• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

आयुष्यातले सांगाती १५,मारोती चितमपल्ली,ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

माणगंगा by माणगंगा
July 19, 2025
in Uncategorized
0
आयुष्यातले सांगाती ६..माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी…ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

*आयुष्यातले सांगाती १५*,*मारोती चितमपल्ली*,*ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!*

जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.आज १८ जुलै २००५, उभे आयुष्य वनखात्यात नोकरी करून वन्य प्राणी आणि वन्य पक्षी यांच्याबाबत संशोधन करून ललित ढंगाने ते मराठी वाचकांपर्यंत पोहोचवणारे ख्यातनाम मराठी साहित्यिक अरण्यऋषी पद्मश्री मारुती चितमपल्ली यांचा प्रथम मासिक स्मृतिदिन. त्यांनी इहलोकीची यात्रा संपवून आज पूर्ण एक महिना होत आहे.

त्यांच्या कार्यकर्तृत्वावर गत एक महिन्यात खूप काही लिहिलेले गेले. आज मी त्यांचे आणि माझे जे काही व्यक्तिगत संबंध आले त्याबाबतच लिहायचे ठरवून त्यांच्या प्रथम मासिक श्राद्ध देणे त्यांना आदरांजली अर्पण करायचे ठरवले आहे. मारुती चितमपल्ली यांच्या बद्दल मी आधी वृत्तपत्रातूनच वाचले होते. मात्र त्यांचा माझा प्रत्यक्ष परिचय झाला तो १९७७ साली. त्यावेळी मी मुंबई दूरदर्शनचा वृत्त छायाचित्रकार म्हणून कार्यरत झालो होतो. दूरदर्शनसाठी विविध वृत्तचित्रणे आणि छोट्या छोट्या वृत्तपटांची निर्मिती हे काम मी करत होतो. त्यावेळी वनखात्याची अधिकारी मंडळी दूरदर्शन संचालकांकडे पोहोचली आणि भंडारा जिल्ह्यातील नवेगाव बांध, नागझिरा या परिसरातील पक्षी आणि वन्य प्राणी यांचे चित्रीकरण करून दूरदर्शनवर दाखवले जावे अशी विनंती केली. मला दूरदर्शनकडून तशी सूचना आल्यामुळे मी वन खात्यात चौकशी केली. तेव्हा नवेगाव बांध आणि नागझिरा येथे वन अधिकारी म्हणून मारुती चितमपल्ली हे कार्यरत होते. वनखात्याच्या नागपुरातील वरिष्ठांनी कळवल्यामुळे मग चितमपल्ली मला भेटायला आले. सर्वसाधारणपणे पाट्या टाकणारे सरकारी अधिकारी जसे दूरदर्शनच्या पत्रकारांना भेटायला येतात तसेच हे असावेत असा माझा समज होता. मात्र पहिल्याच दिवशी त्यांची आणि माझी तब्बल दोन तासांची बैठक झाली. त्या दिवशी त्यांनी नवेगाव बांध परिसरात साधारणपणे ऑगस्ट महिन्यात परदेशातून पक्षी स्थलांतरित होतात आणि तिथेच ते साधारणपणे जानेवारीपर्यंत कसे मुक्काम ठोकतात याची साद्यंत माहिती दिली. त्याच शिवाय स्थलांतरित न झालेलेही अनेक स्थानिक पक्षी देखील कोणते आणि किती आहेत याची देखील माहिती सांगितली. पहिल्याच भेटीत मी चांगलाच प्रभावित झालो होतो. त्यादिवशी सविस्तर चर्चा झाल्यावर अवघ्या आठच दिवसात मी नवेगाव बांधला रवाना झालो. सोबत बना खात्याचे दोन वरिष्ठ अधिकारी देखील होते. नवेगाव बांधला रात्रभर मुक्काम केल्यावर आम्ही तिथून जवळच असलेल्या धाबेपवनी नामक खेड्यात पोहोचलो. तिथे आमचा मुक्काम तिथले पाटील असलेले माधवराव पाटील यांच्या वाड्यावर होता. माधवरांना तिथल्या जंगलाची खडा न खडा माहिती होती. पायात कोणतीही पादत्राणे न घालता जंगलात सतत पायी फिरणारे माधवराव तिथल्या पक्ष्यांच्या अगदी सवयी सुद्धा जाणून होते. त्यांच्याच बरोबर चितमपल्ली देखील अभ्यास करत होते. मग दोन दिवस थांबून आम्ही तिथे त्या वेगवेगळ्या पक्ष्यांचे चित्रीकरण केले. तिथून परत आल्यावर नवेगावबांच्या तळ्यावर येणारे परदेशी पक्षी देखील चितमपल्लींनी मला दाखवले होते.

