• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

आयुष्यातले सांगाती २२,प्रमिलाताई मेढे,*ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

माणगंगा by माणगंगा
August 13, 2025
in Uncategorized
0
आयुष्यातले सांगाती २२,प्रमिलाताई मेढे,*ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

*आयुष्यातले सांगाती २२*,*प्रमिलाताई मेढे*,*ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

*जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.३१

जुलै २०२५ रोजी सकाळी नऊच्या सुमारास राष्ट्रसेविका समितीच्या तृतीय प्रमुख संचालिका प्रमिलाताई मेढे यांचे देहावसान झाले. आज १२ ऑगस्ट २०२५, प्रमिलाताईंना जाऊन आज तेरा दिवस होत आहेत. प्रमिलाताई राष्ट्रवादी विचारांच्या, हिंदुत्वनिष्ठ, कर्मठ कार्यकर्त्या होत्या. हिंदू परंपरेनुसार मृत्यूनंतरचा १३ वा दिवस महत्त्वाचा मानला जातो. त्याच दिवशी मृतात्म्याला सद्गती देण्यासाठी तेरवी केली जाते. आज प्रमिलीताईंची तेरवी आहे. त्यामुळे आजच्या “आयुष्यातले सांगाती” मध्ये प्रमिलीताई मेढे आणि माझे जुळलेले स्नेहबंध यावरच मी लिहायचे ठरवले आहे.प्रमिलाताई मेढे या १९७८ ते २००३ या कालखंडात राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख कार्यवाहिका होत्या.

२००३ ते २००६ या कालखंडात त्या सहप्रमुख संचालिका होत्या, आणि २००६ ते २०१२ या काळात त्या प्रमुख संचालिका झाल्या होत्या. त्या प्रमुख कार्यवाहिका असताना पासूनच कधीमधी समितीच्या तर कधी संघाच्या कार्यक्रमात त्यांची ओझरती भेट व्हायची. मात्र त्यांचा आणि माझा असा नीटनेटका परिचय झाला नव्हता. तो योग २००९ मध्ये आला.२००७ पासून मी हिंदुस्तान समाचार या संघ परिवाराशी जुळलेल्या बहुभाषिक राष्ट्रीय वृत्तसंस्थेचे नागपुरातील काम बघत होतो. २००९ मध्ये माझ्याकडे संपूर्ण विदर्भाची जबाबदारी सोपवण्यात आली. याच दरम्यान २००९ च्या जुलै महिन्यात मी आमच्या नवीन घरात राहायला आलो. तिथेच मी माझे कार्यालय देखील बनवले होते. त्याच ठिकाणी हिंदुस्तान समाचार चे विदर्भ विभागीय कार्यालय ठेवावे असा निर्णय झाला. मग ९ सप्टेंबर २००९ रोजी दुपारी ४ वाजता या कार्यालयाचे औपचारिक उद्घाटन करण्याचे ठरले. उद्घाटनाला हिंदुस्थान समाचार चे राष्ट्रीय प्रभारी श्रीकांतजी जोशी आले होते.

अतिरिक्त मुख्य संचालक माहिती आणि जनसंपर्क महाराष्ट्र शासन या पदावरून निवृत्त झालेले श्रीपाद सहस्रभोजने यांचे हस्ते कार्यालयाचे उद्घाटन झाले. सुमारे अर्ध्या तासात हा कौटुंबिक सोहळा पार पडला. हिंदुस्तान समाचार से राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य आणि विदर्भाचे प्रभारी सुधीर वराडपांडे हे माझे चांगले मित्र होते. सुधीरच्या मातोश्री चंपाताई वराडपांडे या राष्ट्र सेविका समितीच्या बरीच वर्षे अधिकारी होत्या. त्यामुळे सुधीरचे आणि प्रमिलाताईंचे संबंध अतिशय चांगले होते. त्या दिवशी कार्यक्रमाच्या आधी पंधरा-वीस मिनिटं असताना सुधीरने मला सांगितले “अविनाश आज समितीच्या प्रमिलीताई मेढे आणि शांताक्का येण्याची शक्यता आहे.” मी जरा दचकलोच. राष्ट्रीय स्तरावरील ही व्यक्ती इथे येणार, मग तशी तयारी नको का?” असे मी सुधीरला सांगताच “तू काही काळजी करू नको, त्या अगदी साध्या आहेत” असे सांगून त्याने मला निर्धास्त केले. दुपारी चार ला सुरू झालेला कार्यक्रम पावणे पाच पर्यंत संपला. नंतर सर्व उपस्थितांचा चहा फराळ आटोपून ते निघत होते. तितक्यात फाटकासमोर एक पोपटी रंगाची कार थांबली.

