• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

आर्यारवी एंटरटेनमेंट आयोजीत कलाकार बॉक्स क्रिकेट लीग – 2025 कलावंतांच्या जोशपूर्ण उत्साहात संपन्न..!

माणगंगा by माणगंगा
June 24, 2025
in Uncategorized
0
आर्यारवी एंटरटेनमेंट आयोजीत कलाकार बॉक्स क्रिकेट लीग – 2025 कलावंतांच्या जोशपूर्ण उत्साहात संपन्न..!

आर्यारवी एंटरटेनमेंट आयोजीत कलाकार बॉक्स क्रिकेट लीग – 2025 कलावंतांच्या जोशपूर्ण उत्साहात संपन्न..!

मुंबई, परेल (प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)


आर्यारवी एंटरटेनमेंटच्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाच्या यशस्वी पर्वानंतर आर्यारवी एंटरटेनमेंटने प्रथमच कलाकार बॉक्स क्रिकेट लीगचे आयोजन केले होते. ह्या बॉक्स लीगचे उदघाटन प्रसिद्ध समाजसेवक सन्माननीय डॉ. कौतिक दांडगे सर (संस्थापक, अध्यक्ष – महाराष्ट्र बाजार पेठ) यांच्या हस्ते नुकतेच परेल येथील टर्फ मैदानावर नारळ वाढवून करण्यात आले. याप्रसंगी आर्यारवी एंटरटेनमेंट प्रॉडक्शनचे सर्वेसर्वा श्री महेश्वर भिकाजी तेटांबे, प्रसिद्ध समाजसेवक सुशांत साळुंखे, आयोजक राजवीर जाधव, प्रबोधन शिरवाडकर, प्रणेश लोगडे, लक्ष्मी मनीष गुप्ता, अविनाश राऊत, संचित यादव, सागर डोके, संदीप भाकरे, अविनाश राऊत, समीर काळबे, सिने ग्राफिक डिझायनर मनीष व्हटकर, प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक अनंत सुतार, रमेश यादव सर आदी मान्यवर उपस्थित होते. ही बॉक्स क्रिकेट लीग फक्त एकांकिका, नाटक, दूरदर्शन, मालिका आणि सिनेमा यातील कलावंतापुरता मर्यादित होती. या बॉक्स क्रिकेट लीगमध्ये एकूण आठ संघ सहभागी झाले होते. त्यात प्रामुख्याने “साठेची कार्टी”, “सिने डान्सर”, “मोरया”, “कर्टन कॉल”, “ॐ साई प्रॉडक्शन”, “भावकादेवी प्रॉडक्शन”, “स्वामी समर्थ कलामंच” आणि “के स्टार”. परेल वर्कशॉप जवळील मध्य रेल्वे मेकॅनिक्स इन्स्टिटयूट पोल मुंबई १२ क्रिकमेनिया ग्रीनलंड या टर्फ मैदानावर रंगलेल्या उत्साही वातावरणातील जोशपूर्ण अशा अटीतटीच्या आणि मनोरंजकपूर्ण सामन्यात मुंबईच्या “सिने डान्सर” संघाने बाजी मारून कलाकार बॉक्स क्रिकेट लीग – २०२५ चा कै.भिकाजी महादेव तेटांबे आणि कै.मनोरमा भिकाजी तेटांबे यांच्या स्मरणार्थ प्रथम विजेता चषक पटकावला तर “मोरया” संघाने कौतिक दांडगे यांच्या सौजन्य प्रित्यर्थ उपविजेता चषक पटकावला.

त्याचप्रमाणे या बॉक्स क्रिकेट लीगमध्ये लोकनेते कै.विठ्ठलदादा खाडे आणि कै.सुनीताताई विठ्ठलराव खाडे यांच्या स्मरणार्थ 16 मॅन ऑफ द मॅच, कै.गीता आनंदा जाधव यांच्या समरणार्थ मॅन ऑफ द सिरीज, कै.शामराव नारायण व्हटकर आणि कै.हौसाबाई शामराव व्हटकर यांच्या स्मरणार्थ उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक अशी विविध पारितोषिके प्रदान करण्यात आली. आर्यारवी एंटरटेनमेंटची ही प्रथमच कलाकार बॉक्स क्रिकेट लीग – २०२५ टूर्नामेंट यशस्वीरीत्या संपन्न करण्यासाठी सौ माधुरी मांजरेकर (म.उप.विभाग संघटक-वडाळा विधानसभा-उबाठा), डॉ. साजिदा अत्तर (प्रसिद्ध समाजसेविका), श्री.मनीष पाथरे (जिल्हा संपर्क अध्यक्ष द. रत्नागिरी – मनविसे), खलील शिरगांवकर (प्रसिद्ध समाजसेवक), दिलीप कराड, भूषण शिर्के (प्रसिद्ध समाजसेवक), शैलेश काळे (प्रसिद्ध समाजसेवक), श्रीं नितीन जाधव (प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक), श्री कुशल धुरी (उपाध्यक्ष – मनविसे), आणि सो लक्ष्मी मनीष गुप्ता (प्रसिद्ध समाजसेविका) यांनी विशेष मेहनत घेतली. अशा तऱ्हेने खेळीमेळीच्या आणि कलावंतांच्या जोशपूर्ण वातावरणामध्ये आर्यारवी एंटरटेनमेंटची ही पहिली कलाकार बॉक्स क्रिकेट लीग उत्साहात संपन्न झाली

Views: 54
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
आयुष्यातले सांगाती ७……महामहोपाध्याय डॉ वासुदेव विष्णू मिराशी..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

*घ्या समजून राजेहो…आणीबाणीची पन्नाशीज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)