• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

आयुष्यातले सांगाती ९ …डॉ मोहनजी भागवत……..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

माणगंगा by माणगंगा
June 21, 2025
in Uncategorized
0
आयुष्यातले सांगाती ७……महामहोपाध्याय डॉ वासुदेव विष्णू मिराशी..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

आयुष्यातले सांगाती ९ …डॉ मोहनजी भागवत……..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना यंदा १०० वर्षाची होत आहे. या संघटनेला आतापर्यंत पाच नेत्यांनी म्हणजेच सरसंघचालकांनी नेतृत्व दिले. सहावे नेतृत्व देणारे सरसंघचालक आहेत डॉ. मोहन मधुकर भागवत. संघ १०० वर्षाचा होत असताना आज मोहनजी भागवत हे जेमतेम पंचहत्तरीत आलेले आहेत. बहुदा संघात अगदी शिशु स्वयंसेवक ते सरसंघ चालक असा प्रवास करणारे ते पहिलेच सरसंघचालक असावेत. त्यांचे वडील मधुकरराव भागवत हे देखील फक्त संघाचे स्वयंसेवकच नव्हते तर ज्येष्ठ अधिकारी देखील होते. त्यामुळे अगदी लहानपणापासून संघ संस्कारात मोहन भागवत मोठे झाले आहेत. परिणामी ज्या चंद्रपूर शहरात ते लहानाचे मोठे झाले, त्या चंद्रपुरात, त्यानंतर विदर्भात आणि महाराष्ट्रात देखील त्यांच्याशी स्नेहसंबंध असणारे अनेक संघ स्वयंसेवक सापडतील. असे स्वयंसेवक भलेही संघात अधिकारी नसतीलही, मात्र आमचे आणि मोहनजींचे स्नेहबंध आहेत हे अशी मंडळी अभिमानाने सांगू शकतात.

डॉ. मोहन भागवतांशु माझे देखील स्नेहसंबंध आहेत हे सांगणाऱ्या अनेक भाग्यवानांपैकी मी देखील एक आहे. विशेष म्हणजे हे स्नेहसंबंध आजचे नाहीत, तर चक्क १९७१ पासूनचे आहेत.

मला आठवते १९७१ च्या मे महिन्यात मी संघातर्फे दरवर्षी आयोजित होणाऱ्या संघ शिक्षा वर्ग वर्गात प्रथम वर्ष प्रशिक्षणार्थी म्हणून गेलो होतो. त्यावेळी पहिल्याच दिवशी सकाळच्या सत्रात आम्हाला खड्ग शिकवण्यासाठी आमच्याच पेक्षा थोड्या जास्त वयाचा एक तरुण शिक्षक आला. संध्याकाळच्या सत्रातही हा तरुण शिक्षक आम्हाला शिकवण्यासाठी होता. त्या दोन दिवसात आमचे वयानुसार गण बनविले गेले आणि मग प्रथम वर्षांच्या तीन गणांची एक वाहिनी बनविली गेली. हा तरुण शिक्षक आमच्या वाहिनीचा वाहिनी प्रमुख म्हणून कार्यरत होता.

हळूहळू दोन-तीन दिवसात आम्हा सर्वांचाच एकमेकांशी परिचय होत गेला. त्यात आमचे शिक्षक असलेले आणि वाहिनी प्रमुख असणारे हे तरुण शिक्षक म्हणजे डॉ. मोहन भागवत हे होते. त्यावेळी ते नुकतेच पशुवैद्यकीची पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले होते. आता वयात फारसे अंतर नसल्यामुळे कधी कधी आमचे परस्परात हास्य विनोद देखील चालायचे. त्यावेळी मोहनजी नागपूरच्या घोष शाखेत कार्यरत होते. त्यांचे इतर समवयस्क स्वयंसेवक देखील संघ शिक्षा वर्गात होते. त्यामुळे त्यांचे एकमेकांच्या फिरक्या घेणे देखील चालायचे. आमच्याच पैकी कोणीतरी त्यांना प्रश्न विचारला,” मोहन मास्तर तुम्ही ढोर डॉक्टर झालात, आणि इकडे तुम्ही हिंदू समाजाला संघटित करण्यासाठी प्रयत्न करणार आहात म्हणता, तुमच्या या ढोर डॉक्टरकीचा इथे काय उपयोग होणार?” त्यावेळी मोहन मास्तरांनी फटकन उत्तर दिले “मी कधीमधी ढोरासारख्या वागणाऱ्या हिंदू समाजाला वठणीवर आणण्यासाठी माझ्या शिक्षणाचा उपयोग करीन. आज या घटनेला ५४ वर्ष झालीत. मात्र हे उत्तर माझ्या आजही लक्षात राहिले आहे.