ती कार सुधीरने ओळखली आणि लगेचच तो समोर गेला. कारमधून प्रमिलाताई आणि शांताक्का दोघीही उतरल्या. दोघींनाही मी चेहऱ्याने ओळखत होतो. सुधीरने दोघींचीही माझी ओळख करून दिली. तितक्यात कार्यक्रम आटोपून निघालेले श्रीकांतजी जोशी देखील आले. त्यांच्याशीही प्रमिला ताईंनी संवाद साधला. मग या दोघींनाही घेऊन मी आणि सुधीर घरात आलो. सर्वप्रथम त्यांना कार्यालयात नेले आणि नवीन कार्यालय दाखवले. कार्यालय बघून आम्ही बाहेर निघत होतो. तेव्हा प्रमिलाताई अचानक मला म्हणाल्या, “अविनाशजी सुधीर म्हणत होता की तुमचे हे नवीन घर आहे. नुकताच याचा वास्तू होऊन तुमचा गृहप्रवेश झाला आहे.” मी होकार देतच ताई म्हणाल्या “मग आम्हालाही घर दाखवा ना” आणि त्यांनी येऊन संपूर्ण घर बघितले. घरातल्या देवघरापाशी आल्यावर त्यांनी माझी पत्नी अनुरूपा हिला हळदी कुंकवाची कुयरी मागितली. ती शांताक्कांच्या हातात देत त्यांनी अनुरूपाला हळद कुंकू लावायला सांगितले आणि मग त्यांनी हातात अनुरूपाच्या हातात पितळ्याची ओम ची आकृती असलेली भेटवस्तू दिली. “हा ओम म्हणजे शुभचिन्ह आहे.

तुमच्या नव्या घराच्या प्रवेशद्वारावर तो लावा. तुमचं सर्व काही शुभच होईल. हा माझा आशीर्वाद आहे,” असे प्रमिलाताईंनी सांगितले. या घटनेला सोळा वर्षे झाली. आजही आमच्या प्रवेशद्वारावर हा ओम विराजमान झालेला आहे. आम्ही तो प्रमिलाताईंचा आशीर्वादच समजतो. घर बघून झाल्यावर मग प्रमिलाताई आणि शांताक्का दोघीही कार्यक्रमासाठी अंगणात ठेवलेल्या सोफ्यावर बसल्या. मग माझे कुटुंबीय, सुधीर वराडपांडे, हिंदुस्थान समाचार महाराष्ट्राचे प्रमुख अरुण करमरकर असे सर्वच आम्ही एकत्र बसलो, आणि चहा फराळा सोबत आमच्या गप्पाही सुरू झाल्या. ताईंनी अतिशय आपुलकीने घरातल्या सर्वांची चौकशी केली. माझ्या मुलीला “तू देखील आता समितीच्या शाखेत येत चल” असे सुचवले होते. सुमारे अर्ध्या तासाच्या या भेटीत एका राष्ट्रीय स्तरावर मान्यता असलेल्या व्यक्तीशी आम्ही बोलतो आहोत असे आम्हाला बिलकुलच वाटले नव्हते.

आपल्या कुटुंबातल्या एखाद्या वयोवृद्ध प्रेमळ काकू किंवा मामी किंवा आजीशी बोलावे इतक्या सहजतेने त्या संवाद साधत होत्या. त्यांची ही भेट आमच्यासाठी एक सुखद आठवणच ठरली होती. तेव्हापासून मग प्रमिलीताईंच्या माझ्या अधून मधून भेटी सुरू झाल्या. समितीचा नागपुरात कोणताही कार्यक्रम असला की त्या आवर्जून मला कळवायला सांगायच्या. आम्हीदेखील त्या कार्यक्रमाला जात असू. त्याचे वृत्त देखील मी जिथे जिथे बातम्या पाठवत असे तिथे सगळीकडे आवर्जून पाठवत असे. जिथे छापून येईल त्याची कात्रणे देखील मी त्यांच्याकडे पाठवण्याची व्यवस्था करत असे.२०१२ मध्ये एक दिवस राष्ट्रसेविका समितीची एक महत्त्वाची पत्र परिषद देवी अहिल्या मंदिरात असल्याचा निरोप मिळाला. तिथे मी गेल्यावर प्रमिलातांनीच ती पत्र परिषद आयोजित केली असल्याचे कळले.

