• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

आयुष्यातले सांगाती २८,डॉ नीलम गोऱ्हे,ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!,

माणगंगा by माणगंगा
September 6, 2025
in Uncategorized
0
भारताला हिंदूराष्ट्र म्हणून संवैधानिक दर्जा मिळायला हवा,ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!,

आयुष्यातले सांगाती २८,

डॉ नीलम गोऱ्हे,

ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!,

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

डॉक्टर नीलम गोऱ्हे हे नाव मी आधीपासूनच म्हणजे १९८० नंतरच्या दशकात अनेकदा ऐकत होतो. माझ्या आठवणीनुसार आधी त्या दलित पॅंथर मध्ये मग समाजवादी पक्षात, मग काँग्रेसमध्ये,असा प्रवास करत १९९८ मध्ये त्या शिवसेनेत प्रवेश करत्या झाल्या. त्यांचा शिवसेना प्रवेशही चक्क मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर तत्कालीन भावी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या उपस्थितीत झाला होता. मात्र त्यांचा माझा प्रत्यक्ष परिचय व्हायला २००२ उजाडले.

२००२ विधिमंडळाच्या नागपुरातील हिवाळी अधिवेशनात मी विधान परिषदेत वृत्त संकलन करत होतो. त्यावर्षी थोडे दिवस आधीच विधान परिषदेत काही नवे सदस्य निवडले गेले होते. पहिल्या दिवशीच प्रेस गॅलरीतून खाली बघताना विरोधी बाकावर एक दोन नवीन चेहरे दिसले. पहिल्याच दिवशी कोणत्यातरी मुद्द्यावर बोलायला डॉ. नीलम गोऱ्हे उभ्या राहिल्या. त्यावेळी “या कोण?” असा प्रश्न मी माझ्या बाजूलाच बसलेल्या मुंबईतील पत्रकार मित्राला केला. तेव्हा “या शिवसेनेच्या डॉ. नीलम गोऱ्हे आहेत” असे उत्तर मिळाले.

दुसऱ्याच दिवशी रात्री तत्कालीन शिवसेना नेते आणि त्या वेळचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते नारायण राणे यांनी पत्रकारांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. तिथे मलाही निमंत्रण असल्यामुळे मी पोहोचलो. तिथे पोहोचल्यावर पत्रकार मित्र आणि शिवसेनेतले आमदार मित्र यांच्याशी गप्पा मारणे सुरू होते. अचानक विधानपरिषदेतीलच दुसरे एक आमदार अनंत तरे हे माझ्याजवळ आले. तरेंची माझी जुनी ओळख होती. त्यांच्यासोबतच नीलम ताई सुद्धा होत्या. तरे यांनी माझी आणि ताईंची ओळख करून दिली. अविनाश पाठक हे बरेच सीनियर पत्रकार आहेत आणि विधानपरिषदेतच असतात असेही तऱेंनी सांगितले. मध्यम बांधा, गोरा वर्ण आणि चेहऱ्यावर बुद्धिमत्तेचे तेज असे ताईचे व्यक्तिमत्व बघून पहिल्याच भेटीत मी चांगलाच इम्प्रेस झालो होतो. मग ताईच माझ्याशी बोलायला लागल्या. “तुम्ही बरेच वर्षापासून इथे विधान परिषदेत वृत्त संकलन करता, मग माझा परफॉर्मन्स तुम्हाला कसा वाटला, तुमच्या काही सूचना असल्या तर अवश्य सांगत चला,” असे म्हणून त्यांनी चर्चेला सुरुवात केली. त्या रात्री तिथे सहभोजन करता करताच आमच्या बऱ्याच गप्पा झाल्या.

मग दररोज विधान भवनात आमच्या भेटी सुरू झाल्या. भेटल्या की कितीही धावपळीत असल्या तरी ताई दोन मिनिट थांबून बोलायच्या. हळूहळू आमचं ट्युनिंग जमायला लागले होते.