नंतर सुमारे दोन आठवडे मोहन मास्तर आमच्या सोबत वाहिनी प्रमुख म्हणून होते. नंतर त्यांना पश्चिम बंगाल मध्ये कोलकाता येथे होणाऱ्या संघ शिक्षा वर्गात शिक्षक म्हणून पाठवले गेले होते. त्यामुळे उर्वरित पंधरा दिवसात त्यांचा संबंध आला नाही. मात्र संघ शिक्षा वर्ग आटोपल्यावर नंतरच्या काही संघ कार्यक्रमांमध्ये त्यांची भेट होत असे. त्यावेळी ते नागपूरलाच व्हेटर्नरी कॉलेजमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत होते. मग कधीमधी भेटले की गप्पा व्हायच्या. त्यावेळी भविष्यात हे गृहस्थ या विशाल संघटनेचे नेतृत्व करतील अशी मनात शंकाही आली नव्हती.

नंतर दोन वर्षांनी मोहनजी संघाचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून नागपूर बाहेर निघून गेले. मग आमच्या भेटीगाठी कमी झाल्या. मधल्या काळात मी देखील व्यवसायात गुंतलो होतो. मला आठवते १९७७ मध्ये संघ बंदी उठली आणि तत्कालीन सरसंघचालक स्वर्गीय बाळासाहेब देवरस नाशिक तुरुंगातून सुटून नागपूरला आले तेव्हा त्यांच्या स्वागत समारंभात माझी आणि मोहनजींची भेट झाली होती.

त्यानंतर मधली दहा अकरा वर्ष आमची भेट सर्व भेटच नव्हती. १९८८ मध्ये संघ शिक्षा वर्ग सुरू असताना ख्यातनाम चित्रपट दिग्दर्शक राजदत्त हे डॉ. हेडगेवार यांच्यावर एक माहितीपट बनवत होते. त्या माहितीपटाचे नागपुरात चित्रिकरण करत असताना राजदत्तांचे छायाचित्रकार बाळ बापट यांच्या १६ एम एम फिल्म कॅमेऱ्यात काही समस्या निर्माण झाली. त्यावेळी मी दूरदर्शनचा नागपूरातील छायाचित्रकार म्हणून कार्यरत होतो. माझ्याजवळ देखील १६ एमएम चा मूव्ही कॅमेरा होता. मोहनजी या उपक्रमाचे सूत्रसंचालन करत होते. एक दिवस मला संघ कार्यालयातून फोन आला. फोनवर मोहन भागवत बोलत होते. त्यांना माझा कॅमेरा उपलब्ध होऊ शकतो काय हे विचारण्यासाठी ते बोलत होते. त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी मला बोलावले होते.

योगायोगाने छायाचित्रकार बाळ बापट हे माझ्या वडिलांचे वर्गमित्रच होते. मग दुसऱ्या दिवशी सकाळी वडिलांना घेऊन कॅमेरासह रेशीमबाग कार्यालयात पोहोचलो. तिथे राजदत्त आणि बाळकाका यांची भेट झाली. रात्रभरात त्यांच्या कॅमेऱ्यात निर्माण झालेली समस्या दूर झाली होती. तितक्यात तिथे मोहनजी आले. बाळकाकांनी माझी ओळख करून दिली.” हा मोहन भागवत, काल यानेच तुला फोन केला होता.” मग मोहनजींनी विचारले “तुम्हीच अविनाश पाठक का? त्यावेळी मी त्यांना १९७१ च्या संघ शिक्षा वर्गाची आठवण दिली. तेव्हा लगेचच त्यांनाही आठवण झाली होती.

