महसूल वकिल मित्र परिवारांकडून महसूल दिन उत्साहात संपन्न
पुणे : सामान्य नागरिक व शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून महसूल विभाग कार्यरत असून विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यासाठी दरवर्षी १ ऑगस्ट रोजी महसूल दिन आयोजित करण्यात येतो.या दिनाचै औचित्य साधुनशासनाचा कणा समजला जाणारे महसूल विभागातील महसूल कर्मचारी यांचा गौरव महसूल वकिल मित्र परिवारातर्फे करण्यात आला. अप्पर आयुक्त पुणे, अप्पर जिल्हाधिकारी पुणे आणि उपविभागीय अधिकारी हवेली येथे काम करणारे सर्व कर्मचारी यांचा पुष्पगुच्छ देउन सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमासाठी ॲड .गणेश लोकरे, ॲड .राहुल कदम, ॲड .गणेश सुद्रीक,ॲड.समीर चौधरी, ॲड .गणेश कातोरे, ॲड .ओंकार मांगडे, ॲड. योहान पाखरे, ॲड .प्रमोद नरोडे, ॲड . अक्षय विचित्र , ॲड. स्वप्निल मटाले , ॲड . गिरीश भोसले यांचे सहकार्य लाभले. अपर आयुक्त कविता द्विवेदी, अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी, उपविभागीय अधिकारी हवेली डॉ. यशवंत माने यांसकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते


