• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

तऱ्हाडी ग्रामसभेत ग्रामविकासाच्या मुद्द्यांवर वणवा; जलजीवन मिशनच्या अनियमिततेवर कारवाईचा ठराव, ममाने-अभानपूर ग्रामपंचायत स्वतंत्र होणार

माणगंगा by माणगंगा
September 1, 2025
in Uncategorized
0
तऱ्हाडी ग्रामसभेत ग्रामविकासाच्या मुद्द्यांवर वणवा; जलजीवन मिशनच्या अनियमिततेवर कारवाईचा ठराव, ममाने-अभानपूर ग्रामपंचायत स्वतंत्र होणार

*तऱ्हाडी ग्रामसभेत ग्रामविकासाच्या मुद्द्यांवर वणवा; जलजीवन मिशनच्या अनियमिततेवर कारवाईचा ठराव, ममाने-अभानपूर ग्रामपंचायत स्वतंत्र होणार*

त-हाडीशिरपूर तालुक्यातील तऱ्हाडी गावात शनिवार दि. ३० ऑगस्ट २०२५ रोजी झालेली ग्रामसभा अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरली. गावाच्या सर्वांगीण विकासासह भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर उघडपणे चर्चा झाली, ठराव मंजूर झाले आणि भविष्यातील न्यायालयीन लढाईचे संकेत या ग्रामसभेतून स्पष्ट दिसून आले.ग्रामसभेत नानाभाऊ अहिरे, किरणभाऊ ठाकरे व योगेशभाऊ पारधी यांनी ग्रुप ग्रामपंचायतीतून ममाने व अभानपूर ही दोन्ही गावे स्वतंत्र ग्रामपंचायत करण्याचा प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव उपस्थित सर्व ग्रामस्थांनी टाळ्यांच्या गजरात मंजूर केला. गावच्या स्वायत्त विकासासाठी व प्रशासन सुलभतेसाठी हा निर्णय मोठा टप्पा मानला जात आहे.

सभेतील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो जल जीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामांचा दर्जा व त्यातील अनियमितता.ग्रामनिष्ठा संघर्ष समितीचे दादासाहेब भुषण बागुल यांनी प्रशासनाला कठोर शब्दांत धारेवर धरले. त्यांनी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत तब्बल २००० पानांचे दस्तऐवज गोळा करून ग्रामसभेत सादर केले. यामध्ये ठेकेदारांनी न केलेली कामे व त्यांची मंजूर बिले, अपूर्ण व निकृष्ट दर्जाच्या कामांची माहिती समोर आली.या पार्श्वभूमीवर ग्रामसभेत एकमुखी ठराव पारित करण्यात आला की संबंधित अधिकारी, कर्मचारी व ठेकेदारांविरुद्ध जिल्हा परिषद मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार सादर केली जाईल.ग्रामस्थांनी स्पष्ट केले की, जर प्रशासनिक पातळीवर कोणतीही कार्यवाही झाली नाही तर हे प्रकरण थेट मा. उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिकेद्वारे नेण्यात येईल. या भूमिकेमुळे ग्रामसभा केवळ चर्चापुरती मर्यादित न राहता, ठोस कायदेशीर लढाईकडे नेणारा मार्ग ठरली आहे.गावाला दीड वर्षांपासून सरपंच नसल्यामुळे प्रशासक व्यवस्था लागू आहे. मात्र प्रशासक सोनवणे हे महिनोन्महिने गावात हजेरी लावत नसल्याची ग्रामस्थांची तीव्र नाराजी सभेत व्यक्त झाली. ग्रामसेवक श्री देविदास धाडे यांनी मात्र योग्यरीत्या ग्रामसभा पार पाडली. गावातील अस्वच्छता व इतर समस्या असताना गावकऱ्यांनी याआधीच ग्रामपंचायतीचा निषेध केला होता जो अख्ख्या महाराष्ट्रात गाजला होता. मात्र तरीही प्रशासनाला जाग आलेली नाही.

त्यांनतर ही प्रशासक सोनवणे गावात यायला व समस्या सोडवायला तयार नाहीत.ग्रामसभेलाही ते गैरहजर राहिल्याने संताप व्यक्त करत ग्रामस्थांनी ग्रामसेवकाला प्रोसीडिंगमध्येच प्रशासकाविरोधात तक्रार व कार्यवाहीचा ठराव लिहून घेण्यास भाग पाडले. प्रशासनाच्या ढिलाईवर गावकऱ्यांचा विश्वास उडत असल्याचे हे पाऊल दर्शवते.राष्ट्रीय महामार्ग ७३५बीई अंतर्गत शिरपूर-शहादा मार्गाचे चौपदरीकरण होणार असून, तऱ्हाडीतील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी, घरे व दुकाने बाधित होणार असल्याचे वास्तव ग्रामसभेत चर्चेला आले. प्रभावित कुटुंबांना योग्य भरपाई मिळावी याबाबत मागणी ग्रामस्थांनी केली.

ग्रामसभेला गावातील सुमारे ९० टक्के राजकीय नेते गैरहजर राहिल्याने ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी दिसून आली. तथापि, गावाचे प्रतिष्ठित नागरिक मा. दादासो दीपकजी शिरसाठ यांनी अध्यक्षपद भूषवून सभेचे संयोजन केले. त्यांच्या शांत व संतुलित नेतृत्वामुळे चर्चा रचनात्मक वातावरणात पार पडली. त्यांच्या अध्यक्षीय संबोधांनाने उपस्थितांची मने जिंकली.तऱ्हाडी गावाची ग्रामसभा ही केवळ औपचारिकता न ठरता गावकऱ्यांच्या जाणीवजागृतीचे व लोकशाही हक्कांसाठीच्या सजगतेचे जिवंत उदाहरण ठरली. यातही महत्त्वपूर्ण म्हणजे या ग्रामसभेला उपस्थितांपैकी 90% उपस्थिती ही तरुण युवा वर्गाची होती. भ्रष्टाचार उघडकीस आणणे, अनियमततेवर उघड चर्चा, ठराव पारित करणे, न्यायालयीन कारवाईची तयारी आणि स्वतंत्र ग्रामपंचायतीसाठी ठाम भूमिका घेणे या सर्व घडामोडींमुळे तऱ्हाडी ग्रामसभा इतिहासात नोंद होईल यात शंका नाही.

Views: 102
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
भारतिय टपालखात्याचा महत्वपुर्ण निर्णय:पोस्टाची रजिस्टर्ड पोस्ट सेवा होणार इतिहासजमा1 सप्टेंबरपासून सेवा बंद करण्याचा भारतीय टपाल खात्याचा निर्णयत-

भारतिय टपालखात्याचा महत्वपुर्ण निर्णय:पोस्टाची रजिस्टर्ड पोस्ट सेवा होणार इतिहासजमा1 सप्टेंबरपासून सेवा बंद करण्याचा भारतीय टपाल खात्याचा निर्णयत-

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)