कलेढोण सरपंच पदावर पुन्हा प्रीती शेटे….अपात्र आदेशाला ग्रामविकास खात्याची स्थगिती
अपात्र आदेशाला ग्रामविकास खात्याची स्थगिती
मायणी दि.२२:- प्रतिनिधी ,दत्ता कोळी
कलेढोण सरपंच सौ.प्रीती शेटे यांनी विभागीय आयुक्तच्या अपात्र करण्याचा निर्णय विरुद्ध महाराष्ट शासन ग्रामविकास विभागाकडे अपील दाखल केले होते. सरपंच अपात्र करण्याचा निर्णयाला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी १८ जून रोजी स्थगिती दिली. यामुळे पुन्हा. कलेढोण मध्ये सरपंच पदी सौ.प्रीती शेटे यांनी पदभार स्वीकारला.
कलेढोण ग्रामपंचायत निवडणूक झाल्यापासून गेली साडेचार वर्षात विविध राजकीय घडामोडी घडल्या.या साडेचार वर्षाच्या कालावधी मध्ये सरपंच प्रीतीताई शेटे यांनी सलग तीन वेळा पदभार स्वीकारला.मागील निवडणुकीमध्ये ग्रामविकास आघाडी मध्ये ॲड.शरदचंद्र भोसले, सुरेशशेठ शिंदे , सोमनाथ शेटे यांनी एकत्र येऊन ग्रामपंचायत वर सत्ता स्थापित केली होती. यावेळी सरपंच म्हणून सौ प्रीती ताई शेटे यांची एकमताने निवड झाली. त्यानंतर दोन वर्ष सरपंच पदी प्रीतीताई शेटे यांनी कारभार पाहिला.
दोन वर्षानंतर त्यांनी स्वगृही हनुमान पॅनल मध्ये प्रवेश केला आणि पुन्हा एकदा पदभार स्वीकारला. मागील विधानसभा निवडणुकीमध्ये कलेढोण मध्ये भाजपा उमेदवार जयकुमार गोरे यांचा उघड प्रचार याठिकाणी सरपंच प्रतिनिधी सुहास शेटे यांनी व नवीन कलेढोण भाजपा टीम ने केला.
यादरम्यान सरपंच यांच्यावर विरोधी गटाने विविध आरोप शृंखला सुरू ठेवली. याला तोंड देत पुढील अडीच वर्षाचा कालावधी यशस्वी पार केला.
यादरम्यान जलसंधारण खाडाखोड आणि पती हस्तक्षेप या मुद्द्यावर विभागीय आयुक्त सरपंच यांना पदावरून हटविण्याचा निर्णय दिला. सदर निकाल मान्य नसल्याने सरपंच यांनी महाराष्ट्र शासन ग्रामविकास खात्याकडे रीतसर अपील दाखल केले.सदर अपील वर ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे यांनी स्थगिती दिली.यामुळे पुन्हा कलेढोण मध्ये भाजपा गट चा व हनुमान पॅनेल संपूर्ण सहकार्य असलेला सरपंच पदी पुन्हा तिसऱ्यांदा मिरवणुक काढून सरपंच पदभार स्वीकारला.
कदाचित सलग तीन वेळा पदभार घेणारे आणि या राजकीय घडामोडीत आरोप प्रत्यारोप सुरू असताना ग्रामपंचायत , बीडीओ ,सीईओ, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि शेवटी मंत्रालय पायरी चढणाऱ्या पहिल्या महिला सरपंच प्रीती शेटे ठरल्या आहेत. त्याचं कार्यकाला मधील प्रत्येक विकास कामामध्ये भ्रष्टाचार तक्रारी विरोधकांनी केल्या होत्या एकही आरोप सिद्ध करण्यात विरोधक यशस्वी झाले नाहीत.संजीव साळुंखे ,सोमनाथ शेटे,राजेंद्र लोखंडे,अनिल भोसले, यांनी या प्रकियामध्ये ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे ,माजी आमदार डॉ. येळगावकर, भाजप खटाव तालुका विधानसभा प्रमुख सोमनाथ भोसले, विशाल बागल, यांनी केलेल्या सहकार्य व स्थगिती निर्णयाबद्दल त्यांचे आभार मानले आणि लवकरच त्यांचा सत्कार कलेढोण येथे करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले.
यावेळी भाजप कलेढोण चे अनिल भोसले, राजेंद्र कणसे, जालिंदर बुधावले, नागेश सरगर, अमोल पाटील , कृष्णा शिंदे, राजेंद्र लोखंडे, सरपंच प्रतिनिधी सुहास शेटे,राजेंद्र कणसे , बाबजी बुधावले, राजेंद्र लोखंडे,गारुडी सरपंच नागेश सरगर,विजय जाधव, शंकर चव्हाण, सुरज तांबोळी,दत्ता खरात, सुनील लोखंडे, मोहन खांडेकर, रमेश सकट ,राजेंद्र लिगाडे, केतन महाजन,संतोष चौगुले, बरकत शिकलगार,सतीश साळुंखे, राजेंद्र रसाळ,रफिक मुलानी, श्रीकांत म्हेत्रे,युवराज बुधावले,बाळू शिंदे,शंकर चव्हाण, अनिल ढोले,कुंडलिक बुधावले, अक्षय लोखंडे, पप्पू आडके,सर्व भाजप कार्यकर्ते व हनुमान पॅनल सर्वेसर्वा संजय साळुंखे, राजेंद्र नायकुडे, संजय टकले, विजय साखरे, चंद्रकांत शेटे, सोमनाथ शेटे,मजनू मुलानी, शेखर महाजन,प्रकाश शेटे, महेश पाटील , अभिजित दबडे ,गुलाब भाई शिकलगार, सत्यजित साळुंखे, सरपंच प्रिती शेटे,ग्रामपंचायत सदस्य मनिषा कणसे,कलावती साळुंखे, मुमताज तांबोळी,बशीदा मुलानी,अमोल पाटील,बरकत शिकलगार ,इतर मान्यवर उपस्थित होते.