त्यांचेही मी चित्रीकरण केले. या सर्व पक्ष्यांची खडा ना खडा माहिती चितमपल्ली मला देत होते. या तीन दिवसात मी खूप काही नवीन माहिती ऐकली आणि चित्रीकरण देखील केले. तीन दिवसांनी परतताना उगाचच मला आयुष्यात काहीतरी नवीन मिळवल्याचे समाधान वाटत होते. त्यानंतर लागोपाठ तीन-चार वेळा मी नवेगाव बांधला चितमपल्लींचा पाहुणा म्हणून गेलो. दरवेळी नवी नवी माहिती मिळत होती आणि नवे चित्रीकरण देखील करत होतो. त्याच दरम्यान नागपुरात आले की ते देखील मला भेटायचे. नागपुरातील प्रसिद्ध साहित्यिक वसंत चिंचाळकर यांच्याशी चितमपल्लींची चांगलीच मैत्री होती. मग त्यांच्याच घरी आमची गप्पांची मैफिल जमायची. १९७७-७८ मध्ये नवेगाव बांधला जाऊन अशी वेगवेगळी चित्रिकरणे मी केली. नागझिऱ्यावर सुद्धा एक विशेष कार्यक्रम केला होता. मग इतर जबाबदाऱ्यांमुळे नवेगाव बांधकडे जाणे कमी झाले. एकदा १९८१ मध्ये सतीश चतुर्वेदी वनराज्यमंत्री असताना त्यांच्याबरोबर मी तिथे गेलो होतो. त्यानंतर नवेगाव बांधला जाणे झाले नाही. दरम्यान चितमपल्लींची देखील तिथून बदली झाल्याचे कळले.