नंतरच्या काळात मोहनजी दीर्घकाळ महाराष्ट्राबाहेरच प्रचारक म्हणून कार्यरत होते. अधून मधून नागपुरात आले की त्यांचे कार्यक्रम असल्याचे वृत्तपत्रातून वाचायचो. या काळात माझाही संघाशी दैनंदिन स्तरावरील संपर्क कमी झाला होता. मी पूर्ण वेळ मुद्रीत माध्यमातील पत्रकार म्हणून कार्यरत झालो होतो. कधीमधी संघाचे काही कार्यक्रम किंवा पत्र परिषदांचे वृत्तांकन करायला गेल्यावर मोहनजींचे ओझरती भेट होत असे. मात्र जुने संदर्भ देऊन कधी बोलणे होत नसे.

२००० साली मार्च महिन्यात नागपुरात झालेल्या संघाच्या प्रतिनिधी सभेत सुदर्शनजी संघाचे नवे सरसंघचालक झाले. त्याच वेळी डॉ. मोहन भागवत हे सरकार्यवाह झाले. दुसऱ्याच दिवशी झालेल्या त्यांच्या पत्र परिषदेच्या वेळी माझी त्यांची भेट झाली खरी. पण ती धावतीच भेट होती.

२००९ मध्ये संघात पुन्हा खांदेपालट झाला. संघाचे पाचवे सरसंघचालक सुदर्शनजी यांनी सूत्रे खाली ठेवत डॉ मोहन भागवत यांच्याकडे सरसंघचालकपदाची सूत्रे सोपवली .या दिवशी ही घोषणा झाली, त्या दिवशी मी देखील रेशीमबाग परिसरात उपस्थित होतोच. मात्र त्यावेळी मोहनजींची प्रत्यक्ष भेट होऊ शकली नव्हती. या काळात मी संघाशी संबंधित असलेल्या हिंदुस्थान समाचार या वृत्तसंस्थेचा विदर्भ कार्यालयाचा प्रमुख म्हणून कार्यरत होतो.

नंतर दोनच दिवसांनी मला निरोप मिळाला की उद्या सकाळी नऊ वाजता नवे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे दीक्षाभूमीला भेट देणार आहेत. या भेटीचे वृत्तांकन करायला मी स्वतः तिथे पोहोचलो. ठरल्या वेळेवर मोहनजी तिथे पोहोचले. त्यांनी स्तुपात जाऊन डॉ. आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले, तसेच आंबेडकर आणि भगवान बुद्धाच्या प्रतिमांचेही दर्शन घेतले. नंतर तिथे उपस्थित त्यांची ते वार्तालाप करत होते. त्यावेळी संघाचे एक ज्येष्ठ अधिकारी सुधीर वराडपांडे यांनी माझा परिचय करून झाला दिला.” मोहनजी हे अविनाश पाठक, हिंदुस्तान समाचारचे इथले कार्यालय प्रमुख आहेत.” मी त्यांना हात जोडून नमस्कार केला. त्यावेळी ते क्षणभर माझ्याकडे निरखून बघत राहिले, आणि लगेच म्हणाले “मला वाटते अविनाशजी आपण आधी कुठेतरी खूपदा भेटलो आहोत”. मग मी लगेच त्यांना १९७१ च्या संघ शिक्षा वर्गाचा संदर्भ दिला. त्यांनाही ते लगेच आठवले “अरे बापरे त्यावेळेचा तू अविनाश पाठक आहेस तर, आता किती मोठा झाला आहेस? सहाजिक आहे काळही खूप लोटलाआहे. मग मी त्यांना सांगितले “त्यावेळी तुम्ही आम्हाला खड्ग शिकवायचे.” तर आपल्या मिश्किल शैलित माझ्याकडे बघत मोहनजी मला म्हणाले, “म्हणूनच आता तू तुझ्या लेखणीचे खड्ग जोरदार फिरवतोस, बरोबर आहे ना.” आणि सर्वांनाच हसू आवरले नाही.