पत्र परिषदेत प्रमिलाताईंनी आता मी प्रमुख संचालिका पदावरून निवृत्त होत असून माझ्या नंतर शांताक्का यांच्याकडे हे दायित्व सोपवत असल्याची त्यांनी घोषणा केली. शांताक्कांकडे कार्यभार सोपवल्यावर प्रमिलाताई काहीशा निवांत झाल्या होत्या. आधी प्रमुख कार्यवाहिका आणि मग प्रमुख संचालिका असताना त्यांचा देशभर प्रवास चालायचा. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी वर्षभरात देशातील ७५ जागी जाऊन समितीचे काम वाढवण्यासाठी प्रयत्न केले होते. शांताक्कांकडे कार्यभार गेल्यावर त्या मग देवी अहिल्या मंदिरातच मुक्कामी राहू लागल्या. महाविद्यालयीन शिक्षण आटोपल्यावर त्या नोकरीला लागल्या, आणि लहान भावंडांची शिक्षण आणि लग्न त्यांनी करून दिले. त्या मात्र समितीच्या कामासाठी आयुष्यभर अविवाहितच राहिल्या होत्या. त्यामुळे देवी अहिल्या मंदिर हेच त्यांचे घर होते, आणि राष्ट्रसेविका समिती हाच त्यांचा परिवार होता. मग काहीही कामाने अहिल्या मंदिरात गेलो की सहाजिकच प्रमिलाताई आहेत का म्हणून चौकशी व्हायची. त्यांची दुपारची विश्रांतीची वेळ सोडून इतर वेळी मग त्यांना मी हमखास जाऊन भेटायचो. मी राजकीय पत्रकार असल्यामुळे मग चालू राजकारणावर त्या चर्चा करायच्या. त्याचवेळी घरच्या सर्व मंडळींची देखील त्या आवर्जून चौकशी करायच्या.

त्यांनी देशात आणि परदेशात देखील प्रवास केला होता. कधीतरी गप्पांच्या ओघात तिथल्या आठवणी देखील त्या सांगायच्या. नऊवारी लुगडे हा त्यांचा कायम पोशाख होता. नऊवारीतच मी परदेशात कशी फिरली हे देखील एकदा त्यांनी ऐकवले होते. केव्हाही भेटायला गेलो की आवर्जून चहा घेतल्याशिवाय त्या सोडत नसत. दरवेळी त्या राष्ट्रीयत्व या विषयावरील काही नवीन पुस्तके देखील वाचायला सुचवायच्या. त्याच दरम्यान जर समितीच्या संबंधित कोणी अजून त्यांना भेटायला आले तर त्यांच्याशी देखील त्या इतक्याच आत्मीयतेने वागायच्या. प्रत्येक सेविकेची त्या अगदी आईच्या मायेने चौकशी करायच्या. प्रसंगी थोडे रागावून चार समजुतीच्या गोष्टी देखील सांगायच्या. मात्र त्यातही त्यांची माया ओसंडून वाहत असलेली दिसायची. त्यांच्यासोबतच्या अर्धा तासाच्या गप्पा गोष्टी या एक नवे चैतन्य देणाऱ्या कायम ठरायच्या. २०१७ मध्ये समितीच्या द्वितीय प्रमुख संचालिका उषाताई चाटी यांचे अहिल्या मंदिरातच निधन झाले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मी गेलो असताना तेव्हा देखील प्रमिलाताईंचे अतिशय धीरोदात्त असे रूप बघायला मिळाले होते.२०१९ मध्ये नागपूरच्या एक संगीतज्ञ आणि माझ्या कौटुंबिक स्नेही डॉ. तनुजा नाफडे यांनी भारतीय लष्करासाठी पहिली भारतीय सुरवटीची मार्शल ट्यून तयार केली होती. २०१९ च्या गणतंत्र दिनी झालेल्या मुख्य संचालनात ती धून वाजवली गेली होती. हे वृत्त कळताच त्यांचा दूरध्वनी क्रमांक मिळवून शांताक्कांनी तनुजा नाफडेंना फोन करून त्यांचे अभिनंदन केले, आणि नागपुरात अहिल्या मंदिरात भेटीला बोलावले. त्यानुसार एकदा तनुजा नाफडे, त्यांचे पती रवी नाफडे आणि मी असे आम्ही तिघे अहिल्या मंदिरात भेटायला गेलो होतो. आम्ही गेल्यावर तिथल्या अभ्यागत कक्षात आधी शांताक्कांची भेट झाली. त्यांनी एका स्वयंसेविके मार्फत प्रमिलाताईंना निरोप पाठवला. प्रमिलाताई लगेचच अभ्यागत कक्षात आल्या.

