• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

आयुष्यातले सांगाती ११,पुरुषोत्तम दारव्हेकर..,*ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

माणगंगा by माणगंगा
July 1, 2025
in Uncategorized
0
आयुष्यातले सांगाती ७……महामहोपाध्याय डॉ वासुदेव विष्णू मिराशी..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

*आयुष्यातले सांगाती ११*,*पुरुषोत्तम दारव्हेकर..*,*ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

*जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७एका काळात मराठी व्यावसायिक नाटक म्हणजे मुंबई असे समीकरणच ठरले होते. त्या काळात चांगली नाटके लिहिली जायची ती मुंबईत. तसेच तिथलेच निर्माते दिग्दर्शक आणि कलाकार पुढे यायचे, आणि देशभर जिथे मराठी माणूस असेल तिथे जाऊन ते नाट्यप्रयोग करायचे.या काळात नागपुरात मराठी नाटके लिहून ती व्यावसायिक कलावंतांकडून सादर करून मराठी जगतात मानाचे स्थान मिळवणारे तसेच मुंबईतील दर्जेदार मराठी नाटके व्यावसायिक कलावंतांकडून बसवून घेऊन दिग्दर्शन यशस्वीरित्या करणारे एकच वैदर्भीय नाव महाराष्ट्रभर गाजत होते, ते म्हणजे पुरुषोत्तम दारव्हेकर.नागपुरातच जन्मलेल्या आणि इथेच शिक्षण घेतलेल्या दारव्हेकरांनी नागपूरलाच आपली कर्मभूमी बनवले होते. आकाशवाणीत नोकरी करता करता त्यांनी नाट्य सेवा देखील सुरू केली. आपल्या काळात त्यांनी तो मी नव्हेच, नटसम्राट, अश्रूंची झाली फुले अशा दर्जेदार नाटकांचे व्यावसायिक प्रयोग केले, तर त्यांनीच लिहिलेल्या कट्यार काळजात घुसली, अबोल झाली सतार, चंद्र नभीचा ढळला, काळी माती खारे पाणी, अशी विविध नाटके लिहिली आणि त्याचे व्यावसायिक प्रयोग करून फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर जिथे जिथे मराठी माणूस पोहोचला, तिथपर्यंत नेऊन गाजवले. त्यांच्या कट्यार काळजात घुसली या नाटकावर चित्रपट देखील निघालेला आहे. त्यांच्या तालमीत तयार झालेले गणेश सोळंकी, किशोर प्रधान, यांच्यासारखे काही कलावंत नागपुरातून जाऊन मुंबईतही आपले स्थान निर्माण करते झाले.असे चतुरस्त्र व्यक्तिमत्व असलेल्या पुरुषोत्तम दारव्हेकरांचा आणि माझाही काही काळ संबंध आला होता. तो संबंध काही कारणामुळे फार काळ कायम राहिला नाही. मात्र त्यातल्या आठवणी आजही जाग्या होतात. पुरुषोत्तम दारव्हेकर हे नाव अगदी लहानपणापासून परिचित होते. शाळेत असताना घरी येणाऱ्या तरुण भारतात कधी अबोल झाली सतार, तर कधी अश्रूंची झाली फुले, कधी चंद्र नभीचा ढळला, अशा नाटकांची जाहिरात आलेली बघायचो. त्यात खाली दिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर असे लिहिलेले असायचे. बरेचदा वृत्तपत्रांमध्ये नाटकांवर परीक्षणे देखील यायची. त्यातही दारव्हेकरांचा उल्लेख असायचा. नागपूर आकाशवाणीवर त्यांनी दिग्दर्शित केलेली विविध नाटके देखील आम्ही ऐकायचो. तसेच बालविहार या बालगोपालांच्या लोकप्रिय कार्यक्रमाचे देखील ते निर्माते होते.त्यामुळे या माणसाची आपली कधीतरी भेट व्हावी असे खूपदा वाटायचे.