या भेटीनंतर अधून मधून मोहनजींची माझी भेट होऊ लागली. कधी कार्यक्रमाच्या निमित्ताने तर कधी पत्र परिषदांमध्ये, असे आम्ही भेटत राहिलो. दरवेळी मोहनजी ओळखीचे स्मित यायचे. हिंदुस्थान समाचारचे तत्कालीन प्रभारी श्रीकांतजी जोशी आणि लक्ष्मीनारायणजी भाला हे संघ कार्यालयात आले असले की त्यांना भेटायला गेल्यावर कधी मोहनजी असले तर अचानक भेट व्हायची. भेटले की आवर्जून ते चौकशी करायचे.

२०१३ मध्ये संघाचे ज्येष्ठ प्रचारक आणि हिंदुस्थान समाचारचे तत्कालीन पालक लक्ष्मीनारायणजी भाला यांनी डॉ. हेडगेवार यांच्यावर रचलेल्या गीतांचे गायन करून संस्कार भारतीने त्याच्या सीडीज तयार केल्या होत्या. या सीडीजचा लोकार्पण सोहळा नागपुरात सायंटिफिक सभागृहात होणार होता. सायंटिफिक सभागृहापासून माझे घर आणि हिंदुस्थान समाचारचे कार्यालय अगदी जवळ होते. त्यामुळे भालाजींनी या कार्यक्रमानंतर मोहनजींना चहा पाण्यासाठी माझ्याच घरी आणायचे ठरवले होते. मात्र ऐनवेळी कार्यक्रमात बदल झाला आणि दुसऱ्याच एका कार्यकर्त्याच्या घरी त्यांचे चहापान आयोजित करण्यात आले. त्यावेळी तिथे भालाजींनी मोहनजींना सांगितले की आधी अविनाशजींच्याच घरी तुमचे चहापान ठरले होते. लगेचच मोहनजी उद्गारले “हरकत नाही पुन्हा कधीतरी लवकरच तुझ्या घरी देखील मी येईल”. (अर्थात अजूनही तो योग आलेला नाही.)

मधल्या काळात मी समाज माध्यमांवर इंडिया हटाव भारत बनाव ही मोहीम चालवली होती. संघातील काही अधिकाऱ्यांनी ही बाब मी मोहनजींच्या कानावर घालावी असे सुचवले. त्यामुळे त्या संदर्भातील माझे लेख आणि त्यांची कात्रणे असे सर्व घेऊन मी मोहनजींना महाल कार्यालयात भेटलो होतो. तेव्हा मोहनजींनी “संघाच्या डोक्यातही हा विषय आहे. तू तुझ्या स्तरावर जनजागरण करत रहा. योग्य वेळी संघ देखील हा मुद्दा उचलेल, असे त्यांनी मला सांगितले होते. योगायोगाने सुमारे दोन वर्षांपूर्वी मोहनजींनी एका भाषणात इंडिया हे नाव हटवले गेले पाहिजे ही अपेक्षा व्यक्त केली होती. त्यानंतर राष्ट्रपती भवनाच्या एका कार्यक्रम पत्रिकेतही इंडिया हे नाव हटवून भारत हे नाव सर्वत्र वापरले गेले होते.

२०१७ मध्ये जून महिन्यात संघ शिक्षा वर्ग संपला आणि दुसऱ्याच दिवशी एका कार्यक्रमात मोहनजींची माझी भेट झाली. त्यावेळी मोहनजी व्यासपीठावर होते आणि मी पहिल्याच रांगेत बसलो होतो. माझ्याकडे पाहून त्यांनी ओळखीचे स्मित दिले. कार्यक्रम संपल्यावर मी व्यासपीठावर मोहनजींना भेटायला गेलो.” काय रे खूप दिवसात तुझी भेट नाही” असे त्यांनी म्हणतातच मीही त्यांना बोललो “मलाही तुमची भेट हवी आहे” हे मी बोलत असतानाच तिथे नागपूर महानगर संघाचालक राजेश लोया आणि महानगर कार्यवाह रवींद्र (गुंडुजी) बोकारे पोहोचले. लगेच गुंडूजींनी विचारले “मोहनजी अविनाशजी अभिनंदन केले की नाही?” त्यावर मोहनजी लगेच विचारते झाले “याने काय असे केले आहे?” तर गुंडूजींनी लगेच सांगितले अविनाशजींनी नाही पण त्यांच्या मुलीने दहावी आणि बारावी दोन्ही परीक्षांमध्ये संस्कृत मध्ये शंभर पैकी शंभर मार्क मिळवले आहेत.” हे ऐकताच मोहनजी लगेच उद्गारले, “मग आता तुला नाही, तुझ्या मुलीलाच मी भेटणार” लगेच त्यांनी बोकारेंना सूचना दिल्या.” आज रात्री मी प्रवासाला जातो आहे. मी १८ जूनला परत येईल. त्या दिवशी आल्यावर मला आठवण दे. आपण याला, याच्या मुलीला आणि वहिनींना संघ कार्यालयात भेटायला बोलावून घेऊ.” लगेच मलाही सांगितले “तू देखील १८ तारखेनंतर गुंडूला आठवण दे”.

