• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

झरे ता.आटपाडी येथे’वानुळा’ कथासंग्रहाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन सोहळा जल्लोषात संपन्न….

माणगंगा by माणगंगा
July 7, 2025
in Uncategorized
0
झरे ता.आटपाडी येथे’वानुळा’ कथासंग्रहाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन सोहळा जल्लोषात संपन्न….

‘वानुळा’ कथासंग्रहाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन झरे येथे जल्लोषात संपन्न

झरे ता.आटपाडी येथे प्रा. साहेबराव चवरे लिखित ‘वानुळा’ या अस्सल माणदेशी ग्रामीण कथासंग्रहाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन सोहळा झरे या माणदेशी मातीत मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक प्रा. व. बा. बोधे उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी ख्यातनाम कवी प्रा. सुभाष कवडे हे लाभले होते.प्रा. चवरे यांची कथा ही केवळ कल्पनाविलास नाही, तर ती माणदेशी मातीतील लोकजीवनाशी, संस्कृतीशी आणि संघर्षशील वास्तवाशी घट्टपणे जोडलेली आहे.

‘वानुळा’मधील कथा इथल्या माणसांचे जगणे, त्यांच्या जीवनातील प्रश्न, सरकारी योजनांची अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी, तसेच लोककथा, लोकगीतांचा परंपरागत खजिना अत्यंत हृदयस्पर्शीपणे उलगडून दाखवतात.या कथासंग्रहात अस्सल माणदेशी शब्द, म्हणी, वाक्प्रचार यांचा सुंदर वापर असून, तो वाचकाला थेट माणदेशाच्या शेतात, ओसरीवर, किंवा गावकुसाबाहेरच्या पाणवठ्यावर घेऊन जातो. ‘वानुळा’ या कथासंग्रहात शब्दांचे आणि अनुभवांचे समृद्ध भांडार सामावले असून, तो माणदेशी साहित्याच्या परंपरेत मोलाची भर घालणारा ठरतो, असे उद्गार प्रा. व. बा. बोधे यांनी यावेळी काढले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, प्रा. साहेबराव चवरे हे छत्रपतींच्या काळात जन्माला यायला हवे होते. त्यांचे लेखन म्हणजे एखाद्या मुरब्बी लेखकाला सुद्धा दोन – तीनदा विचार करायला लावणारे आहे. मी त्यांचे ‘वानुळा’ हे पुस्तक सहा वेळा वाचले. तेव्हा समजले की, या माणसाची ग्रामीण जीवनाशी व संस्कृतीशी किती नाळ जुळली आहे.

‘वानुळा’ च्या पहिल्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते झाला यावरून त्यांच्या लेखनाची उंची लक्षात येते. कोणतीही कथा निरिक्षणाशिवाय जीवंत होऊ शकत नाही. पुढे बोलताना ते म्हणाले की, शिक्षकांनी मुलांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे. विद्यार्थी हा शिक्षणव्यवस्थेचा केंद्र बिंदू असतो. शिक्षकांनी सकारात्मक विचार करून बदलते धोरण स्वीकारले पाहिजे. यावेळी बोलताना प्रा. साहेबराव चवरे म्हणाले की, आज ‘वानुळा’ कथासंग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीचा पुस्तक प्रकाशन सोहळा होत आहे

याचा मला मनस्वी आनंद वाटतो आहे. “तू लिहून जग, तुझ्यात लिहिण्याची ताकद आहे”. महान लेखक विजय तेंडुलकर यांच्या एका वाक्याने मी आज ‘वानुळा’ ची दुसरी आवृत्ती प्रकाशित करत आहे. हे काम करत असताना मला माझ्या कुटुंबाचा खूप मोठे सहकार्य लाभले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. सुभाष कवडे म्हणाले, प्रा. साहेबराव चवरे हे माणदेशाच्या मातीत मळलेलं व्यक्तिमत्त्व आहे. माणदेशी संस्कृतीचा, बोलीचा ‘वानुळा’ आहे.

स्वानंद, रंजन, व प्रबोधन हे साहित्यिकांचे मोठे काम आहे. माणूस हा साहित्याचा केंद्रबिंदू आहे.प्रा. कवडे पुढे बोलताना म्हणाले की, माणदेशी माणूस बिलंदर, कलंदर आणि तितकाच सात्विक आहे. माणदेश म्हणजे दुष्काळी भाग. परंतु प्रदेश जेवढा नापीक तेवढा माणूस सुपीक असतो. हेच प्रा. साहेबराव चवरे यांच्या ‘वानुळा’तून दिसून येते. ग्रामीण बोलीचा अधिकाधिक वापर, उत्तम भाषाशैली ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये आहेत.या प्रकाशन सोहळ्याचे प्रास्ताविक व स्वागत प्रा. डॉ. निलेश शेळके यांनी केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुप्रसिद्ध साहित्यिक सुनील दबडे व रमेश जावीर यांनी मनोगत व्यक्त केले .

कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, साहित्यप्रेमी, विद्यार्थी, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी चवरे सरांच्या दोन्ही मुलींनी 2025 या एकाच वर्षात कायद्याची पदवी संपादन केल्याबद्दल स्वाती सरगर व अमृता वाघमोडे-पाटील यांचा सौ. रेखा चवरे, सत्यजित चवरे, ॲड. आप्पासाहेब सरगर यांच्या समवेत विशेष सत्कार करण्यात आला.तसेच पुस्तक लेखन कामासाठी सहकार्य करणाऱ्या भास्कर चौधरी यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास रघुराज मेटकरी, सुधीर इनामदार, शिवाजी बंडगर, डॉ. रामदास नाईकनवरे, रमेश जावीर, दस्तगीर शिकलगार, डॉ. निलेश शेळके, प्रा. श्रीकृष्ण पडळकर, कालिदास शिंदे, सुनील दबडे, भरत पाटील, जीवन सावंत, शिंदे मॅडम, विजय शिंदे, मेघाताई पाटील, बाबासाहेब कोकरे, श्रीराम अनुसे, ॲड. विजय वाघमारे, फेस्काॅमचे अंजुमन खान, प्रमिला गोरड तरंगे, दिनेश देशमुख, शिवप्रसाद तावरे, पत्रकार लक्ष्मण खटके, अंकुश मुढे, जागृती सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था झरेचे उपाध्यक्ष भालचंद्र मेटकरी, सचिव भीमाशंकर स्वामी, संचालक रमेश खोत, सत्यजित चवरे, डॉ. दिलीप कटरे, आरपीआय अध्यक्ष धनंजय वाघमारे, नाना मारकड, विलास कारंडे, नामदेव यादव, शिवाजी माने, आर.वाय. यादव , प्रशांत स्वामी यांसारख्या मान्यवरांची उपस्थिती लाभली.

तसेच झरे पंचक्रोशी जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ तसेच संस्थेचे माजी विद्यार्थीही या समारंभास मोठ्या संख्येने हजेरी लावून या साहित्यिक सोहळ्याची शोभा वाढवली. हा प्रकाशन सोहळा म्हणजे माणदेशी साहित्यसंस्कृतीच्या समृद्धतेचा उत्सव ठरला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रीकृष्ण पडळकर यांनी केले तर आभार संतोष वाघमारे यांनी मानले.

Views: 82
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
श्री विलासराव कोळेकर यांना भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार जाहीर

श्री विलासराव कोळेकर यांना भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)