नंतर मुंबईला गेलो की विधान भवनात ताईंची हमखास भेट होत असे. भेटल्या की त्या हमखास विधान भवनच्या कॅन्टीनमध्ये चहासाठी घेऊन जायच्या. मग चहाच्या टेबलवर आमच्या राजकारणाबाबत बऱ्याच गप्पा होत असत. हळूहळू त्या माझ्याशी त्यांच्या राजकीय समस्या देखील शेअर करू लागल्या होत्या.

विधान परिषदेत ताई एक जागरूक आमदार म्हणून सक्रिय राहायच्या. प्रत्येक मुद्द्यावर त्या अभ्यास करून बोलायच्या. अनेकदा अनेक मुद्द्यांवर त्यांना काही शंका असली तर अनेक ज्येष्ठ पत्रकारांशी त्या चर्चा करून माहिती देखील घ्यायच्या .बरेचदा ताई माझ्याशी देखील वेगवेगळ्या विषयावर चर्चा करायच्या. त्यांची अभ्यासुवृत्ती लक्षात घेता मला देखील माहिती शेअर करण्यात आनंदच होत असे. मग मग अनेकदा काही सामाजिक प्रश्नांवर माहिती मिळाली आणि सभागृहात मुद्दा उपस्थित करायचा असला की मी आवर्जून ताईंनाच सांगत असे. ताई देखील त्या प्रश्नाची तड लावण्याचा प्रयत्न करायच्या. मला आठवते एकदा सरकारी नोकरीतील आयुर्वेदिक डॉक्टर्सचा प्रश्न ताईंकडे मी दिला होता. त्यावेळी ताई देखील आयुर्वेदिक डॉक्टरच आहेत हे मला पहिल्यांदाच कळले. तोवर त्या पीएचडी असाव्यात असाच माझा समज होता. त्या प्रश्नावर देखील ताईंनी आवाज उठवला होता.

२००८ मध्ये नीलम ताईंचा विधान परिषद सदस्याचा सदस्यत्वाचा पहिला कालखंड संपत होता. शिवसेना त्यांना पुन्हा उमेदवारी देईल किंवा नाही याबाबत त्या थोड्या साशंक होत्या. त्यावेळी योगायोगाने मी मुंबईत होतो. “नीलमताई तुमचा परफॉर्मन्स बघता तुमची उमेदवारी नक्की” असा आशावाद मी एका भेटीत व्यक्त केला. त्यानंतर चारच दिवसांनी ताईची उमेदवारी जाहीर झाली. मग प्रत्यक्ष भेटल्यावर ताई लगेच म्हणाल्या “पाठक तुमचा शब्द खरा झाला.”

शिवसेनेची सुरुवातीपासून ची भूमिका ही अखंड महाराष्ट्राची आहे, तर मी कट्टर विदर्भवादी म्हणून ओळखला जातो. विदर्भाचे वेगळे राज्य झाल्याशिवाय विदर्भाचा विकास नाही हे एक पत्रकार म्हणून मी माझ्या लेखनातून आणि विविध व्यासपीठावरून मांडत असतो. या मुद्द्यावर माझे आणि शिवसेनेतल्या मित्रांचे वादही व्हायचे
ताईंचे आणि माझे देखील अनेकदा वाद झाले आहेत. मात्र ते वाद कधीच हमरी तुमरी वर येण्यापर्यंत गेले नाहीत. कारण ताईंचा समंजस स्वभाव हाच त्याला कारणीभूत ठरला.

२००९ मध्ये माझे नवे घर बांधून झाले होते. जून २००९ मध्ये घराचा वास्तू पार पडला. त्यावेळी वास्तुपूजन समारंभाचे निमंत्रण मी ताईंना पाठवले होते. त्यावेळी तर ताई येऊ शकल्या नाहीत. मात्र नागपूर अधिवेशनात आलेल्या असताना ताई म्हणाल्या, “पाठक तुमचं नवीन घर पाहायला यायचं आहे” आणि एका रविवारी ठरवून त्या माझ्या घरी आल्या होत्या. सुमारे तासभर बसल्या. आमच्या सर्वांबरोबर त्यांनी चहापाणी केले आणि मगच त्या रवाना झाल्या.