मोहनजींनी हे सांगितले खरे, मात्र मी ते फारसे गांभीर्याने घेतले नाही. कारण मी असा विचार केला की इतक्या मोठ्या माणसाने “मी तुझ्या मुलीला भेटतो” हे म्हटले हेच खूप झाले. त्यांच्या व्यस्ततेत त्यांना कुठे वेळ होणार आहे? त्यामुळे मी विसरूनही गेलो.

मात्र २० जूनला माझ्या मोबाईलवर एक फोन आला. ट्रू कॉलरवर संघ कार्यालय महाल असे लिहून आले होते. इथून कसला फोन आलाय असावा असा मी विचार करत फोन उचलला आणि मला सांगण्यात आले की २२ जून रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता तुम्हाला वहिनींना आणि तुमच्या टॉपर मुलीला महाल कार्यालयात मोहनजी भागवतांनी भेटायला बोलावले आहे. हा फोन माझ्यासाठी एक सुखद धक्का होता.

मग आम्ही ठरल्याप्रमाणे मी माझी पत्नी आणि मुलगी दिव्येशा असे तिघेही महाल कार्यालयात पोहोचलो. आता इतक्या मोठ्या माणसाने भेटायला बोलावले तर काहीतरी न्यायला हवे म्हणून आम्ही पेढ्यांचा बॉक्स सोबत घेऊन गेलो होतो. त्यावेळी मोहनजींनी आमचे त्यांच्या कक्षात स्वागत केले. दिव्येशाने त्यांना नमस्कार केला आणि पेढेही दिले तेव्हा त्यांनी तिला गणपतीची एक छोटी मूर्ती सप्रेम भेट म्हणून दिली.” मग तू पुढे काय करणार?” याचीही त्यांनी चौकशी केली.” आता तू भलेही इंजिनियर होणार असलीस, तरी संस्कृत विसरू नकोस, आणि घराघरात संस्कृत कसे पोहोचेल हा विचार कर” असे मार्गदर्शनही त्यांनी केले. सौ अनुरूपा जेव्हा मोहनजींच्या पाया पडू लागली, तेव्हा त्यांनी लगेचच पाय मागे घेत हो माझ्या पाया पडू नका असे सांगून तिला थांबवले. मग थोडा वेळ बोलून आम्ही तिथून निघालो. मोहनजींच्या भेटीबद्दल मी सहजच व्हाट्सअप वर टाकले. तेव्हा अनेक पत्रकार मित्रांचे फोन आले, आणि त्यांनी फक्त महाराष्ट्रातच नाही तर गुजरात पर्यंत ही बातमी पोहोचवली.