मात्र भेटीची संधी कधीच येत नव्हती. तरीही हळूहळू त्यांच्याबाबत माहिती कळायला लागली होती. हे एक उत्तम लेखक होते तसेच उत्तम दिग्दर्शक देखील होते. एखादे नाटक दिग्दर्शित करायचे, तर ते त्यात पूर्ण जीव ओतून काम करायचे. तितकेच शिस्तबद्ध पद्धतीने ते आपल्या सहकलाकारांकडून देखील काम करून घ्यायचे. त्यामुळे फक्त नाट्यक्षेत्रच नाही तर समस्त सांस्कृतिक क्षेत्रातही ते दारव्हेकर मास्तर म्हणूनच प्रसिद्ध झाले होते. मास्तरांना मी पहिल्यांदा भेटलो तेव्हा मी जेमतेम १८ वर्षाचा होतो. आमच्या कॉलेजच्या सांस्कृतिक मंडळात त्यांचा विद्यार्थ्यांसोबत संवादाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी वडिलांनी मला अगफा सुपर अआयसोलेट कॅमेरा घेऊन दिला होता. त्या कॅमेऱ्याच्या मदतीने मी कॉलेजमध्ये विविध कार्यक्रमांचे फोटो काढत असे. त्या कार्यक्रमाचेही मी फोटो काढत होतो. कार्यक्रम संपल्यावर आमच्या सरांनी सर्व प्रमुख विद्यार्थ्यांचा मास्तरांशी परिचय करून दिला. त्यावेळी माझाही परिचय करून दिला. मग “कॉलेज शिकता शिकताच तू फोटो काढतोस का?” अशी त्यांनी चौकशी देखील केली. “कधीतरी आकाशवाणीत ये सवडीने भेटू” असे त्यांनी सांगितले. मात्र माझे काही जाणे झाले नाही. नंतरच्या काळात त्यांची मुंबईला विविध भारती मध्ये बदली झाल्याची बातमी आली. त्यामुळे त्या काळात त्यांची माझी भेट झालीच नाही.कॉलेज शिक्षण आटोपल्यावर मी फोटोग्राफीच्या व्यवसायात आलो. लगेचच काही दिवसात मुंबई दूरदर्शन साठी विदर्भातील चलत्चित्रण करणारा छायाचित्रकार म्हणून मी कंत्राटी पद्धतीवर काम देखील सुरू केले. त्याच काळात मास्तरांचा मोठा मुलगा रंजन दारव्हेकर याच्याशी माझी ओळख झाली. आमच्या नियमित भेटी गाठी होऊ लागल्या. त्याच्याकडून मग कधीमधी मास्तरांचा विषय निघायचा. १९८४ मध्ये राम गणेश गडकरी यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होणार होते. त्यानिमित्ताने सावनेर मध्ये गडकरींच्या घरापासून एका दिंडीचे आणि नंतर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्याच दिवशी संध्याकाळी गडकरींच्या नाटकातील प्रवेशावर आधारित एक कार्यक्रम धनवटे रंगमंदिरात आयोजित करण्यात आला होता. या दोन्ही कार्यक्रमांना प्रमुख अतिथी म्हणून दारव्हेकर मास्तर राहणार होते. त्या दिवशी सावनेरला तब्बल बारा वर्षांनी माझी आणि मास्तरांची भेट झाली.

तो कार्यक्रम मी त्यावेळी दूरदर्शनसाठी कव्हर करायला गेलो होतो. तिथे रंजनने माझी त्यांची नव्याने मास्तरांशी ओळख करून दिली. कॉलेजमध्ये असताना झालेल्या भेटीचीही मी मास्तरांना आठवण करून दिली. मात्र बरीच वर्षे लोटल्यामुळे त्यांना एकदम आठवणी शक्यही नव्हते. त्या दिवशी कार्यक्रम संपल्यावर सावनेरमध्ये चहापान करताना त्यांच्या आणि माझ्या चांगल्या गप्पा झाल्या. मुंबई दूरदर्शन मध्ये त्यांचे चांगले संबंध होते. ते सगळे संदर्भ देऊन ते माझ्याशी बोलले, आणि त्यावेळी काही गमती जमतीही त्यांनी सांगितल्या. त्या दिवशी संध्याकाळी धनवटे रंगमंदिरात झालेल्या कार्यक्रमातही त्यांची माझी भेट झाली. तेव्हाही त्यांनी मला बाजूलाच बसवून घेतले होते. तिथेही बोलणे झाले. साधारणपणे १९८६-८७ च्या दरम्यान आकाशवाणीतून निवृत्त झाल्यावर मास्तर पुन्हा नागपुरात मुक्कामी आले.

