मका पिकासाठी- आवाजावी युरियाचा वापर टाळवा व संतुलित खताचा वापर करावा; संजय पवार यांचे आवाहन
त-हाडी प्रतिनिधी धुळे, शिरपूर तालुक्यात मक्याचे अधिक उत्पन्नासाठी संतुलित रासायनिक खताचा पुरवठा करणे गरजेचे आहे. मका पिकासाठी नत्र स्फुरद व पालाश ६०:३० :३० किलो प्रति प्रति एकरी आवश्यक आहे. मका पिकास अन्नद्रव्याचा पुरवठा दाने भरणाच्या वेळेपर्यंत आवश्यक असल्यामुळे नत्र खताची मात्रा विभागून द्यावी. संपूर्ण स्फुरद आणि पालाश आणि १७ किलो नत्र पेरते वेळेस व उर्वरित नत्र १७ किलो पेरणीनंतर २० दिवसांनी आणि १७ किलो नत्र ४० ते ४५ दिवसांनी द्यावे .पेरणीच्या वेळी रासायनिक खते पाच सेंटीमीटर खोलीवर आणि जमिनीत चांगली मिसळून घ्यावी. उभ्या पिकात नत्र मात्र मका ओळी पासून दहा ते पंधरा सेंटीमीटर अंतरावर द्यावी. माती परीक्षणानुसार जमिनीचे कमतरता असल्यास १० किलो गंधक व आठ ते दहा किलो जीन्स सल्फेट लागवडीच्या वेळेस शेणखत मिसळून देणे आवश्यक आहे .
उदा.प्रति एकरी मका पिकासाठी लागवडीच्या वेळेस 10 :26: 26 दोन बॅग (१०० किलो) व लागवडीनंतर २० ते २५ दिवसांनी युरिया 36 किलो व 40 ते 45 दिवसांनी युरिया 36 किलो अशाप्रकारे विभागून द्यावी *युरिया खताचा अनावश्यक वापर टाळावा.* युरिया खतास पर्याय म्हणून नॅनो युरिया ५ मिली प्रति लिटर प्रमाणे मका पिकामध्ये लागवडीनंतर 20 ते 25 दिवसांनी पहिली फवारणी व 40 ते 45 दिवसांनी दुसरी फवारणी करावी. असे आवाहन शिरपूर कृषी अधिकारी संजय पवार, कृषी सहायक मनिषा कुंवर,ललित पाटील, कृषी अधिकारी महेंद्र पाटील यांच्यातर्फे शेतकरी बंधूंना करण्यात येत आहे