२०१९ च्या फेब्रुवारी महिन्यात नागपूरकर भोसले परिवाराच्या राजरत्न प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या राजरत्न पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख अतिथी मोहनजी होते. त्या कार्यक्रमात मला देखील त्यावर्षीचा पत्रकारितेचा राजरत्न पुरस्कार मिळाला होता. त्या दरम्यानच माझा स्कूटर एक्सीडेंट झाला होता. पायाचे प्लास्टर नुकतेच निघाले होते. मात्र हातात गाठी घेऊच चालावे लागत होते. पुरस्कारासाठी माझे नाव पुकारले जाताच मी काठी टेकतच व्यासपीठावर गेलो. माझ्याकडे बघून नेहमीच्या मिष्कील शैलीत हसत मोहनजी विचारते झाले,” काय कुठे उपद्रव केलास?” मग मी स्कूटर चा एक्सीडेंट असे सांगताच जरा सांभाळून गाडी चालवत जा असे देखील त्यांनी ठाणकावले. मग पुरस्कार देताना आधी अंगावर शाल घातली, मग हातात श्रीफळ नंतर रोख रकमेचा लिफाफा मग मानपत्र, स्मृती चिन्ह आणि शेवटी तुळशीचे रोप असलेली कुंडी हे हातात दिले. हळूच मोहनजी मला मिश्किलपणे विचारते झाले “हे सर्व सांभाळून नेणे जमेल ना?” मग मीही उत्तर दिले,” तुम्ही सोपवले आहे तर सांभाळावे लागेलच” मग त्यांनी प्रेमाने माझ्या पाठीवर थोपटले आणि मी व्यासपीठाखाली उत्तरलो. त्यादिवशी भाषणात मी मोहनजींच्या हस्ते माझा सत्कार झाल्याबद्दल विशेष आनंद व्यक्त केला होता. मोहनजींनी देखील आपल्या भाषणात माझा विशेष उल्लेख केला होता. कार्यक्रमानंतर चहा पाण्याच्या वेळेस पुन्हा आमची भेट झाली. तिथे माझी मुलगी दिव्येशा देखील सोबत होती. मोहनजींनी “तू आता काय करतेस?” म्हणून तिची आवर्जून चौकशी केली होती.

जानेवारी २०२४ मध्ये राम मंदिराचे लोकार्पण होते. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार होते. त्यावेळी मी अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या विदर्भ प्रांताचा कार्याध्यक्ष होतो. साहित्य परिषदेतर्फे अयोध्येच्या इतिहासावर आणि राम मंदिराच्या संघर्षावर प्रकाश टाकणारे माधव भंडारी च्या हिंदी पुस्तकाचे लोकार्पण सोहळा आम्ही आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मोहनजींनी यावे म्हणून त्यांना विनंती करण्यासाठी मी डिसेंबर २०२३ मध्ये मोहनजींना महाल कार्यालयात भेटलो होतो. त्यावेळी पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे कार्यक्रमाला येऊ शकणार नाही हे मोहनजींनी स्पष्ट केले होते. मात्र या पुस्तकाचे तुम्ही लोकार्पण करत आहात ही चांगली बाब आहे म्हणून साहित्य परिषदेच्या उपक्रमाचे त्यांनी कौतुकही केले होते.

या भेटीनंतर गेल्या जवळजवळ दीड वर्षात माझी आणि मोहनजींची प्रत्यक्ष भेट नाही. अर्थात तसा प्रसंगही आला नाही. मात्र अचानक कधीतरी असा प्रसंग येईल आणि तिथे भेटल्यावर मोहनजी नेहमीच्या मिष्कील शैलीत “काय रे कसा आहेस तू?” म्हणून चौकशी करतील याची मला खात्री आहे.

आज जगात जिथे जिथे हिंदू माणूस पोहोचला आहे, तिथे तिथे डॉक्टर मोहन भागवत हे नाव परिचित आहे. आज पंचाहत्तरीत आलेले डॉ. मोहन भागवत भारतभर प्रवास करत असतात. त्यांच्याच कार्यकाळात संघाची शताब्दी साजरी होत आहे. डॉ हेडगेवार यांनी १९२५ साली जे संघविचारांचे रोपटे लावले, त्याचा आज विशाल वटवृक्ष झाला आहे. संघाच्या या वाटचालीत मोलाचे योगदान देणाऱ्या या महान व्यक्तीशी आयुष्यातले काही क्षण तरी माझे स्नेहबंध जुळले आहेत, ही माझ्यासाठी खरोखरीच भाग्याचीच बाब आहे.

Views: 87
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
अभिनेत्री प्राजक्ता शिंदे 2nd International Achievers Award 2025 भूतान मध्ये प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार

अभिनेत्री प्राजक्ता शिंदे 2nd International Achievers Award 2025 भूतान मध्ये प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)