२०१० मध्ये एका बैठकीसाठी मी सोलापूरला जाणार होतो. तिथून जवळच पंढरपूर आणि तुळजापूर आहे, म्हणून मी सहकुटुंब सोलापूरला गेलो. मी सोलापूरला जाणार आणि तिथून पंढरपूर आणि तुळजापूरलाही जाणार हे ताईंना फोनवरील चर्चेत सांगून ठेवले होते. ताईंनी सोलापूरच्या शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांना सांगून माझी पंढरपूर आणि तुळजापूर ला जाण्यासाठी वाहनाची सोय करून ठेवली होती आणि दोन्ही ठिकाणी वेळ न घालवता ताबडतोब दर्शन कसे होईल यासाठी व्यवस्था करायला तिथल्या शिवसैनिकांना ताईंनी सूचना देऊन ठेवले होते. मी सोलापूरला पोहोचल्यावर या मंडळींचे मला मोबाईलवर फोन आले, आणि ताईंनी आम्हाला कळवले आहे असे त्यांनी सांगितले. परिणामी माझी पंढरपूर तुळजापूर आणि अक्कलकोट वारी अगदी सहज पार पडली होती.

शिवसेनेच्या महिला नेत्या असल्याने ताईंवर जबाबदारी परीच असायची. साधारणपणे विदर्भात महिलांवर अत्याचाराची प्रकरणे कुठेही घडली की ताई हमखास नागपूरला भेटायला यायच्या. मग नागपूरहून त्या घटनास्थळी पोहोचायच्या. येण्याआधी साहजिकच एक पत्रकार या नात्याने त्या मला फोन करून आधी सदर प्रकरणाची माहिती घेत असत. मग नागपूरला आल्या की आधी सकाळी उठून त्या संबंधित गावाला भेट द्यायच्या. तिथे चर्चा करायच्या सर्व माहिती मिळवायच्या आणि मग दुपारी केव्हातरी मला फोन येत असे. “पाठक मी सात वाजेपर्यंत नागपुरात येऊन पोहोचते आहे. तुम्ही एक काम कराल का? साडेसात वाजता नागपूरच्या पत्रकारांना सेंटर पॉईंटला मला भेटण्यासाठी निरोप देऊ शकाल का?” मग मी निरोप दिला की सर्व मित्रमंडळी साडेसातला तिथे जमायचे. मग साडेसातला ताई पत्रकारांना भेटून घडलेली घटना आणि त्याबाबत शिवसेनेची भूमिका हे मुद्दे घेऊन पत्रकारांना माहिती देत असत. अनेकदा त्या मला एकट्यालाच चर्चा करायला बोलावून घ्यायच्या. एकदा त्या एअरपोर्ट सेंटर पॉइंटला उतरल्या होत्या. आठ वाजता त्यांनी बोलावल्यामुळे मी आणि महेश उपदेव दोघेही त्यांना भेटायला गेलो. मग काही प्रकरणांवर त्यांनी माहिती घेतली, तोवर रात्रीचे नऊ वाजत होते. मग आता इथेच जेवूया म्हणून ताईंनी आग्रह केला. त्यांच्याबरोबर मग तिथेच आमचे जेवण झाले आणि उद्या सकाळी पुन्हा भेटूया या कबुलीवर आम्ही त्यांचा निरोप घेतला होता.

एकदा ताईंचे अमरावतीला एक व्याख्यान होते. व्याख्यान संध्याकाळी होते त्यासाठी दुपारी दोन अडीचच्या दरम्यान त्या नागपूरहून कारने अमरावतीला जायला निघणार होत्या. त्या सकाळी अकराच्या सुमारासच मुंबईहून नागपूरला विमानाने पोहोचल्या. मग मला फोन आला आणि हॉटेल प्राइडला त्यांनी बोलावले मग तिथे तिथल्या रेस्टॉरंट मध्ये राजकीय विषयावर चर्चा करत आम्ही सहभोजन केले होते. त्या दिवशी राजकीय अनुभवातल्या अनेक व्यथा त्यांनी ऐकवल्या होत्या. शिवसेनेतल्या एका मोठ्या नेत्याबाबतच्या बऱ्याच तक्रारी देखील त्यांनी कानावर घातल्या होत्या. नंतर हा नेता शिवसेनेतून जवळजवळ बाजूलाच फेकला गेला होता. राजकीय चर्चा ताई माझ्याशी मोकळेपणाने करायच्या. कारण मी बाहेर कुठे काही बोलणार नाही याची त्यांना खात्री वाटत असावी.

