• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

भारताला हिंदूराष्ट्र म्हणून संवैधानिक दर्जा मिळायला हवा,ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!,

माणगंगा by माणगंगा
September 4, 2025
in Uncategorized
0
भारताला हिंदूराष्ट्र म्हणून संवैधानिक दर्जा मिळायला हवा,ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!,

घ्या समजून राजेहो…,

भारताला हिंदूराष्ट्र म्हणून संवैधानिक दर्जा मिळायला हवा,

ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!,

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

भारत हे हिंदू राष्ट्रच आहे. भारताला वेगळे हिंदूराष्ट्र म्हणून घोषित करण्याची काहीही आवश्यकता नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले आहे. दिल्लीत गत सप्ताहात “संघ प्रवासाची शंभर वर्षे: नवी क्षितिजे” या विषयावर एक तीन दिवसीय व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. अखेरच्या दिवशी उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे देताना डॉ. भागवत यांनी हा मुद्दा स्पष्ट केला आहे.

डॉ. भागवतांबद्दल पूर्ण आदरभाव व्यक्त करूनही त्यांच्या या विवेचनासंदर्भात कुठेतरी असहमती दर्शवावीशी वाटते. भारत हे हिंदूराष्ट्रच आहे. त्यामुळे वेगळे हिंदूराष्ट्र म्हणून घोषित करण्याची काहीही आवश्यकता नाही हे भागवतांचे विधान भावनिक दृष्ट्या बरोबर असेलही, पण घटनात्मक दृष्ट्या भारत हे निधर्मिक राष्ट्र म्हणून ओळखले गेले आहे. देशाच्या घटनेत समाजवाद आणि निर्धार्मिकता हेतून शब्द नंतर १९७६ मध्ये घालण्यात आलेले आहेत. जरी घटना बनवली तेव्हा हे शब्द घटनेत नव्हते, तरी तेव्हाही देशाने सर्वधर्मसमभावाची भूमिका स्वीकारत देशाला निधर्मिक राष्ट्र म्हणूनच पुढे नेण्याचा संकल्प केला होता. आज स्वातंत्र्य मिळून ७८ वर्ष होत आहेत. तरीही अजून हा देश निधर्मिक म्हणूनच ओळखला जातो.

हा देश फक्त निधर्मिक म्हणून ओळखला जातो, इतकेच नाही तर या देशात काही धर्मांना आकारण झुकते माप देखील दिले जाते आहे. आपल्या देशात सुमारे दीड हजार वर्षांपूर्वी जे रहिवासी होते ते सर्व हिंदूच होते. मात्र ते विभिन्न जाती पातींमध्ये विभागले गेले होते. त्याचबरोबर हा एकसंघ देश नव्हता. तर अनेक छोटी छोटी राज्य इथे राज्यकारभार करीत होती. त्यामुळे देशावर परक्यांनी आक्रमण केले आणि त्यांनी हळूहळू संपूर्ण देश ताब्यात घ्यायला सुरुवात केली होती.

परकीय आक्रमण होण्यापूर्वीच भारतात भगवान गौतम बुद्धाने अवतार कार्य सुरू केले. त्याने बौद्ध धम्म उभा केला. त्यामुळे बरेचसे हिंदू हे बौद्ध बनले. नंतर भगवान महावीरांनी आपले अवतार कार्य उभारले. परिणामी बरेच हिंदू हे जैन देखील झालेत. मुस्लिमांनी आक्रमण केल्यानंतर त्यांच्याशी दोन हात करण्यासाठी पंजाब मध्ये गुरु नानकदेव यांनी शीख पंथाची स्थापना केली. त्या टापूत बरेच लोक शीख देखील आहेत. याच काळात केव्हातरी पर्शिया मधून पारशी लोक भारतात आले. ते देखील इथेच आहेत मुस्लिम आपल्या देशात आल्यावर त्यांनी तलवारीच्या जोरावर अनेक हिंदूंना बळजबरीने मुस्लिम बनविले. आज भारतात असलेल्या मुस्लिम समुदायापैकी बहुतेक सर्व मुस्लिमांची मूळ कुळे शोधली तर ते कुठेतरी हिंदू असल्याचेच पुरावे सापडतील. तोच प्रकार ख्रिश्चनांच्या बाबतीतही आहे. नंतर १२ व्या शतकाच्या दरम्यान व्यापारासाठी या देशात ख्रिस्ती लोक आले. त्यांनी व्यापाराबरोबरच धर्मप्रसारही केला. मात्र त्यांनी तलवारीच्या जोरावर धर्मप्रसार केला नाही, तर जनसामान्यांना गोरगरिबांना प्रलोभन दाखवून त्यांना ख्रिस्ती बनविले. परिणामी आज भारतात हिंदू, बौद्ध, जैन, मुस्लिम, ख्रिस्ती, पारशी असे विविध धर्मांचे नागरिक वास्तव्याला आहेत. घटनेने सगळ्यांनाच धार्मिक स्वातंत्र्य प्रदान केलेले आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने जीवन जगण्याची मुभा आहे.