नवेगाव बांध मधून बदली झाली असली तरी त्यांचे वन्यप्राणी आणि विशेषत्वे करून वन्यपक्षी यांच्याबाबत संशोधन साहित्याने सुरू सातत्याने सुरू होते. त्याच काळात त्यांची दैनिक केसरी मध्ये पक्षी जाय दिगंतरा ही लेखमालिका सुरू झाली होती. ही लेखमालिका खूप गाजली. नागपूरच्या साहित्य प्रसार केंद्राने ती पुस्तकरूपातही प्रकाशित केली. यामुळे वन अधिकाऱ्यांमध्ये दडलेला एक साहित्यिक देखील लोकांसमोर आला. दरम्यानच्या काळात चितमपल्ली नागपूरला वनविकास महामंडळाच्या मुख्यालयात बदलून आले होते. तेव्हा एकदा ते मला भेटायला आले. मग पुन्हा आमच्या भेटीगाठी सुरू झाल्या होत्या. अर्थात १९८८ नंतर मी दूरदर्शन चे काम काही कारणांनी थांबवले होते. मी मुद्रित माध्यमांमध्ये लेखन करू लागलो होतो. त्या काळात साहित्यिक म्हणून चितमपल्लींचे नाव होऊ लागले होते. विशेषतः जंगलातील आयुष्यावर आणि त्यातही पशुपक्ष्यांच्या आयुष्यावर त्यांच्या सवयींवर वैज्ञानिक दृष्ट्या पण ललित अंगाने लेखन करणारे एक नवे दालन त्यांनी मराठी वाङ्मय विश्वात उघडले होते. त्यांची काही पुस्तके देखील या काळात प्रकाशित झाली होती. नागपुरात विदर्भ साहित्य संघ आणि इतर साहित्य संघटनांमध्ये त्यांची व्याख्याने देखील होऊ लागली होती. तिथेच कधीमधी आमची भेट व्हायची. मात्र प्रत्येक भेटीत तो १९७७ साली असलेलाच जिव्हाळा कायम होता. १९९२ मध्ये चितमपल्ली शासकीय नोकरीतून निवृत्त झाले. मात्र त्यांचे संशोधन अभ्यास आणि लेखन हे सातत्याने सुरूच होते. त्या काळात सरकारी निवासस्थान सोडून ते लक्ष्मी नगरला स्वतःच्या सदनिकेत राहायला आले होते. ते घर अगदी माझ्या घराजवळच होते. त्यावेळी नागपूर विद्यापीठाच्या भाषाशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ सु.बा. कुलकर्णी हे माझ्याच घरात भाडेकरू म्हणून राहत होते. कुळकर्णी काकांकडे एक दिवस मारोतराव चितमपल्ली अचानक आले. बाहेरच मला बघताच ते चमकले. “अरे तुम्ही इथेच राहता का” म्हणून त्यांनी विचारणा केली. “इथे कसे काय आलात” म्हणून मी विचारले तेव्हा इथे डॉक्टर कुलकर्णी राहतात ना त्यांना भेटायला आलोय असे उत्तर त्यांनी दिले. मग मी कुलकर्णी काकांकडे त्यांना घेऊन गेलो. तिथे त्यांची अभ्यासविषयक चर्चा सुरू झाली. परत जाताना आवर्जून ते माझ्याकडे डोकावले होते. तेव्हापासून कुलकर्णी काकांकडे आले की ते थोडा वेळ तरी डोकावून जायचे. मग कधी सकाळी फिरायला जाताना तर कधी भाजीच्या किंवा किराण्याच्या दुकानात आमची भेट व्हायची. कधीमधी रस्त्यातच आमच्या गप्पा रंगायच्या. १९९८ साली मी मुंबईहून परतताना नाशिकला एक दिवसासाठी थांबलो होतो. त्या दिवशी मी सपत्नीक त्र्यंबकेश्वरला देखील जाऊन आलो. सकाळी जाण्यापूर्वी अचानकच शासकीय विश्रामगृहात चितमपल्लींची भेट झाली. तिथे निवृत्त वन अधिकार्‍यांचे एक संमेलन होते. त्यासाठी ते आले होते. मग संध्याकाळी नागपूरला निघण्यापूर्वी आमच्या काही वेळ गप्पा देखील झाल्या होत्या.२००२ पासून मी रामटेक च्या गडावर या नावाने एक मराठी दिवाळी अंक प्रकाशित करायला सुरुवात केली. होती २००३ मध्ये मी त्यांच्याकडे दिवाळी अंकासाठी म्हणून लेख मागायला गेलो. त्यावेळी त्यांनी अत्यंत उत्साहाने मला प्रतिसाद दिला, आणि वेळेत एक लेख अगदी चक्क घरपोच आणून दिला.तेव्हापासून दरवर्षी चितमपल्ली माझ्या दिवाळी अंकाचे हक्काचे लेखक होते. २००५ मध्ये मी दिवाळी अंकात अ.भा. मराठी साहित्य संमेलनाअध्यक्ष पदाची कारकीर्द या विषयावर एक परिसंवाद आयोजित केला होता. त्यावेळी चितमपल्ली प्रस्तावित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवत होते. त्यामुळे या निवडणुकीतील एक उमेदवार यानिमित्ताने त्यांची काय मते आहेत या विषयावर त्यांची एक मुलाखत घेऊन मी त्या परिसंवादात प्रकाशित केली होती. त्यासाठी त्यांनी देखील मला वेळ दिला आणि सर्व मुद्द्यांची सविस्तर उत्तरे दिली होती.