२००९ नंतर एकदा २०१२ किंवा १३ मध्ये देखील त्या माझ्या घरी आल्या होत्या. त्यावेळी माझ्या सासूबाई देखील आलेल्या होत्या. ताईंचे माहेर पंढरपूरचे आणि माझ्या सासूबाई देखील पंढरपूरचे माहेर असणाऱ्याच, दोघींचा परिचय झाल्यावर आपल्या पंढरपूरच्याच म्हणून ताईंनी त्यांच्याशी खूप छान गप्पा मारल्या होत्या.

नागपूरच्या पत्रकारांमध्ये कदाचित ताईंना मी सर्वात विश्वासार्ह वाटत असावा. त्यामुळे मग बरेचदा बऱ्याच मुद्द्यांवर त्या चर्चा करायच्या. एका अधिवेशनात विधान परिषदेत नागपुरातील वृत्त संकलन करणाऱ्या पत्रकारांना एकत्र भेटण्याची ताईंनी इच्छा व्यक्त केली. लगेच मला कामाला लावले. मी देखील नागपूरच्या विधान परिषदेत नियमित वृत्त संकलन करणाऱ्या पत्रकारांची नावे आणि फोन नंबर ताईंना दिले. मग एका रविवारी दुपारी ताईंनी त्या सर्वांना हॉटेल प्राइड मध्ये स्नेहभोजनाला निमंत्रित केले होते. मी देखील त्यावेळी निमंत्रित होतो. त्या पत्रकारांशी फक्त माझी प्रसिद्धी करा इतकाच मुद्दा घेऊन ताई बोलत नव्हत्या तर पत्रकारांच्या देखील अडचणी त्यांनी समजावून घेतल्या. जे नव्याने वृत्तसंकलनासाठी येत होते, त्यांना पाठकांसारख्या ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेत चला असेही ताईंनी सुचवले होते.

२००८-०९ आणि २०११ मध्ये माझ्या काही पुस्तकांचे प्रकाशन समारंभ झाले. प्रत्येक समारंभाला ताईंना मी एक अतिथी म्हणून या म्हणून विनंती केली होती. मात्र काही ना काही अडचणीमुळे त्यांचे जमले नव्हते. तरीही शिवसेनेतून तुमच्या कार्यक्रमाला कोणीतरी येईल असे मी बघ,ते हे दरवेळी त्या सांगायच्या, आणि प्रयत्न देखील करायच्या. नंतर आवर्जून माझं पुस्तकही त्या मागवून घेत असत.

दरम्यानच्या काळात ताई विधान परिषदेत एका समितीच्या प्रमुख म्हणून नियुक्त झाल्या होत्या. त्यामुळे नागपूर अधिवेशनात त्यांना बसण्यासाठी एक स्वतंत्र दालन उपलब्ध झाले होते. मग फावल्या वेळात त्यांचे ते दालन माझ्यासाठी जाऊन बसण्याची जागा झाली होती. काही वेळा तिथेच बसून मी बातम्या लिहायचो. रेवती जोशी नामक नवी तरुण मुलगी पत्रकारितेत आली होती. ती त्यावेळी माझ्याबरोबर ताईकडे आली होती. तिला देखील ताईंनी खूप छान मार्गदर्शन केले होते. ताईंकडेच मग माझी मनीषा कायंदे, विलास अवचट इत्यादी मंडळींशी देखील चांगली ओळख झाली होती.