साधारणतः दहाव्या शतकाच्या दरम्यान देशात सर्वत्र मुस्लिम राजवटीचेच वर्चस्व होते. नंतर काही रजपुत राजे तर महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुस्लिमांशी लढा देऊन हिंदवी साम्राज्य उभे करण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान इंग्रज आल्यावर त्यांनी मग आधी व्यापार मग धर्मप्रसार आणि शेवटी या देशाची सत्ताही मिळवली. त्यांनी हिंदू आणि मुस्लिम दोन्ही राजांना आधी आपले मांडलिक बनवले आणि मग त्यांचे मांडलिकत्व देखील रद्दबातल ठरवले होते. इंग्रजांचे धोरण हे “फोडा आणि झोडा” असे होते. त्यामुळे त्यांनी हिंदू आणि मुस्लिम यांच्यात सातत्याने संघर्ष कसा पेटता राहील हेच बघितले होते. त्यातही इंग्रजांचे मुस्लिमांना झुकते माप देण्याचेही धोरण होते. त्यामुळे या देशात हिंदूंवर इंग्रजांच्या काळापासूनच अन्याय होत राहिला.

इंग्रज देशात सत्तारूढ होण्यापूर्वीचा हिंदुस्थान बराच मोठा होता. मात्र इंग्रजांनी हळूहळू देशाचे तुकडे करत नेले. आजचा श्रीलंका नंतर म्यानमार म्हणजेच ब्रह्मदेश, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, भूतान, आणि अफगाणिस्तान हे सर्व एका काळी भारताचेच भाग होते. मात्र इंग्रजांनी आपल्या सोयीसाठी भारताचे तुकडे केले. त्यात म्यानमार बांगलादेश पाकिस्तान आणि अफगाणिस्तान येथे मुस्लिमबहुल वस्तीत जास्त राहिली आणि हे देश कायम भारताला उपद्रवच देत राहिले.

देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारत आणि पाकिस्तान असे दोन भाग केले गेले. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नमूद केल्यानुसार भारतात हिंदूंनी राहावे आणि पाकिस्तानात मुस्लिमांनी राहावे असे धोरण ठेवले होते. त्यानुसार पाकिस्तान मधून अनेक हिंदू निर्वासित होऊन भारतात आले. मात्र तत्कालीन नेते महात्मा गांधी आणि राज्यकर्ते पंडित नेहरू यांच्या बोटाचेप्या धोरणामुळे भारतातील मुसलमान भारतातच राहिले. हिंदूंच्या तुलनेत मुस्लिम शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेले होते. नेहरूंनी त्याचा फायदा करून घेत मुस्लिमांना झुकते माप देऊन मुस्लिमांची एकगठ्ठा मते घेणे आणि काँग्रेसला विजयी करणे हे धोरण अवलंबले. त्यावेळी निधार्मिकतेचा मुद्दा पुढे करणाऱ्या देशात अल्पसंख्यांक ही संज्ञा देखील लागू केली गेली. परिणामी आज मुस्लिम ख्रिश्चन पारशी आणि जैन हे अल्पसंख्यांक म्हणून ओळखले जातात. अल्पसंख्यांकांना कायम झुकते माप दिले गेले. त्यातही मुस्लिमांची एक गठ्ठा मते हवीत म्हणून त्यांच्यावर विशेष लोभ दाखवला गेला. देशात समान नागरी कायदा तेवढ्यासाठी लागू केला गेला नाही. त्यामुळे आपल्या देशात बाकीधर्मीयांना घटनेनुसार वागावे लागते. मात्र मुस्लिमांना मुस्लिम धर्मगुरूंच्या कायद्यानुसार वागण्याची मुभा दिली जाते. त्यामुळेच मुस्लिमांची हिंदूंवर बरेचदा दादागिरी देखील चालते.