भारतीय लष्करासाठी पहिली भारतीय सुरावटीची मार्शल ट्यून एका महिला संगीताकाराने बनवली आहे याचा त्यांना अतिशय आनंद झाला होता. त्यांनी अगदी प्रेमभराने तनुजा नाफडेंना जवळ घेतले आणि त्यांचे कौतुक केले. त्या काळात मी भारत विकास परिषद या सामाजिक संघटनेत सक्रिय होतो. माझ्यासोबत नाहिद फाझिल नामक एक मुस्लिम तरुणी देखील सक्रिय होती. नाहिदला हिंदुत्व, संघ, समिती या विषयांबाबत खूप आकर्षण होते. मला शांताक्का आणि मोहन भागवत यांना भेटायचे आहे म्हणून नाहिद माझ्या मागे लागली. मग शांताक्कांची वेळ ठरवून एक दिवस आम्ही दोघेही अहिल्या मंदिरात गेलो. आधी अक्कांची भेट झाली. मग अक्काच आम्हाला प्रमिलाताईंकडे घेऊन गेल्या. एक मुस्लिम तरुणी समितीबाबत इतके औत्सुक्य दाखवते आहे हे बघून त्यादेखील खूप सुखावल्या होत्या .तिच्याशी त्या अगदी भरभरून बोलल्या आणि मग तिला काही पुस्तके देखील वाचायला दिली होती.जानेवारी २०१९ मध्ये माझ्या हितगुज या नव्या ललित लेखसंग्रहाचे औपचारिक प्रकाशन शांताक्कांच्या हस्ते करायचे ठरले होते. त्यावेळी कोरोनाचा काळ होता.

त्यामुळे फक्त २५ व्यक्तींना निमंत्रित करता येणार होते. तसाच मग आम्ही अहिल्यादेवी मंदिरात कार्यक्रम ठरवला. कार्यक्रमाच्या वेळी प्रमिलाताईंना देखील मी बोलावून आणले आणि समोरच बसवले. कार्यक्रमाच्या दोन-तीन दिवस आधीच मी पुस्तकाची एक प्रत शांताक्कांकडे पाठवली होती. तिथे आल्यावर मला कळले की प्रमिलाताईंनी ते पुस्तक पूर्ण वाचून काढले आहे. त्यातल्या काही संदर्भाबाबत त्या माझ्याशी बोलल्या देखील. त्या लेखासंग्रहात लोक लेखक आणि इतर कलाकार यांना सगळे काही फुकटात कसे मागतात यावर एक लेख होता. लेखकाला एक पुस्तक लिहायचे आणि प्रकाशकाला ते पुस्तक प्रकाशित करायचे यामागे कितीतरी खर्च येतो, मात्र लोक त्याचा विचार न करता लेखकाला पुस्तकाची प्रत विनामूल्य मागतात. या सवयीवर मी टीका केली होती. प्रमिला ताईंनी तो देखील लेख वाचला होता. कार्यक्रम संपल्यावर त्या पुस्तकाची छापील किंमत पाहून दोन प्रतींचे पाचशे रुपये त्यांनी मला दिले आणि या दोन प्रती आम्हा दोघींसाठी मी विकत घेते आहे असे सांगितले. लेखकांच्या श्रमांना आणि बुद्धीला दाद द्यायलाच हवी.

त्यामुळे मी नेहमी विकत घेऊनच पुस्तके वाचते असे त्यांनी स्पष्ट करत मला ते पैसे घ्यायला लावले होते. दरवर्षी दसऱ्याला मी रात्री किंवा मग दुसऱ्या दिवशी सकाळी अहिल्या मंदिरात जाऊन शांताक्का आणि प्रमिलाताई यांना सोने देत असे. २०२२ च्या दसऱ्याला मी त्यांना सोने द्यायला गेलो, तेव्हा माझी मुलगी दिव्येशा हिला पुणे विद्यापीठात एम टेक साठी प्रवेश मिळाला होता, आणि तिथे होस्टेलची सोय कशी काय होते याबाबत मी चिंतेत होतो. प्रमिला ताईंना ते कळताच त्या लगेचच मला म्हणाल्या “तुम्ही काळजी करू नका, काही सोय नाही झाले तर पुण्यात समितीचे कार्यालय आहे, आणि वसतिगृह सुद्धा आहे. तिथे तिची नक्की सोय करून देईल. सुदैवाने दिव्येशाला विद्यापीठ परिसरातच वसतिगृहात प्रवेश मिळाला. त्यामुळे मग अडचण आली नाही. मात्र नंतर त्या दरवेळी तिची चौकशी करायच्या. २०२३ च्या दसऱ्याला रात्री उशिरा मी सोने द्यायला अहिल्या मंदिरात गेलो होतो. शांताक्का आणि प्रमिला ताईंना सोने दिले. थोडा वेळ बसलो आणि निघालो. त्यानंतर सात-आठ महिने अहिल्या मंदिरात जाण्याचा योगच आला नाही. १ ऑगस्ट २०२४ पासून मी स्वतःच खूप आजारी झालो. त्यामुळे २०२४ च्या दसऱ्याला मी अहिल्या मंदिरात जाऊ शकलो नाही. जवळजवळ सहा सात महिने मी आडवांच होतो. नंतर हळूहळू हिंडू फिरू लागलो. मग एप्रिल २०२५ मध्ये एकदा शांताक्कांना भेटायला म्हणून अहिल्या मंदिरात गेलो.

