल्हा सातारा पोलिस आरोपीना पाठीशी घालत असल्याच्या निषेधार्थ मूक मोर्चा निवेदन सातारा पोलिस अधीक्षक यांना दिले

मस्साजोगची पुनरावृत्ती असलेल्या संजय करचे खंडणी व खून प्रकरणात वडूज जिल्हा सातारा पोलिस आरोपीना पाठीशी घालत असल्याच्या निषेधार्थ मूक मोर्चा निवेदन सातारा पोलिस अधीक्षक यांना दिले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)