• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

शक्तिपीठ महामार्ग शेती बचाव कृती समिती १ जुलै रोजी अंकली चौकात शक्तिपीठ विरोधात करणार रास्ता रोको….

माणगंगा by माणगंगा
June 27, 2025
in Uncategorized
0
शक्तिपीठ महामार्ग शेती बचाव कृती समिती  १ जुलै रोजी अंकली चौकात शक्तिपीठ विरोधात करणार  रास्ता रोको….

*शक्तिपीठ महामार्ग शेती बचाव* *कृती समिती* *दि. २७.६.२०२५* *१ जुलै रोजी अंकली चौकात* *शक्तिपीठ विरोधात* *रास्ता रोको….*

शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याचे अश्वासन विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर तत्कालीन मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्या अश्वासनाला सरकारने हारताळ फासत बारा जिल्ह्यात जमीन मोजणीस पोलीसबंदोबस्तात सुरवात केली आहे. सरकारच्या या कृतीला महाराष्ट्रातील शेतकरी जोरदार प्रतीकार करीत आहेत. आणी मोजणी बंद पाडीत आहेत. सरकारच्या या कृतीच्या विरोधात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज सांगलीत बाधित शेतकरी प्रतिनीधींची बैठक पार पडली. आणी १ तारखेस अंकली चौकात रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या अगोदर संवाद दुत म्हणुनआलेल्या अधिकऱ्यांना शेतकऱ्यांनी हाकलून लावले. त्यानंतर कोणतेही अधिकारी गावात आल्यास त्यांना काळे फासून त्यांची धिंड काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर कोणीही अधिकारी गावात आले नाहीत.

शेतकऱ्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी गावोगावी मोजणी करताना पोलीस बंदोबस्त पाठवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. कवठेमहांकाळ , तासगाव, मिरज तालुक्यातील सर्वच गावातील शेतकऱ्यांनी एकत्रीत येत आप आपल्या गावातुन संवाद दुत म्हणुन आलेल्या अधिकाऱ्यांना अक्षरशः पळवून लावले. व कोणताही संवाद न करता अधिकार्यांना आल्या पावली परत फिरावे लागले.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वत:चे स्वप्न पुर्ण करण्याकरिता शेतकऱ्यांच्या घरावर नांगर फिरवणार असतील तर महाराष्ट्रातील शेतकरी अशी हुकुमशाही प्रवृत्ती चालु देणार नाही. हे शेतकऱ्यांनी या अगोदर देखिल दाखवुन दिले आहे. आताही शेतकऱ्यांवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न शेतकरी हाणून पाडल्याशिवाय राहणार नाहीत. हा ईशारा आम्ही सरकारला देत आहोत. शक्तिपीठ मुळे शेतकऱ्यांचे, शेतीचे आणी पर्यावरणाचे फार मोठे नुकसान होणार आहे. सांगली परिसरातील गावांना महापुराचा धोका वाढणार आहे. शेतकऱ्यांच्या पुढील अनेक पिढ्यांचे नुकसान होणार आहे. हे सरकारला अनेक वेळा सांगुन देखील मुख्यमंत्री आणी त्यांचे सरकार आपला हट्ट सोडायला तयार नाहीत.

म्हणुन ही लढाई अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. ही लढाई जशी रस्त्यावर राहील तशी आमच्या गावात आणी शेतात राहील. त्याचा पहीला हिसका गावात आलेल्या अधिकार्यांना दाखवला आहे. पुढेही दाखवु पण महामार्ग होउ देणार नाही. आमची शेती वाचवु. त्यासाठी रक्त सांडायची देखिल तयारी आमची आहे.

दि. १ जुलै हा कृषी दिन आहे, विधानसभेचे अधिवेशन चालु होत आहे. म्हणून या दिवशी रास्ता रोको करणार आहोत. सांगली जिल्ह्यातील १९ गावातील शेतकऱ्यांनी तसेच महापुर बाधित जनतेनी १ जुलै रोजी १० वा. अंकली चौकात मोठ्या संख्येनी या आंदोलनासाठी उपस्थित राहण्याचे अवाहन आम्ही करीत आहोत. महेश खराडे सतीश साखळकर प्रवीण पाटील प्रभाकर तोडकर उमेश एडके पैलवान विष्णुपंत पाटील यशवंत हरगुडे राजाराम माळी सतीश माळी अण्णासाहेब जमदाडे सुरेश पाचुंबरे अधिकराव शिंदे रवींद्र माळी भीमाना खाडे एकनाथ कोळी उत्तम शिंदे रघुनाथ पाटील विलास पाटील भाऊसाहेब लांडगे मुरलीधर निकम उपस्थित होते.

Views: 53
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
आयुष्यातले सांगाती ७……महामहोपाध्याय डॉ वासुदेव विष्णू मिराशी..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

आयुष्यातले सांगाती १०,श्रीपाद सहस्रभोजने…,ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)