२०१९ मध्ये ताई विधान परिषदेच्या उपसभापती झाल्या. त्याच काळात महाराष्ट्रात प्रचंड राजकीय उलथापालक झाली. परिणामी आधी भाजप आणि शिवसेना जे मित्रपक्ष होते ते परस्परांचे शत्रूच बनले होते. त्या काळात उद्धव ठाकरेंची भूमिका न पटणारे जे पत्रकार होते त्यातला मी देखील एक होतो. त्यामुळे त्यांच्या भूमिका भूमिकेवर खरमरीत टीका करणारे बरेच लेख मी लिहिले होते. २०१९ च्या हिवाळी अधिवेशनात ताई नागपूरला आल्या. पहिल्याच दिवशी त्यांच्या दालनात मी त्यांना भेटायला गेलो. तिथे मुंबईच्या दोन महिला पत्रकार बसल्या होत्या. त्यांच्याशी ताईंनी माझी ओळख करून देताना सांगितले की “पाठक आतापर्यंत आमचे समर्थक होते. मात्र आता जबरदस्त टीका करत असतात”. मग आम्ही सर्वांनीच हास्यविनोद करत विषय पुढे नेला होता.

ते अधिवेशन फक्त एक आठवड्याचे होते. त्यामुळे त्या अधिवेशनात ताईंची निवांत अशी भेट होऊ शकली नव्हती. मग जानेवारी २०२० मध्ये विधानसभेचे एक दिवसांचे विशेष अधिवेशन झाले त्यावेळी मी तिथे गेलो होतो. पहिल्याच दिवशी मी पोहोचलो तेव्हा विधिमंडळाचे कामकाज आटोपले होते. विधान भवनाच्या लॉबीत मी निघालो तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चालत येत होते. त्यांच्याच सोबत ताई देखील होत्या. मला बघताच उद्धव ठाकरे थांबले आणि काय कधी आलात अशी चौकशी केली. दोन मिनिट बोलून मी निघत होतो, तेव्हा ताईंनी सांगितले “पाठक थोड्यावेळाने माझ्या चेंबर मध्ये येऊन भेटायला याल का ?सोबतच नाष्टा करूया.” मग मी ताईच्या चेंबर मध्ये गेलो. त्या दिवशी ताई माझ्यावर चांगल्याच नाराज झाल्या होत्या.” पाठक तुम्ही शिवसेनेवर एवढी टीका का करता?” मग मी माझी भूमिका त्यांना समजावून सांगू लागलो. तर ताई मलाच म्हणाल्या “अहो थोडा सकारात्मक दृष्टीने विचार करा ना” थोडा वेळ आमची वादावादी झाली जरूर. मात्र ते चहाच्या पेल्यातील वादळच राहिले. तितक्यात जेवणच आले आणि मग आजच्या इतर हवा पाण्याच्या गप्पा सुरू झाल्या होत्या

२०२२ मध्ये महाराष्ट्रात पुन्हा सत्तांतर झाले. उद्धव ठाकरेंचे सरकार पायउतार झाले आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेत आले. सुरुवातीला ताई उद्धव ठाकरेंसोबतच होत्या
त्या अधिवेशनात देखील ताईंना त्यांच्या दालनात जाऊन मी भेटायचो. आमच्या गप्पा देखील व्हायच्या मात्र उद्धव ठाकरेंवर मी टीका करता करतो हे बघून त्या नाराजी व्यक्त करायच्याच. मग कधी कधी थट्टेत त्या बोलायच्या “पाठक तुमच्या धारदार लेखणीचा आम्हाला नेहमी चांगलाच जोरदार अनुभव येत असतो, जरा तुमची लेखणी थोडी मवाळ करा ना” असे थट्टेत त्या अनेकदा सांगायच्या देखील.