इथे आल्यावर नागपूर विद्यापीठाच्या रवींद्रनाथ टागोर अध्यासनावर प्रोफेसर एमरिटस म्हणून त्यांची नियुक्ती झाली. मग नागपुरातही ते विविध कार्यक्रमांमध्ये दिसू लागले. याच दरम्यान मी दूरदर्शन साठी कार्यक्रम निर्मिती करणारा एक प्रकल्प हाती घेतला होता. त्यासाठी बँकेकडून मला कर्ज देखील मंजूर झाले होते. या प्रकल्पांतर्गत विविध वृत्तपट तसेच दूरदर्शन मालिका आणि टेलिफिल्म बनवण्याचा आमचा प्रयत्न होता. हे करत असताना नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातील कोणीतरी जाणकार व्यक्ती मार्गदर्शक म्हणून हवी, या दृष्टीने हालचाली सुरू केल्या. त्यावेळी अनेकांनी मला दारव्हेकर मास्तरांचे नाव सुचवले. मग मास्तरांचाच शिष्य असलेल्या दिलीप वाईकरला सोबत घेऊन मी मास्तरांच्या घरी त्यांना भेटायला गेलो. भेटल्यावर मी आणि दिलीपने त्यांना भेटीचे प्रयोजन सांगितले. त्यांनी माझ्याकडून सर्व सविस्तर माहिती जाणून घेतली. मग दिलीप कडे बोट दाखवून आपल्या मुमिश्किल शैलीत मास्तर मला म्हणाले “हा चांडाळ तुझ्यासोबत आहे ना,” मी होकार देताच मास्तर म्हणाले, “मग मी सुद्धा तुझ्याबरोबर आहे, तू कामाला लाग.” आणि मग आमचीही उत्साहात तयारी सुरू झाली. मास्तरांच्या आणि माझ्या नियमित भेटी सुरू झाल्या. विविध कथानकांवर आमची चर्चा होऊ लागली. त्या चर्चेत कधी दिलीप सोबत असायचा, तर कधी राजाभाऊ वाईकर देखील यायचे. मास्तर चर्चेच्या ओघात विविध आठवण सांगायचे. त्या आठवणीतून त्यांचा अनुभव किती दांडगा आहे हे लक्षात येत होते. मराठी नाट्यसृष्टी आणि चित्रपट सृष्टी यातील अनेक मान्यवर कलावंतांशी मास्तरांचे जवळचे संबंध होते.

मग बोलण्याच्या ओघात माणूस मराठीचा खून कसा करतो हे सांगताना वीज म्हणाली धरतीला हे फैजाजला वाचायला सांगितले तेव्हा तिने ते वीज म्हणाली धर तिला असे वाचले, हा किस्सा मास्तर आठवणीने सांगायचे.बँकेने मंजूर केलेले कर्ज हातात पडून आवश्यक ती यंत्रसामुग्री घेण्यासाठी ऑर्डरचा पहिला चेक पाठवला आणि त्यानंतर ज्या जागेत छोटेखाली स्टुडिओ आणि ऑफिस बनवायचे, त्या जागी मुहूर्त करायचा, असे ठरले त्या मुहूर्तासाठी सुप्रसिद्ध संगीतकार हृदयनाथ मंगेशकर हे आले होते. त्यालाही मास्तर आवर्जून उपस्थित होते. मास्तरांना समोर बघितल्यावर ह्रदयनाथजींनी प्रेमाने त्यांच्याशी हस्तांदोलन केले आणि आपुलकीने त्यांची चौकशी केली. “तुम्ही देखील अविनाश सोबत आहात हे बघून आनंद झाला,” असे हृदयानाजींनी त्यांना सांगितले. त्या मुहूर्ताच्या कार्यक्रमात मास्तरांसोबत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. द भी कुलकर्णी हे देखील होते. मुहूर्ताची पूजा आटोपल्यावर कॉफीपान करताना या तिघांच्याही छान गप्पा रंगल्या होत्या. या मुहूर्तानंतर लगेचच काम सुरू झाले. मग पुढली जुळवाजवळ करण्यासाठी मी मुंबईला गेलो होतो. योगायोगाने त्यावेळी व्यावसायिक नाट्य स्पर्धा सुरू होत्या. मास्तर त्याचे परीक्षक होते. त्यामुळे ते देखील मुंबईत होते. मी मुंबईला येतो आहे,

असे कळल्यावर त्यांनी मला रवींद्र नाट्य मंदिरात भेटायला बोलावले. तिथे अनेक मान्यवरांशी त्यांनी माझी आवर्जून ओळख करून दिली आणि माझ्या प्रकल्पाबाबतही अवगत केले होते. यानंतर माझे स्टुडिओचे काम देखील सुरू होते, आणि इतर बाबींचा पाठपुरावा देखील सुरू होता याच काळात मास्तरांनी आपल्याला निर्मितीप्रकल्प कोणते हाती घेता येतील, या दृष्टीने विविध क्षेत्रातील जाणकारांना एकत्र बोलावून त्यांच्या दोन-तीन बैठका देखील आयोजित केल्या होत्या. त्यात नागपुरातील संगीत क्षेत्रातील, कलाक्षेत्रातील, साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांना त्यांनी सहभागी करून घेतले होते. याच मालिकेतील शेवटची बैठक आशाताई बगे यांच्या घरी झाली. तिथे देखील मास्तरांनी अगदी खुलून सगळ्यांना निर्मितीसाठी काय काय करावे लागेल यावर मार्गदर्शन केले होते.