त्यावेळी कळले की प्रमिला ताईंची प्रकृती खूपच बिघडली असून त्या आता अंथरुणावरच आहेत. त्यामुळे त्यांना भेटता आले नाही. अधून मधून कोणी भेटले की मी ताईंच्या प्रकृतीची चौकशी करायचो. मात्र काही सुधारणा असल्याचे कळत नव्हते. आणि अखेर ३१ जुलै च्या सकाळी दहाच्या सुमारास व्हाट्सअप वर प्रमिलाताई गेल्याचाच संदेश मिळाला. मी लगेचच चौकशी केली त्यांनी आयुष्यभर त्यागमय जीवनच व्यतीत केले होते. मृत्यूनंतरही त्यागाचीच भूमिका त्यांनी पार पाडायचे ठरवले असावे. त्यामुळेच आपला पार्थिव देह अंत्यसंस्कारासाठी न नेता नागपूरच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसला देहदान करण्यात यावे असे त्यांनी सांगून ठेवले होते. त्यानुसार दुसऱ्या दिवशी म्हणजेच १ ऑगस्टला सकाळी ९ वाजता त्यांचा देह एम्सला सोपवला जाणार होता. १ ऑगस्टला सकाळी मी अहिल्या मंदिरात पोहोचलो. तिथे सर्व सेविका आणि संघ परिवारातील सर्व व्यक्तींनी गर्दी केली होती. सर्वत्र निरव शांतता पसरलेली होती काचेच्या बॉक्समध्ये प्रमिलाताईंचा देह विसावला होता. लोक शांतपणे येत होते आणि अंत्यदर्शन घेऊन बाजूला उभे राहत होते. तिथे श्रीराम जय राम जय जय राम चा घोष संथ स्वरात सुरू होता. सकाळी साडेआठला त्यांना आदरांजली अर्पण करणारी भाषणे झाली. मग समितीच्या पद्धतीनुसार त्यांना अंतिम प्रणाम देण्यात आला, आणि बाहेर उभ्या असलेल्या एम्सच्या वाहनात त्यांचे पार्थिव नेऊन ठेवण्यात आले. एक तपस्विनी आयुष्यभराची तपस्या आटोपून आपल्या अंतिम प्रवासाला निघाली होती.

प्रमिलाताईंनी आयुष्यभर त्यागमय जीवन व्यतीत केले. मात्र त्याचवेळी त्यांनी सर्वांशी संपर्क ठेवला आणि सर्वांना माया लावली. अहिल्यादेवी मंदिरात असलेल्या पूर्वांचलच्या लहान लहान मुलींना त्यांनी आजीचे प्रेम दिले. इतरही असंख्य स्नेही जनांना त्यांनी फक्त माझ्याच दिली. त्यातलाच मी देखील एक होतो. आयुष्यातली सोळा वर्षे त्यांचा प्रेमामयी सहवास मला लाभला, आणि एका मातृदेवतेशी माझा संपर्क राहिला याचे मला समाधान आहे.

Views: 123
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
बँक ऑफ इंडियातील ग्राहकाच्या खात्यावरील 12,700 रुपये गायब…सायबर गुन्हे अन्वेषण कडे तक्रार दाखल…बँकेने जबाबदारी झटकली

आटपाडी पोलिसांची दमदार कामगिरी..बँकेच्या खात्यातून गायब झालेले पैसे खातेदाराला मिळवून दिले......सायबर गुन्हे अन्वेषण कडे केली होती तक्रार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)