२०२३ मध्ये ताई देखील ठाकरेची शिवसेना सोडून शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाल्या होत्या. त्यामुळे मग त्यांची नाराजी देखील थोडी कमी झाली होती. याच दरम्यान विधान परिषदेच्या सभापतींचा कार्यकाळ संपला होता, आणि नव्या सभापतींची निवड झाली नव्हती. त्यामुळे ताईच प्रभारी सभापती म्हणून कार्यरत होत्या. २०२३ च्या हिवाळी अधिवेशनाच्या साधारणतः एक महिना आधी ताईंचा मला फोन आला. त्यावर्षी महाराष्ट्र विधान परिषदेची शंभर वर्ष पूर्ण झाली होती. त्या निमित्ताने नागपुरातून विधान परिषदेत २५ वर्षापेक्षा अधिक कालखंड ज्यांनी वृत्त संकलन केले आहे अशा पत्रकारांचा सत्कार करण्याची ताईंची योजना होती. नागपुरातील अशा पत्रकारांची यादी तयार करण्याचे काम ताईंनी मग माझ्यावरच सोपवले. अधिवेशनाच्या आठवडाभर आधी ताई नागपुरात आल्या होत्या. त्या दिवशी त्यांनी नागपुरात पत्र परिषद देखील घेतली. दुपारी पत्र परिषद आटोपून निघताना ताई मला म्हणाल्या “पाठक संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास रवी भवनला कॉटेजवर भेटाल का?” त्यानुसार मी रविभवनला गेलो. तिथे सर्व पत्रकारांची यादी घेऊन त्यांनी माझ्याशी चर्चा केली. दरम्यान त्यांनी माहिती अधिकाऱ्यांकडूनही यादी मागवली होती. मग पत्रकारांना सत्कारात भेटवस्तू काय द्यावी कोणाकोणाला बोलायला लावावे अशा सर्वच मुद्द्यांवर त्यांनी माझ्याशी चर्चा केली होती. त्यावेळी विधानपरिषद सचिव देखील तिथे उपस्थित होते.

ठरल्याप्रमाणे एका शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता विधान परिषद सभागृहात हा पत्रकारांच्या सत्काराचा कार्यक्रम पार पडला. आम्ही पत्रकार वर्षानुवर्षे गॅलरीत बसून वृत्त संकलन करत होतो. मात्र आम्हाला खाली सभागृहात जाण्याचा तो पहिलाच प्रसंग होता. त्या दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत दादा पाटील विधानसभा आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते या सर्वांच्या उपस्थितीत आमचा सर्व पत्रकारांचा सत्कार सोहळा पार पडला होता. ताईंच्या उपक्रमाचे सर्वच पत्रकारांनी चांगलेच कौतुक केले होते.

ऑगस्ट २०२४ मध्ये मी चांगलाच आजारी झालो होतो. त्यामुळे मला नागपूरच्या किंग्जवे हॉस्पिटलमध्ये जवळजवळ पंधरा दिवस ऍडमिट व्हावे लागले होते. ताईंच्या कानावर ही बाब जाताच त्यांनी तत्काळ फोनवरून माझी चौकशी केली. घरच्या मंडळींनाही काही मदत लागल्यास मला नि:संकोचपणे कळवा असेही सांगितले होते. नंतर जवळजवळ सहा सात महिने मी अंथरुणावरच होतो. तेव्हा ताई सतत फोनवरून माझी चौकशी करायच्या. राज्य शासनाच्या योजनेतून मला वैद्यकीय कारणासाठी आर्थिक सहकार्य मिळावे म्हणूनही ताईंनी पुढाकार घेऊन हालचाली केल्या होत्या. २०२४ च्या नागपूर अधिवेशनात माझ्या आजारपणामुळे मी जाऊ शकलो नव्हतो. मात्र ताईंचा निरोप आला. त्यांनी एक दिवस सर्व पत्रकारांना भेटायला बोलावले होते. त्या दिवशी मी दिसलो नाही तेव्हा त्यांनी लगेच चौकशी केली. मग मला फोनही आला. जमल्यास भेटायला येते असेही त्यांनी सांगितले होते. मात्र अधिवेशन म्हणजे प्रचंड धावपळ, त्यात पिठासीन अधिकाऱ्यांचे तर जास्तच हाल असतात. त्यामुळे ताई काही येऊ शकल्या नाहीत. मात्र फोनवरून संपर्क सुरूच होता.

