अक्षय उर्जा दिनानिमित्त कल्याण डोंबिवली महापालिकेकडून सौरउर्जाबाबत व जनजागृती पथनाट्य सादरीकरण
मुंबई (सिध्दार्थ वाघमारे)
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी नागरीकांनी सौर उर्जेचा फायदा व आर्थिक बचत याबाबत माहिती देवून महापाालिकेच्या विविध प्रकल्पात सौर उर्जेचा कशा प्रकारे वापर होता याबाबत माहिती दिली. विजेच्या समस्यांवर उपाय म्हणून सौर उर्जा उत्तम पर्याय या योजनेकरीता पंतप्रधान मोफत वीज योजना अंतर्गत रहिवासी संस्था स्वताचे घर यासाठी अनुदान केंद्र शासनाच्या माध्यमातून देण्यात येते. स्वत:च्या घराच्या छतावर सौर उर्जा पॅनल बसविल्यामुळे वीज बीलात बचत होते. योजनेची वैशिष्ट्ये सोलर पॅनलवर पडणार्या सूर्य प्रकाशापासून वीज निर्माण होते.
निर्माण झालेली वीज वापरता येईल व तीचे बील येत नाही. योजनेचे फायदे पॅनल सफाई व्यतिरिक्त देखभालीची गरज नाही. सर्व वीज उपकरणे बिनधास्त चालवा व मालमत्ता करात सूट, अक्षय उर्जेचे फायदे, अक्षय उर्जा, नैसर्गिक स्त्रोताकडून मिळते जसे सूर्यप्रकाश् वारा, पाणी, बायोमास इत्यादी मार्फत अक्षय उर्जा पर्यावरण पूरक आहे. जीवाश्म इंधनाचे तुलनेत प्रदूषण कमी करते. उर्जा सुरक्षितता व शाश्वत विकासासाठी उपयोगी, सौर उर्जा, पवन उर्जा, जलविद्युत बायोमास, सागरी लाटा इत्यांदीचा समावेश अक्षय उर्जामध्ये होतो.
ग्रामीण जीवनमान सुधारणेसाठी उपयुक्त अशा प्रकारे बहुउपयोगी सौर उर्जा आहे आणि अक्षय उर्जा दिवस म्हणून कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयात भव्य असे मार्गदर्शन शिबीर आयोजन केले. विद्युत कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत ह्यांनी उर्जा बचतची शपथ घेतली.यावेळी प्रमुख विश्वस्त म्हणून आयुक्त अभिनव गोयल, शहर अभियंता अनिता परदेशी, विद्युत विभाग कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, उपआयुक्त जनसंपर्क संजय शिवाजी जाधव, करनिर्धारक उपआयुक्त कांचन गायकवाड, उपअभियंता भागवत पाटील, कार्य अभियंता जितेंद्र शिंदे, कनिष्ठ अभियंता चंद्रकांत पोळ आदी उपस्थित होते. इलेक्ट्रिशियन सौ. स्नेह भोसले यांनी सूत्रसंचालन केले. तसेच या कार्यव्रâमासाठी पीडब्ल्यूडी सा.बां. भुषण मानकामे उपस्थित होते. तसेचञ सर्व प्रभागातील पर्यवेशक वायरमन विद्युत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