त्यांच्या या मार्गदर्शनाने सर्वच सुखावले होते. याच काळात आम्ही नागपुरातून कलावंत निवडायचे म्हणून विविध मान्यवर बोलावून प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्याचेही ठरवले होते. त्यालाही मास्तरांनी पूर्ण पाठिंबा दर्शवला होता. मात्र अशा बगेंकडल्या बैठकीनंतर एक आठ दहा दिवसातच मास्तरांचा मला फोन आला, आणि त्यांनी मला घरी भेटायला बोलावले. ठरल्याप्रमाणे मी त्यांच्याकडे गेलो. त्यावेळी त्यांनी मला सांगितले की काही कारणाने मला नागपूरचे टागोर अध्यासनाचे काम सोडून मुंबईला कायमचे जावे लागणार आहे. त्यामुळे आता मी तुझ्या फारसा उपयोगाचा राहणार नाही. माझ्यासाठी हा धक्काच होता. मात्र मास्तरांनीच मला सावरले आणि सांगितले की तू काळजी करू नकोस. तुला कोणीतरी अजून चांगला मार्गदर्शक मिळेल. दुर्दैवाने राज्य सरकार, केंद्र सरकार आणि सरकारी बँका यांच्यातील परस्परांमधला असहकार हा मला आडवा गेला आणि माझा तो प्रकल्प पूर्णत्वास जाऊ शकला नाही. या प्रकारात मला जोरदार आर्थिक फटका देखील बसला. कधीमधी रंजन भेटला की बाबा तुझी आठवण करत आहेत,

असा निरोप द्यायचा, पण मला देखील नेमके काय उत्तर द्यायचे हे सुचत नव्हते. नंतर १९९२ च्या दरम्यान एकदा दीनदयाल शोध संस्थानच्या एका कार्यक्रमात मास्तरांची धावती भेट झाली होती. त्यानंतर १९९४ मध्ये नागपुरात इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स मध्ये नाट्य परिषदेच्या एका कार्यक्रमात मास्तर भेटले. त्यावेळी त्यांनी तुझ्या प्रकल्पाचे काय झाले म्हणून आपुलकीने चौकशी केली. जेव्हा मी त्यांना काय काय घडले आणि त्यात मी देखील कसा अडचणीत आलो हे सर्व कथन केले, तेव्हा मास्तर देखील काही काळ स्तब्ध झाले. नंतर लगेच थोडा वेळात माझ्या खांद्यावर थोपटत मास्तर म्हणाले, काळजी करू नकोस यातूनही मार्ग निघेल, आणि तुझं इप्सित साध्य होईल. अर्थात तसे घडायचे नव्हते.

तो प्रकल्प भविष्यात कधीच कार्यान्वित झाला नाही. मग मी पूर्णवेळ पत्रकारितेत वळलो. कधी मधी मास्तरांची आठवण यायची. ते नागपुरात कधीतरी यायचे आणि लगेच मुंबईला निघून जायचे. नंतर ते कायमचे नागपुरात आले आणि बरेच आजारी आहेत असे कळले. मी त्यांना भेटायला जाणार होतो. मात्र काही कौटुंबिक अडचणीमुळे मी भेटायला जाऊ शकलो नाही. नंतर सप्टेंबर १९९९ मध्ये अचानक टीव्हीवर मास्तर गेल्याचीच बातमी ऐकली.

त्यांच्या अंत्यसंस्कारप्रसंगी मी होतो. मात्र त्याआधी त्यांची मधल्या चार-पाच वर्षात भेटत झाली नाही याचे दुःख मनात जरूर होते. मास्तर एक सिद्धहस्त नाट्य लेखक होते. एक उत्तम दिग्दर्शक होते. एक गुणी कलावंत होते आणि एक कुशल संघटक देखील होते. या सर्वांसोबतच ते एक चांगले सुहृद होते. योगायोगानेच त्यांचा माझा काही काळ संबंध आला होता. त्या आठवणी आजही चिरस्मरणीय आहेत.

Views: 120
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
अपेडाच्या माध्यमातून गुळ निर्यातीस चालना मिळावी.-डॉ.सुभाष घुले

अपेडाच्या माध्यमातून गुळ निर्यातीस चालना मिळावी.-डॉ.सुभाष घुले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)