स्वातंत्र्यानंतर देशात कुटुंब नियोजनाचा प्रचार प्रसार केला गेला. त्याचप्रमाणे द्विभार्या प्रतिबंधक कायदा देखील लागू केला गेला. मात्र मुस्लिमांनी कुराणातील तरतुदींची नोंद दाखवून त्यातून सूट मिळवून घेतली. त्यामुळे मुस्लिमांची लोकसंख्या झपाटून वाढते आहे. १९५१ ची जनगणना आणि २०११ ची जनगणना यातील हिंदू आणि मुस्लिमांचे लोकसंख्येचे आकडे तपासले तर हा मुद्दा लक्षात येऊ शकतो.

त्याचबरोबर इतर अनेक मुद्द्यांमध्येही हिंदू, मुस्लिम, ख्रिस्ती यांच्यात कुठेतरी भेदभाव केला जातो. आज दिवाळीत फटाके फोडले तर ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण होते अशी तक्रार केली जाते आणि सर्वोच्च न्यायालय त्यात हस्तक्षेप करते. मात्र ख्रिसमस किंवा नववर्षाचे स्वागत यासाठी जी आतशबाजी केली जाते, तिच्यावर कोणीही आक्षेप घेत नाही. हिंदूंच्या मंदिरातील पशुबळी प्रथा कायद्याने बंद केली गेली. मात्र मुस्लिमांच्या बकरी ईदला आजही लाखो बकऱ्यांचा बळी दिला जातो. आज हिंदूंच्या मंदिरावर ध्वनिक्षेपक लावून २४ तास वाजवायला मनाई आहे. मात्र मुस्लिमांच्या मशिदीवर २४ तास भोंगे वाजवले जातात. आज हिंदुंच्या मिरवणुका जर मुस्लिम मशिदीसमोरून गेल्या तर त्याला आक्षेप घेतला जातो. कायद्याने देखील काय कारवाई केली जाते. मात्र अन्य धर्मीयांच्या मिरवणुकी हिंदू मंदिरांसमोरून गेल्या तर तिथे कोणताही आक्षेप घेतला जात नाही.असे अनेक मुद्दे सांगता येतील.

देशात मुस्लिमांनी आक्रमण करणे सुरू केले त्यावेळी त्यांनी सर्वप्रथम इथल्या हिंदूंच्या मंदिरांना लक्ष्य केले होते. अनेक मंदिरे त्यांनी फोडली आणि त्याचे रूपांतर मशिदीत केले. आज अभ्यासकांनी संशोधन करून कुठे कुठे असे प्रकार घडले हे समोर आणले आहे. मात्र अयोध्येतील राम मंदिर साठीच हिंदूंना किती वर्षे झगडावे लागले हे भागवतांना देखील ज्ञात आहे. त्या संघर्षात संघाचा देखील सहभाग होताच. त्याचबरोबर आता मथुरा आणि काशी येथे देखील संघर्ष करावा लागणार आहे हे उघड आहे. इतरही मंदिरांसाठी आज संघर्ष उभा होतो आहे. आपल्याच देशात आपल्याच मंदिरांसाठी आपल्याला असा संघर्ष करावा लागणार असेल तर ते दुर्दैवच म्हणावे लागेल.

इंग्रजांनी या देशावर दीर्घकाळ राज्य करायचे म्हणून चुकीचा इतिहास तयार केला. त्यात अन्य धर्मीयांचे उदात्तीकरण करत हिंदू धर्मीयांना कमी लेखले गेले. अनेक चुकीच्या नोंदी केल्या गेल्यात. त्यामुळे जनसामान्यांमध्येही संभ्रम निर्माण झाला. हे फक्त हिंदू धर्मियांबाबतच घडले हे इथे नमूद करणे गरजेचे आहे. जर भारत हे हिंदू राष्ट्र असेल तर हिंदूंबाबत असा दुजाभाव का हा देखील प्रश्न मनात येतो.

हिंदूधर्मीय हे मुळातच सहिष्णू म्हणून ओळखले जातात. अन्य धर्मियांसारखा आक्रमक धर्मप्रचार हा हिंदूंना मान्य नाही. ज्यांना हिंदू धर्मात रस वाटेल त्यांच्यासाठी हिंदू धर्मियांनी दरवाजे उघडे ठेवले आहेत. मात्र अन्य धर्मियांप्रमाणे कोणतीही जबरदस्ती हिंदू धर्मात केली जात नाही. अन्य धर्मीयांमध्ये विशेषतः मुस्लिमांमध्ये आजही आक्रमक पद्धतीने धर्मप्रचार सुरू असून अनेक हिंदूंना मुस्लिम बनवले जात आहे. त्यासाठी लव जिहाद सारखे प्रकार देखील हाताळले जात आहेत. धर्मांतरणाबाबत जे कायदे आहेत, त्यातही अन्यधर्मीयांनाच झुकते माप दिले गेले आहे.