अजूनही अधून मधून आमचे फोनवर बोलणे होते. आज विधानपरिषदेच्या उपसभापती म्हणजे पदाने आणि मानाने त्या मोठ्याच आहेत. मात्र आपल्या पदाचा कोणताही बडेजाव न दाखवता त्या संपर्क ठेवत असतात. दरवेळी फोनवर बोलणे झाले की पहिला प्रश्न “पाठक आता तुमची तब्येत कशी आहे?” मग तब्येतीचा अहवाल मिळाला की नंतरच पुढले बोलणे सुरू होते.

विधिमंडळात लोकप्रतिनिधींनी काय काम केले याचा अहवाल स्मरणिका रुपात देण्याची पद्धत आहे. मात्र नीलम ताईंनी आपल्या पहिल्या दोन कालखंडांचा अहवाल चक्क पुस्तक रुपात प्रकाशित केला होता. दोन्ही अहवालांच्या प्रति आजही माझ्या संग्रही आहेत. त्याशिवाय उद्धव ठाकरे राज ठाकरे यांनी वेळोवेळी प्रकाशित केलेली पुस्तके देखील ताईंनी त्या त्यावेळी मला आवर्जून पाठवलेली आहेत. माझी वाचनाची आवड लक्षात ठेवून त्या अशी पुस्तके आवर्जून पाठवत असतात.

इतक्या वर्षाच्या संबंधात ताईंनी आपलेपणा जपला आहे. कधीही कोणतेही काम त्यांना सांगा त्या मदत करायला तयार असतात. २०२२ मध्ये माझी मुलगी दिव्येशा पदव्युत्तर शिक्षणासाठी पुण्यात जाणार होती. तिच्या ऍडमिशन साठी तिला घेऊन मी पुण्यात पोहोचलो होतो. ताईंना मी सहज फोन केला, आणि येण्याचे प्रयोजन सांगितले. त्यावेळी ताई मुंबईत होत्या. मात्र काही अडचण आल्यास तिथे माझ्या या या फोन नंबर वर पीएला फोन करा. तो तुम्हाला मदत करेल असेही त्यांनी सांगितले. यथावकाश मुलीचे ऍडमिशन झाली. त्यावेळी ताईंनी मला फोन करून सांगितले होते की मुलीला सांगा काही अडचण आली तर पुण्यात मी आहे. तिच्याजवळ माझा नंबर देऊन ठेवा आणि कधीही तिने फोन केला तरी मी इथे आहेच, असे सांगून त्यांनी आश्वस्त केले होते.

नीलमताई या एक सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका आणि राजकीय नेत्या, सर्वार्थाने त्यांचे काम मोठेच आहे. मात्र माझ्यासारख्या सामान्य पत्रकाराशी देखील त्यांनी आज जवळजवळ २३ वर्षे मैत्र जपले आहे. ते मी माझे भाग्यच समजतो. येत्या २०२६ मध्ये ताईंची विधानपरिषद सदस्यत्वाची चौथी टर्म संपेल. त्यांना पुन्हा पुढल्या टर्ममध्ये संधी मिळावी तसेच सभापती म्हणून किंवा मग एखाद्या खात्याच्या मंत्री म्हणून संधी मिळावी यासाठी त्यांना माझ्या शुभेच्छा.

Views: 86
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
कौशल्य विकास तंत्र कार्यशाळेतून शाश्वत बदलाचा आत्मनिर्भर मार्ग! अद्ययावत कौशल्य विकास तंत्र विभाग शिक्षणार्पण! धामणंद येथे डॉ सुनीती वैद्य इन्स्पिरेशनल किट्स अँड कन्सेप्ट माध्यमातून उपक्रम*

कौशल्य विकास तंत्र कार्यशाळेतून शाश्वत बदलाचा आत्मनिर्भर मार्ग! अद्ययावत कौशल्य विकास तंत्र विभाग शिक्षणार्पण! धामणंद येथे डॉ सुनीती वैद्य इन्स्पिरेशनल किट्स अँड कन्सेप्ट माध्यमातून उपक्रम*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)