यथावकाश दिवाळी अंक प्रकाशित झाला. मग अंकाची प्रत घेऊन मी स्वतःच त्यांच्या घरी पोहोचलो तेव्हा निवडणुकीचे मतदान होऊन त्याच दिवशी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार होते. ते घरीच होत बसले होते. मी त्यांच्याशी अंक देऊन थोडा वेळ गप्पा मारत बसलो होतो. तितक्यात तिथे त्यांचे समर्थक असलेले बबन नाखले पोहोचले आणि त्यांनी चितमपल्ली अध्यक्ष म्हणून निवडून आल्याची बातमी सांगितली. ती बातमी कळताच मी लगेचच त्यांचे अभिनंदन केले. मग त्याच दिवशी नियोजित अध्यक्ष म्हणून त्यांची पहिली मुलाखत मी घेतली आणि ती मी वृत्तसेवा देत असलेल्या सर्व वृत्तपत्रांना पाठवली देखील होती. ती मुलाखत प्रकाशित झाल्यावर त्यांना ते अंक देखील पोहोचवून दिले होते. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून झालेल्या सत्कार समारंभ मध्ये त्यांनी हिंदू संस्कृतीनुसार कावळा पिंडाला शिवतो यामागे नेमके काय विज्ञान आहे यावर भाष्य केले होते. त्यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव त्यांच्यावर वैचारिक आक्रमण करून चालून गेले होते. त्यांची नेमकी बाजू काय हे सांगणारी मुलाखत देखील मी त्यावेळी वृत्तपत्रांना पाठवली होती. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची कारकीर्द चांगलीच गाजली होती. २००५ च्या दिवाळी अंकात मी अखिल भारतीय साहित्य संमेलनाध्यक्षपदाची कारकीर्द या विषयावर परिसंवाद घेतला होता. तर २००६ मध्ये वाङमयीन चळवळींचे नेतृत्व अवाङमयीन व्यक्तींच्या हाती असावे काय? या विषयावर एक परिसंवाद घेतला होता. या दोन्ही परिसंवादांवर एक एक पुस्तिका काढावी असे परिसंमवादाचे संयोजक डॉ. यशवंत मनोहर यांची इच्छा होती. मात्र इतर काही मित्रांनी दोन्ही परिसंवाद एकत्र करून आणि त्यात इतर काही लेख जोडून हे पुस्तकच प्रकाशित कर अशी सूचना केली. त्यानुसार मी मराठी वांङमय व्यवहार चिंतन आणि चिंता हे पुस्तक प्रकाशित केले. योगायोगाने त्या पुस्तकाला २००८ चा महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट संपादित ग्रंथ रा.ना. चव्हाण स्मृती पुरस्कार जाहीर झाला. हे कळताच चितमपल्लींचा मला लगेचच अभिनंदनाचा फोनही आला होता.नंतरच्या काहीच दिवसात त्यांच्या पत्नीचे निधन झाले. त्यांच्याकरिता हा धक्काच होता.

मग ते आणि त्यांची मुलगी छाया असे दोघेच लक्ष्मीनगरला अभीरिका अपार्टमेंट मध्ये राहत होते. काही दिवसांनी त्यांनी नागपूर सोडून नवेगावबांधच्या जंगलातच जाऊन राहण्याचा आणि तिथे अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. माझ्या आठवणीनुसार एक दोन एक वर्ष तरी ते तिकडेच होते. दरम्यान त्यांच्या मुलीचे देखील निधन झाले. मग ते नागपुरात परत आले आणि त्यानंतर त्यांनी नागपूर सोडून सोलापूरला त्यांच्या पुतण्यांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मात्र माझी त्यांची भेट झाली नाही. तरीही अधून मधून आमची फोनवर भेट होत असे. प्रत्यक्ष भेटीचा मात्र योग आला नाही. गेल्या गणतंत्र दिनी त्यांना राष्ट्रपतींनी पद्मश्री हा नागरी सन्मान जाहीर केला होता. त्यावेळी मी त्यांना अभिनंदनाचा फोन केला होता.

त्यानंतर त्यांनी दिल्लीला जाऊन पुरस्कार स्वीकारल्याचीही बातमी मी वाचली. त्या काळात ते नागपूरला येऊन गेल्याचे कळले. मात्र माझ्या प्रकृती अस्वास त्यामुळे मी त्यांना भेटू शकलो नव्हतो. आणि महिनाभरापूर्वी ते गेल्याची बातमी कळली. त्यांचे वय देखील बरेच झाले होते. आयुष्यभर त्यांनी स्वतःला जंगल आणि पक्षी यासाठीच वाहून घेतले होते. त्यांनी जंगलातील पक्ष्यांचा अभ्यास केला आणि त्यायोगे जनसामान्यांना त्या क्षेत्रात शहाणे केले. हे त्यांचे महत्त्वाचे योगदान कोणीच विसरू शकणार नाही. त्यांचे हे वन्यप्रेम बघूनच त्यांना अरण्यऋषी ही अघोषित पदवी प्रदान करण्यात आली होती. या झोकून देत अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांशी माझा काही काळ संबंध आला. त्याच्या आठवणी आजही येत आहेत. आणि त्या आठवणी सुखदच आहेत, हे नमूद करायलाच हवे.

Views: 150
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
पोपटराव वाकसे यांची कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित कोल्हापूरच्या इचलकरंजी शाखेच्या संचालक पदी निवड

पोपटराव वाकसे यांची कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित कोल्हापूरच्या इचलकरंजी शाखेच्या संचालक पदी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)