आज भारत हा निधर्मिकता मानणारा देश म्हणून कागदोपत्री नोंदला गेला आहे. मात्र विद्यमान कायदे आणि आधीच्या राज्यकर्त्यांचे अल्पसंख्यांकांच्या लांगुलचालनाचे धोरण बघता मुस्लिमांची लोकसंख्या इथे वाढत आहे. आज मुस्लिम जगातील प्रत्येक देशात पोहोचले आहेत. त्यातही अनेक ख्रिस्ती देशांमध्ये त्यांनी हळूहळू आपली लोकसंख्या वाढवत नेली आणि लोकसंख्येच्या ५० टक्क्यापेक्षा अधिक मुस्लिमांची लोकसंख्या झाल्यानंतर त्या देशांना मुस्लिम देश म्हणून घोषित केले, असेही प्रकार घडले आहेत. उद्या भारतातही असे प्रकार घडतील अशी भीती व्यक्त होत आहे. जाणकारांच्या मते २०५०नंतर कधीही अशी परिस्थिती उद्भवू शकते. आज जगात ख्रिस्ती राष्ट्रीय आणि मुस्लिम राष्ट्रीय बरीच आहेत. बौद्ध देश देखील आहेत मात्र हिंदू देश माझ्या माहितीनुसार एकही नाही. हिंदू धर्म हा जगातील सर्वात प्राचीन धर्म म्हणून मानला जातो. एका काळात हिंदू धर्मानेच जगाला दिशा दाखवली असेही म्हटले जाते. असे असताना जगात एकही हिंदू देश नसावा हे दुर्दैवच म्हणावे लागेल. पूर्वी नेपाळ हे हिंदू राष्ट्र म्हणून ओळखले जात होते. नंतर परिस्थितीजन्य बदलामुळे नेपाळ देखील आता निधर्मिक राष्ट्र म्हणून घोषित झाले आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर भारत हे हिंदू राष्ट्र म्हणून रीतसर घोषित व्हायला हवे. त्याला घटनात्मक मान्यता मिळायला हवी. आज भारत हा विश्वगुरू बनवावा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वप्न आहे. जर भारताला विश्वगुरू बनवायचे असेल तर सर्वप्रथम हा देश हिंदुराष्ट्र म्हणून घोषित व्हायला हवा. इथे हिंदूंना समान अधिकार मिळायला हवेत आणि हिंदूंचा सर्वच स्तरात योग्य असा सन्मान व्हायला हवा. आज अन्य धर्मीयांच्या तुलनेत हिंदू हा सुशिक्षित आणि प्रगत म्हणून ओळखला जातो. जर भारत हिंदू राष्ट्र बनले तर भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी हा हिंदूच मोलाचे योगदान देईल हे नक्की.

जो भारतात राहतो इथल्या चालीरीतीप्रमाणे आयुष्य जगतो. इथली जीवनशैली अवलंबतो तो हिंदू असे संघाचे सध्याचे धोरण आहे. हे धोरण जर मान्य केले तर देशात हिंदू मुस्लिमांचा संघर्ष का व्हावा हा देखील प्रश्न निर्माण होतो. हिंदूंची मुस्लिमांची ख्रिश्चनांची बौद्धांची सगळ्यांचीच श्रद्धास्थाने वेगवेगळी आहेत. त्यावरूनही संघर्ष निर्माण होतोच. हे संघर्ष टाळायचे असतील तर भारताला हिंदूराष्ट्र घोषित करून इथल्या हिंदूंना एक नवी शक्ती प्रदान केली जाणे गरजेचे आहे. तरच इथला हिंदू अधिक प्रगत होईल आणि भारत विश्व गुरु बनू शकेल.

वाचकहो पटतेय का तुम्हाला हे…..?

त्यासाठी आधी समजून तर घ्या राजेहो…

वाचकहो हा लेख कसा वाटला त्या संदर्भात आपली स्पष्ट आणि परखड मते अवश्य कळवा. त्याचे स्वागतच होईल. आपल्याला लेख आवडल्यास इतरांनाही तो फॉरवर्ड करा आणि त्यांचीही मते जाणून घ्या.

Views: 119
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post

ऐन गणेशोत्सवात श्रीगणेशाचा जाहिरातीसाठी विडंबनात्मक वापर !बिनशर्त माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा; हवेल्स व न्यूट्रिका कंपन्यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नोटीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)