राजकारणात सक्रिय असणाऱ्या शिक्षकाचे निलंबन करा….संतोष हेगडे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
आटपाडी तालुक्यात शिक्षक राजकारण करतात,अनेक पक्षाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात,राजकीय व्यासपीठावर नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात. अशा शिक्षकांना बडतर्फ करा. किंवा त्यांचे राजीनामे घ्या. अशी मागणी जिल्हाधिकारी, व जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी केली आहे.
बहुजन समाज पार्टीचे खानापूर आटपाडी विधानसभा अध्यक्ष संतोष हेगडे यांनी शिक्षक उत्तम तायाप्पा जाधव उर्फ यु.टी जाधव यांच्या निलंबनाच्या कारवाई संदर्भात निवेदन दिलेल आहे. निलंबनाची कारवाई न केल्यास मुख्याधिकारी यांच्या समितीनेच शिक्षक यू.टी जाधव हे उघडपणे राजकीय पक्षाचा प्रचार करतात असे समजून मुख्याधिकारी यांच्या विरोधात आझाद मैदान येथे आंदोलन करत असल्यास संदर्भात निवेदनात म्हटले आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की शिक्षक उत्तम तायाप्पा जाधव उर्फ यू . टी.जाधव हे आटपाडी तालुक्यातील लिंगेवस्ती शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करत आहेत. परंतु हे शिक्षक राजकीय नेत्याप्रमाणे तालुक्यामध्ये वावरत आहेत. राजकीय कार्यक्रमांमध्ये तसेच राजकीय पक्षाच्या नेत्यासोबत आमदारांसोबत वारंवार वावरतात. तसेच राजकीय स्टेजवर जाऊन जाती-धर्मावर भाषणे देऊन त्या पक्षाचा प्रचार करत आहेत. जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करत आहेत .
तसेच राजकीय पक्षाच्या आमदार तसेच मंत्री महोदय यांच्यासोबत वारंवार जवळीकता साधून निवेदन देण्याच्या निमित्ताने फोटो काढून सोशल मीडिया वर तसेच वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध करून आटपाडी तालुक्यांमध्ये तसेच जिल्हा परिषद सांगली तसेच पंचायत समिती आटपाडी मध्ये आपले राजकीय दबाव निर्माण करून वैयक्तिक स्वार्थ साधत आहेत. निवडणुकीच्या काळामध्ये उघडपणे राजकीय पक्षाचा बेकायदेशीररित्या प्रचार करताना वारंवार दिसत आहे तसेच प्रचार रॅलीमध्ये उघडपणे जल्लोष करताना दिसत आहेत.
डान्स करताना दिसत आहेत तसेच तालुक्यामध्ये रस्त्याच्या रोडलगत चौकाचौकांमध्ये राजकीय पक्षाचे नेते आमदार तसेच मंत्री महोदय यांच्यासोबत फोटो असलेले बॅनरबाजी जाहिरात बाजी करत आहेत. तसेच राजकीय कार्यक्रमांमध्ये सहभाग घेताना दिसत आहे तसेच राजकीय कार्यक्रमाचे आयोजन करून राजकीय नेतेमंडळी यांना निमंत्रण देऊन शिक्षकांचा त्यामध्ये सहभाग वाढवत आहेत. तसेच शिक्षकांच्या मनांवर एका राजकीय पक्षाचा अजेंडा बिंबवत आहे.
तसेच इतर शिक्षकांना या राजकारणाच्या प्रवाहामध्ये ते ओढताना दिसत आहे. या सर्व गोष्टीमुळे यु.टी जाधव हे शाळेमध्ये ते मुलांना शिकवताना दिसत नाहीत कायम राजकीय पक्षाचे कार्यक्रम आंदोलने नेतेमंडळी यांना भेटण्यात गुंग असतात. तसेच शालेय वेळेत पंचायत समिती मध्ये ते वारंवार शिक्षण विभागामध्ये केबिनमध्ये बसलेले दिसतात. तसेच बेकायदेशीररित्या प्लॉटिंग व्यवसाय करताना ते दिसत आहेत. अशा या शिक्षकांच्या कृत्यामुळे तालुक्यातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यावर परिणाम होताना दिसत आहे .
अशा घटनेमुळे व बेशिस्त शिक्षकांच्या वागणुकीमुळे पालक प्राथमिक शाळेतील आपल्या विद्यार्थ्यांना खाजगी शाळेमध्ये दाखल करीत आहेत व तसेच पालकांचा शिक्षकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे.तालुक्यातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होताना दिसत आहे प्राथमिक शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत
त्यामुळे अशा बेजबाबदार बेशिस्त महाराष्ट्र ग्रामविकास विभाग अंतर्गत जिल्हा परिषद सेवा वर्तणूक नियम 1967 व शिस्त व अपील नियम 1964 चे शासनाच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या उत्तम तायाप्पा जाधव उर्फ युटी जाधव अशा शिक्षकावर निलंबनाची कारवाई करावी अन्यथा मुख्य अधिकारी यांचा या शिक्षकाला पाठिंबा आहे असे समजून मुख्याधिकारी यांच्या विरोधात आझाद मैदान मुंबई येथे तीव्र प्रकारचे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हंटले आहे. सदर निवेदन मुख्यमंत्री महोदय तसेच आझाद मैदान पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना दिले आहे .


